अब हिंदू माफ नहीं करेगा!
श्रीराम मंदिरातील लुटीच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #दक्षिणमुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने प्रभू श्रीराम मंदिर, झावबावाडी, ठाकूरद्वार येथे "#रामरक्षा महाआरती" करण्यात आली.
ह्यासमयी माझ्यासोबत उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेते राजकुमार बाफना, उपनेते अरुण दूधवडकर, उपनेते अशोक धात्रक, माजी आमदार अरविंद नेरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर, नगरसेविका संपदा मयेकर, उ. कोल्हापूर संपर्क संघटक जयश्री बळ्ळीकर तसेच दक्षिण मुंबई विभागातील महिला-पुरुष पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना, संलग्न संघटनांचे पदाधिकारी, निष्ठावंत शिवसैनिक आणि प्रभू श्रीरामाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🚩जय श्रीराम!🚩
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#ShivsenaUBT
VIDEO | Shiv Sena (UBT) leader Arvind Sawant (@AGSawant) says, "In 1987 we fought a bypoll, Ramesh Prabhu was our candidate, the Shiv Sena chief had given a slogan, 'garv se kaho ham Hindu hain', then these Hindutva people were against us, we say this, they talk Sanatan Dharm, you should understand the difference."
#ShivSenaUBT
क्रीडा महोत्सवाचे भव्य यश... धन्यवाद!!
वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, माझ्या संकल्पनेतून, आणि ‘जाणीव न्यासा’च्या माध्यमातून, दक्षिण मुंबईत 'जन्मशताब्दी जाणीवोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.
या अंतर्गत, दिनांक ११ व १२ जुलै रोजी,
अभ्युदय नगर मैदानाजवळील 'समाज मंदिर' वातानुकूलित हॉल येथे, कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा, तसेच, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धा, मरीनलाईन्स येथील एफ रोडवरील युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स पॅव्हेलियनमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या.
दक्षिण मुंबईतील आबालवृद्ध नागरिकांनी भरघोस आणि उदंड प्रतिसाद देऊन, खर्या अर्थाने ह्या महोत्सवास भव्य स्वरूप प्राप्त करून दिले. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्यजी ठाकरे (@AUThackeray जी) यांच्या सदिच्छा भेटीने, आणि क्रीडापटूंना त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाने, या सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली.
दक्षिण मुंबईतील शिवसेना लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, तसेच अंगीकृत संघटनांचे तमाम पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खेळांमध्ये भाग घेणार्या सर्व महिला आणि पुरुष क्रीडापटूंचे, आणि उपस्थित तमाम दक्षिण मुंबईकरांचे, या सोहळ्यास हातभार लावणार्या प्रत्येकाचे, मनःपूर्वक धन्यवाद!
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#ArvindSawant #ShivsenaUBT #Janeevotsav #दक्षिणमुंबई #आपलामाणूस
गुरूकुलातून संस्कारक्षम विद्यार्थी घडविणारी आमची शाळा म्हणजे कणकवली तालुक्यातील कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालय!
याच विद्यालयातील मुलींच्या नवीन गुरूकुल इमारतीचे उद्घाटन केले, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या निमित्ताने ग्रामस्थ, शाळेतील कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांसोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळाली.
शिक्षण हा आमचा धंदा नसून तो आमचा धर्म आहे आणि याच ध्येयावर आमची संस्था उभी आहे. आज देशभरात सर्वसामान्यांसाठी असलेल्या एक लाखाहून अधिक शाळा बंद पडल्या आहेत. मात्र, गुरूकुलात्मक शिक्षण पद्धतीतून कुंभवडेसारख्या ग्रामीण भागात काहीतरी चांगले करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. गुरूकुलरूपी या ज्ञानयज्ञातून अधिकाधिक संस्कारक्षम विद्यार्थी घडवूया. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जे जे चांगले करता येईल, ते सर्व आपण करूया, असा विश्वास या सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केला.
