🔸 Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter and share your concerns, complaints and issues directly with me.
No prior appointment or permission is required. Understanding your concerns, listening to your problems and working towards their resolution is our foremost responsibility.
🔸 प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, तक्रारी आणि समस्या तुम्ही माझ्यासमोर मांडू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी समजून घेऊन त्यांचे निरसन करणे, हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
🔸Honouring our Mumbai Police personnel as they conclude their years of dedicated service.
Their courage, discipline, and unwavering commitment have left a lasting mark on Mumbai and its people. As they begin a new chapter, we wish them good health, happiness, and a fulfilling journey ahead.
🔸वर्दीतील कर्तव्याला सलाम!
वर्षानुवर्षे धैर्य, शिस्त आणि निष्ठेने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी समर्पित सेवा बजावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना मनःपूर्वक अभिवादन.
सेवेचा अध्याय पूर्ण होत असला, तरी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि योगदानाची छाप सदैव कायम राहील. नव्या पर्वासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधानाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#KhakiNeverRetires
🔶 One is secured around your wrist.
The others are just three digits away, ready to protect you.
🔶 मनगटावरची राखी असो किंवा फोनवरचे तीन अंक. दोन्ही देतात सुरक्षित असल्याचा दिलासा!
आपत्कालीन स्थितीत ११२ ची साथ!
#RakshaBandhan2026#Dial112
🔸 Due to important administrative reasons, won’t be able to host the scheduled Tuesday meeting with Mumbai citizens on 25th August 2026.
Will interact with Citizens next Tuesday, 1st September 2026 to discuss their queries, complaints and issues. No prior permission is required
🔸 महत्त्वाच्या प्रशासकीय कारणास्तव दिनांक २५ ऑगस्ट २०२६ मंगळवार रोजीची नियोजित मुंबईकरांची भेट घेता येणार नाही.
नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, समस्या व सूचना मांडण्यासाठी मंगळवार, दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी माझी भेट घ्यावी. या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.
🔸Today, on the occasion of Sadbhavana Diwas, administered the Sadbhavana oath to all officials, personnel & staff at the @MumbaiPolice Headquarter.
🔸आज सद्भावना दिवसानिमित्त मुंबई पोलीस मुख्यालयात सर्व अधिकारी व अंमलदारांसोबत सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी समाजात भावनिक ऐक्य, सामंजस्य आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करण्याचा आम्ही सर्वांनी संकल्प केला.
#सद्भावना_दिवस
#SadbhavanaDiwas
🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During this meeting, you can share your grievances, questions, and suggestions with me.
No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action is our primary duty.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, प्रश्न आणि सूचना तुम्ही माझ्याकडे मांडू करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी आणि प्रश्न समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
🔸Heartiest congratulations to all the recipients of the “Presidential Police Medal for Meritorious Service”, “Ati-Utkrisht Seva Padak”, and “Utkrisht SevaPadak” on the occasion of the 80th Independence Day.
Your exemplary service, dedication and commitment to duty have made us immensely proud.🇮🇳
🔸स्वातंत्र्यदिनानिमित्त मानाचे पदक पटकावणाऱ्या सर्व पोलीस अंमलदार व अधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!
स्वातंत्र्यदिनाच्या पावन प्रसंगी “गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक”, “अति उत्कृष्ट सेवा पदक” आणि “उत्कृष्ट सेवा पदक” प्राप्त झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमची अतुलनीय निष्ठा, समर्पण आणि कर्तव्यदक्षता संपूर्ण पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे..🇮🇳
#ExcellenceInPolicing
#80thIndependenceDay
🔸We serve with honour and protect with passion; upholding a legacy of courage, duty and service, guided by the vision of a stronger, safer nation.
अभिमानाने सेवा आणि जिद्दीने संरक्षण!
🔸एका मजबूत आणि सुरक्षित राष्ट्राच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत, आम्ही शौर्य, कर्तव्य आणि जनसेवेची परंपरा अखंडपणे जपतो.
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#IndependenceDay #JaiHind #ServiceToNation #KhakiSalutesTiranga
🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter to share your issues, queries, and grievances.
No prior appointment is required. Listening to your concerns and taking appropriate measures to address them is our primary duty.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या समस्या, शंका आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे मांडू करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यावर योग्य उपाययोजना करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
🔸Had an engaging conversation with Rear Admiral Vidhyadhar Harke, VSM, Flag Officer Commanding Maharashtra Naval Area (FOMA), at the @MumbaiPolice Headquarter.
