प्रत्येक लावलेले रोप म्हणजे भविष्यासाठी दिलेली एक अमूल्य भेट!
एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प अधिक बळकट करण्यात आला. .
एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज १४ जुलै रोजी आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत राज्यभरात 'वृक्षारोपण उपक्रम' यशस्वीरीत्या संपन्न झाला.
वारीची ओढ प्रत्येक भाविकाला पंढरीच्या दिशेने घेऊन जाते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या प्रवासाला विश्वासाची साथ देत,
लालपरी भाविकांच्या सेवेत अविरत धावत आहे.
'एसटी'च्या तीर्थाटन योजनेला नवी गती!
'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन' योजनेत खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुलभ प्रवासासाठी एसटी महामंडळातर्फे ५,५०० विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, गावातील ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्र मागणी केल्यास थेट गावातून पंढरपूरसाठी बस उपलब्ध होईल! @PratapSarnaik
आषाढी यात्रेदरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथे अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. प्रताप सरनाईक यांच्या वतीने स्वखर्चातून मोफत चहा, नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘लालपरी’ पुन्हा सज्ज!
आषाढी यात्रेनिमित्त ५,५०० विशेष बसेसद्वारे पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीने व्यापक नियोजन केले आहे. गावागावातून थेट बस सुविधा, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सवलती, तसेच तात्पुरती बस स्थानके यामुळे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येवर आणि महसुलावर मोठा परिणाम होत होता. न्यायालयाच्या आदेशानुसार बसस्थानकापासून २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.