या मंगल समयी संस्थेचे सचिव शशिकांत सावंत, गुरूकुलचे कार्याध्यक्ष प्रमोद कृपाळ, विश्वस्त ॲड. योगिनी गुरव, शालेय समिती सदस्य मोहन सावंत आणि अरविंद सुतार, गुरूकुल सदस्य विजय सावंत, कृषी अधिकारी दुर्वा जुळपे, कुंभवडे गावच्या सरपंच विजया कानडे, मुख्याध्यापिका अपूर्वा सावंत, सहशिक्षिका स्नेहल राणे, ग्रामपंचायत सदस्य संजय सावंत, मधुकर सावंत, तसेच गुरू पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अध्यक्ष, शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था
#ArvindSawant #ShivsenaUBT #कोकण
'अच्छे दिन'ची स्वप्नं दाखवणाऱ्या भाजप सरकारच्या कारकिर्दीत आज सर्वसामान्य माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबला आहे. जून महिन्यात किरकोळ महागाई पुन्हा वाढल्याने घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
स्वयंपाकघरापासून बाजारपेठेपर्यंत प्रत्येक वस्तू महाग होत चालली आहे. भाजीपाला, किराणा, इंधन, वाहतूक... प्रत्येक खर्च वाढत असताना सामान्य नागरिकांचे उत्पन्न मात्र त्याच ठिकाणी आहे. त्याचा थेट परिणाम मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांच्या जीवनावर होत आहे.
महागाईचा हिशेब मात्र सर्वसामान्यांच्या खिशातून वसूल होतोय...
आणि सरकार अजूनही यशाच्या घोषणा करण्यात व्यस्त आहे.
The independent legislative groups hold no legal standing without the original party's consent. There is no provision in the constitution of India that the groups can be given a recognition. Anti-defection law itself doesn't recognize such groups. Therefore we have served the notices to all the six members along with a copy of it to the Honorable Speaker.
- MP Arvind Sawant
Leader, Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray)
#ShivsenaUBT
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा मूळ पक्ष कुठल्याही पक्षात विलीन झालेला नाही आणि होऊ शकत नाही. कायद्यानुसार मूळ पक्षाच्या संमतीशिवाय लोकप्रतिनिधींना स्वतःहून विलीनीकरणाचा कोणताही अधिकार नाही. कथित 'विलीनीकरणाचा' दावा घटनात्मक दृष्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पक्षाची अधिकृत भूमिका संबंधित खासदारांना अधिकृत पत्राद्वारे सूचित केली आहे. तसेच, माहिती व संदर्भासाठी पत्रांची प्रत सन्माननीय लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्लाजी यांना देखील पाठविली आहे.
- खासदार अरविंद सावंत
गटनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्ष, लोकसभा
#ShivSenaUBT #ArvindSawant #MaharashtraPolitics
Shiv Sena(UBT) rules out merger with Shinde camp, issues warning to defected MPs
· The Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) has firmly rejected rumours of a merger with the Eknath Shinde-led Shiv Sena. Arvind Ganpat Sawant, the leader of the Shiv Sena(UBT) Parliamentary Party in the Lok Sabha, has issued a formal communication to six MPs who defected to the Shinde camp
🔗: https://t.co/0yTTDG65B9
Leader of Shiv Sena (UBT) Parliamentary Party in Lok Sabha, Arvind Sawant, writes to the rebel MPs Sanjay Dina Patil and Nagesh Patil Ashtikar, Omprakash Raje Nimbalkar, Sanjay Bandhu Jadhav, Sanjay Deshmukh, stating that Shiv Sena (UBT) being the orginial party has "neither intitiated, agreed to, nor permitted any merger" with Shiv Sena headed by Eknath Shinde or with any other political party.
#WATCH | Mumbai, Maharashtra | On 90 lakh women’s names removed from the Majhi Ladki Bahin Yojana, Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, “The names of lakhs of women were cancelled from the scheme. These were the ones who got swayed by this inducement and voted the current government into power, and it wasn't just the women who voted; their families did too… Now, what is the government going to do? They have cancelled the names. We are the ones facing the consequences. It is public money… This is a gross violation of the Constitution, and that is why I want to raise serious questions regarding this government's actions. Although the Assembly session has concluded, the CAG report highlights numerous issues… The debt burden is staggering; it is set to exceed 100% of the state's revenue. That is the dire situation they have created for our state government…”