‘प्रकल्प अस्तित्व – Tribal Language AI’ अंतर्गत आदिवासी भाषांच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल!
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल यांच्या हस्ते उत्कृष्ट योगदानकर्त्यांचा गौरव; देहावली भाषेचे यशस्वी डिजिटलायझेशन.
#ProjectAstitva
प्रकाशा गावाच्या पाणी प्रश्नावर प्रशासन सज्ज!
मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी गोमाई नदी पुलाच्या कामाची पाहणी करत पाणीपुरवठ्यासाठी कुपनलिका व नवीन उपाययोजनांबाबत नि��्देश दिले.
#Nandurbar #Shahada #WaterManagement
‘तेजस्विनी कृषी संस्कृती २०२६’ प्रदर्��नीचा उत्साहात समारोप; ७२ महिला बचत गटांचा उल्लेखनीय सहभाग. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी महिलांच्या उद्यमशीलतेचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.
#Nandurbar #Tejaswini2026 #WomenEmpowerment
मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद (ता. शहादा) येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना एकाच छताखाली विविध दाखले, ७/१२ दुरुस्ती व शासकीय योजनांचा लाभ. प्रशासन जनतेच्या दारी!
#collectorofficenandurbar#shibir
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना 2026 चा प्रतिष्ठित ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान! मुंबईत आयोजित सोहळ्यात उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान.
@MittaliSethiIAS@lokmat#LokmatAwards
नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन व National Dairy Development Board यांच्यात सामंजस्य करार
#Nandurbar#NDDB#DairyDevelopment
SBI RSETI Nandurbar येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व RSETI संचालक श्री. गणेश पाठारे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तनात्मक अध���ययन यशस्वी. 49 अधिकाऱ्यांचा सहभाग. नवोपक्रम, स्थानिक संसाधनांचा वापर व शाश्वत ग्रामीण उद्योजकतेवर भर.
लेघापाणी येथे सामूह��क वनहक्क क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापनाचा ऐतिहासिक प्रारंभ. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ. रोजगार, मूल्यवर्धन व स्थानिक अर्थव्यवस्थेला नवे बळ.
तोरणमाळ महोत्सव २०२६ (२०–२२ फेब्रु.) उत्साहात संपन्न!
आदिवासी संस्कृती, पर्यावरणपूरक आयोजन, झिपलाईन अॅडव्हेंचर, २२ महिला स्टॉल्सचा उत्तम प्रतिसाद आणि Tribal Academy विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक सहभाग यामुळे पर्यटन व स्थानिक रोजगाराला मोठी चालना.
#ToranmalFestival2026#nandurbar
नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा ऐतिहासिक पुढाकार!
‘अस्तित्व – भिली AI प्रकल्प’ चे लोकार्पण मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते AI4Agri 2026 मध्ये संपन्न.
डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारतातील पहिले भिली AI मॉडेल Mahavistaar App मध्ये समाकलित.
#AI4Agri
राष्ट्रीय महामार्ग 752G अंतर्गत मौजे चांदसैली येथील भूसंपादन क्षेत्र व गोमाई पुलाच्या कामांची मा. Krushnakant Kanwaria (IAS) यांनी दि. 16/02/2026 रोजी पाहणी केली. कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
#NH752G#Shahada#Infrastructure#Nandurbar
दि. 12/02/2026 रोजी मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी Maharashtra Industrial Development Corporation भालेर येथे भेट देऊन रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज आदी सुविधांची पाहणी केली. औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
#MIDC#IndustrialGrowth#Infrastructure
इयत्ता १२ वी मंडळ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी एकलव्य विद्यालय व जी.टी.पी. शाळेला भेट देऊन परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली. परीक्षा सुरळीत व पारदर्शक पार पाडण्याचे निर्देश.
#BoardExam#HSCExam
ठाणेपाडा जि.प. मराठी शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते संपन्न. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानातून मिळालेल्या निधीतून डिजिटल सुविधा उपलब्ध. शाळेची मॉडेल स्कूलकडे दमदार वाटचाल.
#DigitalEducation#ModelSchool#Nandurbar
मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरियायांनी H.S.C. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लेट सौ. जी.एफ. पाटील ज्युनिअर कॉलेज (विकास स्कूल), शहादा येथे भेट देऊन परीक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
#HSCExam#CollectorOfficeNandurbar
दि. 03/02/2026 रोजी नूतनीकरण केलेल्या उपविभागीय अधिकारी (SDM) कार्यालयाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
नवीन कार्यालयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व लोकाभिमुख होणार आहे.
#Nandurbar#GoodGovernance#SDMOffice
नंदुरबारची राष्ट्रीय व्यासपीठावर दमदार उपस्थिती!
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते हैदराबाद येथे National YESummit 9th चे उद्घाटन
नंदुरबार जिल्ह्यातून २७ उद्योजकांचा सहभाग, तीन उद्योगांचे पिचिंग स्पर्धेत यश.
@yesummit1#YESummit#Nandurbar#Entrepreneurship
नंदुरबार व नवापूर तालुक्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी 23/01/2026 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. कृषी स्टॅक, महसूल प्रशासन, जमीन रूपांतरण व खाणकाम अंमलबजावणीवर भर देण्यात आला.
Davos 2026 : नंदुरबारसाठी विकासाचे नवे दालन
जागतिक आर्थिक मंच दावोस 2026 मध्ये भारताची ठोस उपस्थिती आणि त्यातून नंदुरबार जिल्ह्यासाठी ४ हजार कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचा ऐतिहासिक टप्पा.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा:
https://t.co/XStQJzACmf
@CMOMaharashtra@Davos