‘म्हाडा’ देणार महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा!
म्हाडा आणि महाटेनिस फाऊंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामधून अंधेरी येथे जागतिक दर्जाचे आधुनिक टेनिस केंद्र उभारले जाणार आहे.
.
.
#MHADA#MahaTennisFoundation#SportsDevelopment#TennisAcademy
'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांनी आमदार श्रीमती चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत शिवडी विधानसभा मतदारसंघातील गृहनिर्माण, पुनर्विकास आणि भाडेकरूंच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत घेतली सविस्तर बैठक!
#HousingForAll#MumbaiHousing
वेळेची बचत, प्रक्रियेत सुलभता आणि सेवांमध्ये पारदर्शकता!
अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करण्याची सुविधा आता MHADA Visitor Management System App वर उपलब्ध.
आजच डाउनलोड करा आणि सेवेचा लाभ घ्या.
.
.
#MHADA#DigitalTransformation#OnlineAppointment#PublicService
"अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आज पूर्णविराम मिळाला."
नवीन घराची चावी स्वीकारल्यानंतर अनिल जगन्नाथ जाधव आणि शशिकला जगन्नाथ जाधव या बहिण-भावंडांनी व्यक्त केलेल्या भावना, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या यशाची साक्ष देतात.
.
.
#MHADA#BDDChawlRedevelopment#BDDChawl
म्हाडाच्या १८व्या लोकशाही दिनात पुनर्विकास, सदनिका पात्रता आणि विलंब शुल्क सवलत यांसारख्या विविध विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा करून आवश्यक निर्देश दिले.
नागरिकांचा विश्वास आणि प्रशासनाची बांधिलकी यांना जोडणारा सेतू म्हणजे म्हाडाचा १८वा लोकशाही दिन.
#MHADA#LokshahiDin
नवीन बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत घर प्राप्त झाल्यानंतर रहिवाशी श्रीमती भारती चंद्रकांत सायगावकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या या भावना, म्हाडाच्या पुनर्विकास उपक्रमाचे खरे यश अधोरेखित करतात.
.
.
#MHADA#BDDChawlRedevelopment#UrbanTransformation
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या चेहऱ्यावर गृहस्वप्नपूर्तीचा आनंद!
पुनर्वसन इमारत क्रमांक १ मधील टॉवर क्रमांक १, २ व ३ मध्ये ५३७ पात्र कुटुंबांना नवी घरे देण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी 'म्हाडा'तर्फे १५ पात्र कुटुंबांना वितरण पत्र देण्यात आले.
@henrywdsouza Thank you for your concern.
It is clarified that the drainage work referred to in the post is not being carried out by Mumbai Slum Improvemnt Board (Unit of MHADA). MHADA has not undertaken any new drainage line construction or modification work at the mentioned location.
दिनांक ०९ जून, २०२६ रोजी “१८ वा लोकशाही दिन" म्हाडा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांना आपल्या तक्रारी आणि अडचणी थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.
.
.
#Mhada#LokshahiDay
गेल्या वर्षी राज्यभरात सुमारे 2 लाख वृक्षांची लागवड करून म्हाडाने हरित महाराष्ट्राच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. यंदाही अधिकाधिक वृक्षारोपण करून हरित क्षेत्र वाढविण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा आमचा संकल्प आहे.
.
#EnvironmentDay2026#MHADA
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीसाठी ७५,३६६ अर्ज प्राप्त झाले असून प्रती सदनिका सरासरी २८.५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. ही आकडेवारी सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावरील दृढ विश्वास अधोरेखित करते.
#MHADA#MumbaiBoardLottery
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर बेटावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून ८२ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
.
.
#MHADA#MumbaiBuildingRepairBoard#PublicSafety
कुशल प्रशासक, वीरांगना, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Humble tributes on the birth anniversary of Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar a visionary administrator, a courageous queen.
#AhilyabaiHolkarJayanti#RajmataAhilyadevi#MHADA