भारताची स्टार नेमबाज एलावेनिल वलारिवनने महिला एकेरी गटात रौप्यपदक पटकावले. भारतीय संघाला शुटिंगमध्ये अजून एक पदक...
महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत, एलावेनिलन�� २५२.४ गुणांसह दुसरं स्थान पटकावलं आणि रौप्यपदक जिंकलं. आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील भारताचं हे दुसरं पदक आहे. त्याचवेळी, या स्पर्धेतील एलावेनिलचं हे दुसरं पदक आहे. एलावेनिलचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुटींग खेळातील भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.
#AsianGames2026 #India #Shooting #SilverMedal #Cheer4Bharat
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय टीमने केला पदकांचा श्रीगणेशा....
२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारतीय महिला खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावत रौप्य पदकावर मोहोर उमटवली आहे. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचं हे पहिलंच पदक आहे. एलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदर्शा विनोद यांनी उत्कृष्ट कामगिरी करत दुसरं स्थान पटकावलं.
#AsianGames2026 #India #Shooting #SilverMedal #Cheer4Bharat
राज्याचे माजी मंत्री, डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छ���. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
@RaviDadaChavan
वरिष्ठ पत्रकार और CNN-News18 की असिस्टेंट एडिटर पायल मेहता के निधन की खबर अत्यंत दुखद है।
राष्ट्रीय घटनाक्रम, राजनीति, संसद और सार्वजनिक नीतियों पर अपनी विश्लेषणात्मक एवं निडर पत्रकारिता के बल पर ���न्होंने इस क्षेत्र में अपनी एक अलग पहचान बनाई थी। राष्ट्रीय महत्व के मुद्दों पर लगातार रिपोर्टिंग करते हुए उन्होंने पत्रकारिता में अपनी एक अमिट छाप छोड़ी।
पायल मेहता को भावभीनी श्रद्धांजलि!
ईश्वर उनकी आत्मा को शांति प्रदान करे और उनके परिजनों को यह दुख सहन करने की शक्ति दे, यही प्रार्थना है।
महाराष्ट्र आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा!
आगामी ऑस्कर ���ुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड झाल्याबद्दल सर्व कलाकार आणि तंत्र���्ञांचे हार्दिक अभिनंदन.
आपली लोककला आणि समृद्ध परंपरा अत्यंत प्रभावी कथानकात गुंफण्याचे अप्रतिम कार्य लेखक-दिग्दर्शक संतोष डावखर यांनी केले आहे. उत्कृष्ट छायाचित्रण आणि संगीताच्या जोरावर या चित्रपटाने जागतिक मंचावर झेप घेतली आहे.
ठाण्याच्या एका कलाकाराने महाराष्ट्राची लोककला आणि संस्कृती थेट जागतिक पातळीवर ऑस्करच्या मंचापर्यंत पोहोचवणे ही ठाणेकरांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मह���राष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
चित्रपटाच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा!
#Gondhal #SantoshDavakhar #Oscars2027 #MarathiCinema #Maharashtra
📍दरे, #सातारा |
सातारा जिल्ह्यातील #दरे या माझ्या मूळगावी मोठ्या उत्साहात, आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोस्तव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घरात गौराईचेही वाजत गाजत आगमन झाले.
यानिमित्ताने गावातील घरी रात्री उशिरा शिंदे कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून भजन, पारंपरिक जाखडी नृत्य, सामूहिक आरती असे अनेक उपक्रम राबवून उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा केला. यावेळी सामू��िक आरतीमुळे संपूर्ण घर भक्तिभावाने भरून गेले.
यावेळी माझे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ.लता शिंदे तसेच शिंदे कुटुंबातील सर्व सदस्य आणि माझे सहकारी उपस्थित होते.
#Satara #Dare #गणपती #बाप्पा #मोरया #गणेशोत्सव२०२६ #Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra
📍वडनगर, गुजरात
महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने व शिवसेना परिवाराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन!
