शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक
पिंपरी, चिंचवड, मावळ आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना संपर्कप्रमुख तथा उद्योगमंत्री श्री. उदय सामंत आणि विधान परिषदेचे उपसभापती श्री. सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
🗓️ गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६
🕠 सायंकाळी ५.३० वाजता
📍 मोरया बॅंक्वेट हॉल, दत्तनगर, थेरगाव
@Shivsenaofc@AhirsachinAhir@samant_uday@DrSEShinde@mieknathshinde
#शिवसेना #पदाधिकारीआढावाबैठक #पिंपरी #चिंचवड #मावळ #भोसरी
📍 थेरगाव जनसंपर्क कार्यालय | १८ नोव्हेंबर २०२६
आपला प्रश्न मांडण्यासाठी कुठे जायचं, याचा विचार नागरिकांना करावा लागू नये. यासाठीच थेरगावच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी नियमित वेळ देतो.
आजही कार्यालयात नागरिकांची भेट घेतली. त्यांनी आपल्या परिसरातील प्रश्न आणि सूचना मांडल्या. त्यांच्या दृष्टीने कोणत्या कामांना प्राधान्य द्यायला हवं, हे त्यांच्याकडूनच समजून घेतलं.
@Shivsenaofc@DrSEShinde@mieknathshinde@LokSabhaSectt
#थेरगाव #जनसंपर्क #पिंपरीचिंचवड #श्रीरंगआप्पाबारणे
अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम लढतीत पाकिस्तानवर मात करत आशिया कपवर आपले नाव कोरणाऱ्या भारतीय युवा संघाचे हार्दिक अभिनंदन!
कठोर परिश्रम, आत्मविश्वास, जिद्द आणि उत्कृष्ट सांघिक खेळाच्या बळावर मिळवलेला हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. या युवा प्रतिभावंतांनी आपल्या खेळातून भारताच्या उज्ज्वल क्रिकेट भविष्याची झलक दाखवून दिली आहे.
भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही यशाची अशीच नवनवी शिखरे गाठत राहा, हीच सदिच्छा!
@Indiancrickteam@ICC
#U19AsiaCup #TeamIndia #IndianCricket #Champions #ProudIndian
📍 जनसंपर्क कार्यालय, थेरगाव
सण असो वा दैनंदिन कामकाज… जनसेवेचा प्रवास अखंड सुरूच!
सण-उत्सवांचा आनंद आपल्या जागी, पण नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणं ही कायमची जबाबदारी!
आज दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात अनेक नागरिकांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वांशी आपुलकीने संवाद साधत शुभेच्छांची देवाणघेवाण केली, तसेच नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या.
सणांना सुट्टी असू शकते, पण जनतेप्रती असलेल्या जबाबदारीला नाही!
@Shivsenaofc@DrSEShinde@mieknathshinde@LokSabhaSectt@loksabha
#ShrirangBarne #DiwaliPadwa #Balipratipada #Thergaon #MavalLokSabha #Jansampark #जनसंपर्क #जनसेवा
📍जालना
शेतकऱ्यांच्या आयुष्यात दुष्काळाच्या संकटाचे सावट असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आज उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी जालना येथे शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली.
दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळीही आनंदात जावी, या भावनेतून शिवसेनेच्या वतीने शेतकरी कुटुंबांना दिवाळी शिध्याचेही वाटप करण्यात आले. यावेळी जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथील शेतकरी अंबादास तांगडे यांच्या घरी भेट देत एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत जमिनीवर बसून भोजन केले. त्यांच्या मातोश्री आणि मुलांची आस्थेने विचारपूस केली. केवळ मदतीचा हातच नाही, तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी झाले.
यावेळी तांगडे कुटुंबातील मुलीच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहाची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेच्या वतीने स्वीकारण्यात आली. तसेच दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे विवाह ठरले आहेत, त्यांचे विवाह शिवसेनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्यातून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२ कलमी सवलती जाहीर केल्या असून, अग्रीम मदत म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा केले आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून दिवाळी शिध्याचे वाटप, शेतकरी महिलांना २५ हजार शिलाई मशीन आणि मुलींना २५ हजार सायकलींचे वितरण करण्यात आले आहे. पुढील पाऊस होईपर्यंत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि अन्नधान्याची व्यवस्था करण्यासाठी सरकारसोबत शिवसेनाही पूर्ण ताकदीने कार्यरत राहणार आहे.
यावेळी शेतकऱ्यांना धीर देताना एकनाथजी शिंदे साहेब यांनी, "संकट मोठे आहे, पण धीर सोडू नका. टोकाचा निर्णय घेऊ नका. शिवसेना आणि सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," अशी ग्वाहीही दिली.
याप्रसंगी शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
@mieknathshinde@Shivsenaofc
📍 प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड
भक्तिस्वरांनी उजळलेली दिवाळी पहाट… सुरांची अविस्मरणीय अनुभूती!
आज पहाटे ‘सकाळ’ वृत्तसमूहाच्या वतीने आयोजित ‘अमृतानंद’ दिवाळी पहाट या सांगीतिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी सादर केलेल्या भक्तिसंगीत आणि रागसंगीताच्या सुरेल मैफलीने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीने नाट्यगृह गजबजून गेले होते. संगीतप्रेमींचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या समृद्ध सांगीतिक परंपरेविषयी असलेली आस्था अधोरेखित करणारा ठरला.
