पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दि. १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत "स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान" यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पुणे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.