'सेवा संकल्प अभियाना'चा शुभारंभ कार्यक्रम.
मोदीजींच्या बाबतीत वयाचे आकडे नव्हे, तर कर्तृत्वाची उंची मोजली जाते; ती हिमालयाच्या उंचीने आणि जनतेप्रती कार्याची खोली अरबी समुद्राने मोजावी, असे मत याप्रसंगी व्यक्त केले. त्यांनी केलेला विकास हा सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडला गेला असून योजना कागदावरच न राहता लोकांच्या जीवनात पोहोचल्या असल्याचे यावेळी अधोरेखित केले.
भारत दहाव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून तिसऱ्या क्र���ांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा संकल्प आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मार्गाने देश वेगाने पुढे जात आहे. कलम ३७० हटविणे, देशाची सुरक्षा आणि भारतीय लष्कराची क्षमता यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली नवा #भारत उभा रहात असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
📍वडनगर, #गुजरात |
देशाचे लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तबगार प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन करण्यासाठी वडनगर, गुजरात येथून राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला.
वडनगरच्या पवित्र भूमीत येणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे सांगत या भूमीला नमन केले. “वडनगरच्या मातीतून उमटलेला एका बालकाचा आवाज आज देशातच नव्हे, तर जगभर घुमत आहे,” वडनगर ते वाराणसी ही यात्रा केवळ एक प्रवास नसून सेवेपासून समर्पण, संकल्पापासून परिवर्तन आणि परिवर्तनापासून विकसित भारताकडे जाणारी यात्रा असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
यावेळी वडनगर येथील ऐतिहासिक शर्मिष्ठा तलावाच्या घाटावर साधू संतांच्या साक्षीने भव्य महाआरती करण���यात आली. तसेच वडनगर ते वाराणसी दरम्यान सात राज्य ओलांडून जाणाऱ्या आणि वाटेत सेवा संकल्प पूर्ण करणाऱ्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. तसेच यानिमित्ताने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
याप्रसंगी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा, हेमांग जोशी यांच्यासह खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
#NarendraModi #Vadnagar #Gujrat #EknathShinde #Maharashtra
@narendramodi @AmitShah @byadavbjp @sanghaviharsh @AnupriyaSPatel
📍वडनगर, #गुजरात |
देशाचे लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तबगार प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन करण्यासाठी वडनगर, गुजरात येथून राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला.
वडनगरच्या पवित्र भूमीत येणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे सांगत या भूमीला नमन केले. “वडनगरच्या मातीतून उमटलेला एका बालकाचा आवाज आज देशातच नव्हे, तर जगभर घुमत आहे,” वडनगर ते वाराणसी ही यात्रा केवळ एक प्रवास नसून सेवेपासून समर्पण, संकल्पापासून परिवर्तन आणि परिवर्तनापासून विकसित भारताकडे जाणारी यात्रा असल्याचे याप्रसंगी नमूद क���ले.
यावेळी वडनगर येथील ऐतिहासिक शर्मिष्ठा तलावाच्या घाटावर साधू संतांच्या साक्षीने भव्य महाआरती करण्यात आली. तसेच वडनगर ते वाराणसी दरम्यान सात राज्य ओलांडून जाणाऱ्या आणि वाटेत सेवा संकल्प पूर्ण करणाऱ्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. तसेच यानिमित्ताने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
याप्रसंगी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपे��द्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा, हेमांग जोशी यांच्यासह खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
#NarendraModi #Vadnagar #Gujrat #EknathShinde #Maharashtra
@narendramodi @AmitShah @byadavbjp @sanghaviharsh @AnupriyaSPatel
वैद्यकीय संशोधक, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका राणी बंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स���्च या संस्थेमार्फत गडचिरोली येथे ग्रामीण आणि आदिवासी भागात त्यांनी दिलेली वैद्यकीय सेवा, संशोधन आणि सामाजिक कार्य फार मोठे आहे. ग्रामीण महिलांच्या आरोग्य समस्यांवरही त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.