🔸@MumbaiPolice मुख्यालय येथे महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे ध्वज अधिकारी रिअर ॲडमिरल विद्याधर हारके, व्ही.एस.एम. यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर संवाद साधला.
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event.
This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana.
🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह आयुक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
ही अत्याधुनिक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्यातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
#MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarters. During this meeting, you can freely share your concerns, queries, and grievances with me.
No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action to resolve them is our primary duty.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, शंका आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
🔸Had an insightful conversation with Mr. Qin Jie, Consul General of China, accompanied by Consul Mr. Dong Li at the @MumbaiPolice Headquarter today.
🔸आज @MumbaiPolice मुख्यालयात चीनचे महावाणिज्यदूत श्री. किन जी आणि वाणिज्यदूत श्री. डोंग ली यांची सदिच्छा भेट झाली. यावेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर रचनात्मक चर्चा करण्यात आली.
🔸Bidding farewell to our Mumbai Police personnel as they conclude their years of dedicated service.
Through every challenge, they stood as symbols of courage, discipline, and integrity, safeguarding Mumbai and its people with unwavering commitment.
While their active duty comes to an end, their legacy of service will continue to inspire generations. Wishing them good health, happiness, and a fulfilling new journey ahead.
🔸मुंबई पोलीस दलात दीर्घकाळ निष्ठेने सेवा बजावलेल्या आपल्या सहकाऱ्यांना सेवानिवृत्तीदिनी सन्मानपूर्वक निरोप!
त्यांनी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी दिलेले योगदान, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि सेवाभाव कायम स्मरणात राहील. त्यांचा खाकीतील प्रवास पूर्ण झाला असला, तरी त्यांचे कार्य सदैव प्रेरणा देत राहील.
निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि नव्या यशस्वी प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#KhakiNeverRetire
🔸 Under the guidance of Hon’ble CM, Maharashtra @CMOMaharashtra, the “Drug Free Mumbai Pledge Initiative” and Awareness Programme was held today at 10:30 AM at NSCI Dome, Worli.
Officers and personnel of Mumbai Police, along with over 10,000 students and teachers from schools and colleges across Mumbai, took the Anti-Drug Pledge, reaffirming their commitment to building a Drug-Free Mumbai.
Say NO to Drugs – Choose a Healthy, Safe Life.
🔸 मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य @CMOMaharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी १०:३० वा. एनएससीआय डोम, वरळी येथे ‘नशामुक्त मुंबई’ सामूहिक शपथ व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांतील १०,००० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक यांनी अमली पदार्थांविरुद्ध सामूहिक शपथ घेत ‘नशामुक्त मुंबई’ घडविण्याचा दृढ संकल्प केला.
अमली पदार्थांना ठाम नकार द्या – निरोगी, सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाचा स्वीकार करा.
#NashaMukti #DrugFreeMumbai #SayNoToDrugs
🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During the meeting, you can share your queries, concerns, or grievances directly with me.
No prior appointment is required. Listening to you and resolving your concerns is our foremost responsibility.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयात येऊन माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या, शंका आणि तक्रारी समजून त्यावर उपाययोजना करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
🔸A valour that time can never fade.
A glory the we will honour forever.
🔸कारगिल युद्धातील वीरांच्या अविस्मरणीय शौर्याचा काळाच्या ओघात कधीही विसर पडणार नाही. वीर जवानांचे बलिदान सदैव आपल्या स्मरणात राहील.
#कारगिल_विजय_दिवस#KargilVijayDiwas
🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During this meeting, you can share your queries, concerns, and grievances with me.
No prior appointment is required.
Addressing your concerns and resolving your issued is our top priority.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयास येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीत तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यांवर उपाययोजना करणे हे आमचे कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
🔸Met the young IPS Probationers from the National Police Academy today at the @MumbaiPolice Commissionerate.
It was encouraging to interact with these bright young officers at the beginning of their careers. Wishing them all the very best as they take on the responsibility of serving the nation.
🔸आज @MumbaiPolice मुख्यालयात राष्ट्रीय पोलीस अकादमीतील भारतीय पोलीस सेवेतील तरुण प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची भेट झाली.
या कारकिर्दीची उत्साहाने सुरुवात करणाऱ्या युवा अधिकाऱ्यांशी संवाद साधून आनंद झाला. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#IPSProbationersMeetup