अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना । नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना । अमितसाहेबांच्या सगळ्या बातम्या देणारे एकमेव फॅन पेज #AmitThackeraySpeaks
सस्नेह जय महाराष्ट्र,
५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं.
स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते.
म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा.
राज ठाकरे ।
सस्नेह जय महाराष्ट्र,
निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचा 'गर्जना' मोर्चा येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला निघणार आहे.
याबाबत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. पण मोर्च्याचा आधीचा मार्ग बदलावा अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली होती.
त्या विनंतीला मान देऊन हा मोर्चा 'मेट्रो सिनेमा' ते 'बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय' असा निघणार आहे. या बदललेल्या मार्गाची महाराष्ट्र सैनिकांनी, शिवसैनिकांनी आणि मोर्च्यात सामील होणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. बाकी मोर्च्याला भेटूच !
राज ठाकरे ।
….
Jai Maharashtra,
The ‘Garjana’ (Roar) protest march, organized by all political parties in Maharashtra against the Election Commission's arbitrary functioning, is scheduled for October 4, 2026.
You are all aware of this. However, the Mumbai Police had requested a change to the march's original route.
Acceding to that request, the march will now proceed from ‘Metro Cinema’ to the ‘Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Headquarters’ ‘Maharashtra Sainiks’, ‘Shiv Sainiks’, as well as all participating political parties and their office-bearers, should take note of this revised route. See you at the march!
Raj Thackeray
त्यानंतर श्री. अमित ठाकरे यांनी जंतर-मंतर येथे भेट देत आंदोलनातील सहकारी अभिजित दीपके यांची भेट घेतली आणि घडलेल्या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राजसाहेब ठाकरे आज दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक यांची भेट घेणार होते. मात्र, सकाळीच सरकारकडून आंदोलन दडपण्याच्या कारवाईत सोनम वांगचुक यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
#amitthackeray#sonamwangchuk
या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनसे नेते अमितसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते आज अंशुमन झिंगरनने ह्याचा विशेष सत्कार करण्यात आला ह्यावेळी त्याचे प्रशिक्षक छत्रपती पुरस्कार विजेते श्री. गोकुळ कामत, उपस्थित होते.
नवी मुंबईच्या सुपुत्राने अंशुमन झिंगरनने यांनी जपानमधील त्सुगारू सामुद्रधुनी पार करून जगातील सर्वात कमी वयात ‘ओशन्स सेव्हन’ हे आव्हान पूर्ण करत नवी मुंबईसह संपूर्ण भारताचे नाव जागतिक स्तरावर अभिमानाने उज्ज्वल केले.
जेव्हा एखादा प्रकल्प हजारो कोटी रुपये खर्च करून उभा होतो आणि त्याचं पहिल्याच पावसात नुकसान होतं, तेव्हा एरव्ही श्रेयवादाची हमखास लढाई लढणारे मुख्यमंत्री यावेळी मात्र जबाबदारी कशी अलगदपणे ढकलून लावताहेत, हे आज संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे.
चार दिवस उलटूनही स्थानिक खासदार किंवा आमदार पीडितांना भेटायला आले नाहीत. लोक मरत आहेत आणि तुम्ही ‘ऑपरेशन टायगर’ मध्ये आमदार-खासदार फोडत आहात.
@amitrthackeray
राजसाहेबांना नाशिकमध्ये संधी मिळाली तेव्हा भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही, रस्त्यांवर खड्डे नव्हते, शहर तुंबलं नाही आणि लोकांचे जीव गेले नाहीत !
@amitrthackeray