मेघवाडी पोलीस ठाणे दद्दीमधील हरवलेली व्यक्ती आज रोजी सुखरूप मिळून आली असून त्यास कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर व्यक्तीचे शोधकामी मा. व पो नी मेघवाडी किरण शाळीग्राम सो, मा. सपोआ राजेंद्र राणे सो, मा. पो उपायुक्त दत्ता नलावडे सो यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले..
मेघवाडी पोलीस ठाणे येथे आज दि. 21/08/2026 रोजी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित मिटिंगमध्ये PSI नेमाने , PSI गोदमले, WPSI शिंदे आणि WPSI मानुगडे यांनी ज्येष्ठ नारिकांसोबत विविध विषयांवर संवाद साधला. तसेच सर्वांना जेष्ठ नागरिक दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; १००% मुद्देमाल हस्तगत
@VakolaPS येथे दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा कक्ष ८, गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात आला. मानवी व तांत्रिक कौशल्याच्या आधारे महिला आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
मेघवाडी पोलीस ठाणे येथे दि. 15 /8/2026 रोजी 80 वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मा. सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र राणे सो यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत वपोनि शालिग्राम सो तसेच मेघवाडी पोलीस ठाणे येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
🔸 20 Years Rigorous Imprisonment in POCSO & Rape Case
A strong investigation and evidence presented by the police have secured a conviction in a serious case registered at @Borivali_PS under C.R. No. 1152/2022 (SPL No. 411/2022).
Based on the evidence presented by the police under Sections 376(a), 376(b), 376(2)(f), and 376(2)(i) of the IPC along with Sections 4, 6, and 8 of the POCSO Act, the Hon’ble Dindoshi Sessions Court sentenced the accused to 20 years of rigorous imprisonment and imposed a fine.
Mumbai Police remains ever-vigilant and committed to the safety of women and children.
🔸 बोरीवली पोलिसांच्या तपासाला यश; पॉक्सो आणि बलात्कार प्रकरणात आरोपीला २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा!
दिंडोशी सत्र न्यायालयाने बोरीवली पोलीस ठाण्यात दाखल गु.र.क्र. ११५२/२०२२ (विशेष खटला क्र. ४११/२०२२) या गंभीर प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
भा.दं.सं. कलम ३७६(अ), ३७६(ब), ३७६(२)(फ), ३७६(२)(आय) आणि पॉक्सो कायद्याचे कलम ४, ६ व ८ अंतर्गत दाखल या गुन्ह्यात पोलिसांच्या मजबूत तपासाच्या व पुराव्यांच्या आधारे मा. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून ही कठोर शिक्षा सुनावली.
महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर व कटिबद्ध आहेत.
#MumbaiPolice4All
नशामुक्ती अभियानांतर्गत श्रमिक विद्यालय येथे घेतलेल्या निबंध व बॅनर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मा. पो. उपायुक्त दत्ता नलावडे सो यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सोबत मेघवाडी पो.ठाणे व.पो.नि. शाळीग्राम सो, स.पो.नि. खिलारे सो व म.पो.उपनि. शिंदे मॅडम उपस्थित होते.
छत्तीसगड येथून मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाचा फेब्रुवारी महिन्यात कार्टर रोड परिसरात हरवलेला मोबाईल फोन खार पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाने तांत्रिक कौशल्याच्या आधारे शोधून काढला आणि तो संबंधित पर्यटकास सुखरूप परत केला.#MumbaiPolice
🔸A choice that has countless consequences.
A better future begins with one decision:
Say no to drugs.
🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम!
सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या.
#EveryHighHasAHigherCost
मेघवाडी पोलिस ठाणे अंतर्गत श्रमिक विद्यालय, मेघवाडी येथे नशा मुक्त जनजागृती अभियानांतर्गत आयोजित केलेल्या पोस्टर व घोषवाक्य स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.. यावेळी WPSI शिंदे, WPSI हिरुगडे, PSI गोदमले यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले..
🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarters. During this meeting, you can freely share your concerns, queries, and grievances with me.
No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action to resolve them is our primary duty.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, शंका आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event.
This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana.
🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह आयुक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
ही अत्याधुनिक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्यातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
#MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
महोदय, सदर व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली.
एक प्रथितयश व्यक्ती म्हणून, तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे.
नशामुक्ती जनजागृती अभियान मुंबई 2026 अंतर्गत #मेघवाडीपोलीसठाण्याच्या वतीने जनजागृती मार्गदर्शन आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले तोलानी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत “ड्रग फ्री मुंबई”चा संकल्प केला.चला, आपण सर्व मिळून नशामुक्त,सुरक्षित आणि सशक्त महाराष्ट्र घडवूया
ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण देणे हे पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असल्याची माहिती दिली.. IBNS मधील तरतुदी, कौटुंबिक हिंसाचार तसेच इतर कायद्या विषयी प्राथमिक माहिती दिली.
#मेघवाडीपोलीसठाणे येथे ज्येष्ठ नागरिक यांची मीटिंग घेतली असता त्यांना कायद्याबाबत माहिती, बालकांविरुद्धचे गुन्हे, पोक्सो कायद्याची माहिती, स्वसंरक्षणबाबत घ्यावयाची काळजी, सायबर गुन्ह्याची माहिती फसवणूकीच्या गुन्ह्यांची माहिती.
ज्येष्ठ नागरिकांना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले तसेच असे काही प्रकार घडले किंवा निदर्शनास आले तर त्वरित त्या संदर्भात पोलिसांना कळविणे बाबत सूचना दिल्या, आणि स्व: रक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले.
दि. 22/07/2026 रोजी #मेघवाडीपोलीसठाणे येथे सर्व अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता होली फॅमिली वांद्रे पश्चिम यांचेकडून SUPPEN CARDIAC ARREST AWARNESS ट्रेनिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
#meghwadipolice ठाणे हेमा इंडस्ट्रिज येथील स्वामी समर्थ गार्डन येथे निर्भया पथकाने corner meeting घेतली असता उपस्थितांना सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, बनावट ग्राहक सेवा, नोकरीं ऑफर याच प्रमाणे अज्ञात लिंक उघडू नये व Fake Call Recieve करू नये याबाबत माहिती देण्यात आली.