@SakalMediaNews@Shivsenaofc@DrSEShinde@mieknathshinde@LokSabhaSectt@loksabha
#ShrirangBarne #Amrutanand #DiwaliPahat #SakalMediaGroup #VirajJoshi #PanditBhimsenJoshi #IndianClassicalMusic #Chinchwad #PimpriChinchwad
📍 छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डांगे चौक, थेरगाव
दिव्यांच्या प्रकाशात उजळला शिवरायांचा प्रेरणादायी वारसा!
दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीच्या निमित्ताने डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात ‘ऐतिहासिक दीपोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला स्मारक परिसर, शिवरायांप्रती असलेला आदरभाव आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रकाश असाच प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहो, हीच या दीपोत्सवानिमित्त सदिच्छा!
या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
@Shivsenaofc@DrSEShinde@mieknathshinde@LokSabhaSectt@loksabha
#ShrirangBarne #VishwajitBarne #nileshbarne #AitihasikDeepotsav #ChhatrapatiShivajiMaharaj #DangeChowk #Thergaon #Diwali2026 #दीपोत्सव
📍 वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल
दिवाळी संध्या… सुरेल स्वरांचा अन् तालाच्या ठेक्यांचा अविस्मरणीय संगम!
आज पनवेल येथे शिवसेना पनवेल महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्या वतीने आयोजित ‘दिवाळी संध्या’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
‘अमर बन्मी व निलेश परब सोबत ढोलकीवरची थाप’ या वाद्यसंगीताच्या मैफलीत सुरांची जादू आणि ढोलकीच्या तालाने दिवाळीच्या उत्साहात आणखी रंग भरले. संगीताच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी आमदार श्रीमती मनीषाताई कायंदे, आमदार श्री. प्रशांतशेठ ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर श्री. नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष श्री. जे. एम. म्हात्रे, श्री. प्रीतम म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@Shivsenaofc@DrSEShinde@mieknathshinde@LokSabhaSectt@loksabha
#ShrirangBarne #DiwaliSandhya #Panvel #VasudevBalwantPhadkeSabhagruh #InstrumentalMusic #Dholki #Diwali2026 #ShivSena #दिवाळीसंध्या
📍पिंपळे सौदागर | ९ नोव्हेंबर २०२६
भीषण आगीच्या दुर्घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी!
पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकाजवळील साई मॅरिगोल्ड सोसायटीमध्ये श्री. मनीष श्रीवास्तव यांच्या निवासस्थानी लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
या दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती घेत श्रीवास्तव कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारे आहे. अशा घटना टाळण्यासाठी आपण सर्वांनी घरातील विद्युत उपकरणे, वायरिंग तसेच अग्निसुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
#ShrirangBarne #PimpleSaudagar #KokaneChowk #SaiMarigoldSociety #PimpriChinchwad #FireIncident #FireSafety #Diwali2026
📍 मोरया बँक्वेट हॉल, थेरगाव
दिवाळी फराळाच्या निमित्ताने स्नेहाचा, आपुलकीचा अन् माणसांच्या भेटीगाठींचा उत्सव!
आज थेरगाव येथे नगरसेवक विश्वजित दादा बारणे तसेच युवासेना पिंपरी चिंचवड शहर आयोजित ‘दिवाळी फराळ स्नेहमेळाव्या’ला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभला!
शहराच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने आलेले नागरिक, विविध पक्षांचे ज्येष्ठ राजकीय नेते, आमदार, लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीने हा स्नेहमेळावा गजबजून गेला.
दिवाळीच्या निमित्ताने सर्वांशी मनमोकळ्या गप्पा, शुभेच्छांची देवाणघेवाण आणि आपुलकीच्या भेटीगाठी झाल्या. राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक नात्यांच्या पलीकडे माणसं एकत्र आणणारा हा स्नेहमेळावा खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा ठरला.
आपल्या सर्वांच्या भरभरून मिळालेल्या प्रेमाबद्दल, उपस्थितीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार!
@Shivsenaofc@DrSEShinde@mieknathshinde@LokSabhaSectt@loksabha
#ShrirangBarne #VishwajitBarne #DiwaliFaral2026 #DiwaliSnehaMelava #Thergaon #PimpriChinchwad #DiwaliCelebration #दिवाळीफराळ #स्नेहमेळावा
📍 छत्रपती शिवाजी महाराज बॅडमिंटन कोर्ट, ज्योतिबा उद्यान, काळेवाडी
दिवाळी पहाट… आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सुरेख संगम!
आज काळेवाडी येथील पवना हेल्थ क्लबच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला आणि सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
दिवाळीच्या निमित्ताने एकत्र येत आनंद वाटून घेणारे असे उपक्रम आपल्या सामाजिक नात्यांमधील जिव्हाळा अधिक दृढ करतात.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री. शत्रुघ्न बापू काटे, श्री. किरण राजपुरोहित, पवना हेल्थ क्लबचे अध्यक्ष श्री. नेताजी नखाते, संजय पगारे, आबा नखाते, अंकुश कोळेकर, दिलीप कुसाळकर यांच्यासह महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ShrirangBarne #DiwaliPahat #Diwali2026 #PawanaHealthClub #Kalewadi #PimpriChinchwad #Deepavali #दिवाळीपहाट