महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन भवन, नागपूर येथे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नाले खोलीकरण कामे, पीक कर्ज वाटपाची स्थिती तसेच जिल्हा नियोजन समितीअंतर्गत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मुद्रांक शुल्कातून दिलासा
शहीद अधिकारी व जवानांच्या वीरपत्नी, वीर माता आणि कायदेशीर वारसदारांना शासनाकडून देण्यात आलेल्या शेतीजमिनींच्या हस्तांतरणासाठी आता मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.
#MaharashtraGovernment#RevenueDepartment#शहीदजवान
पर्यटन आणि क्रीडा विकासाला नवी गती!
माथेरान येथे पर्यटकांच्या पार्किंग सुविधेसाठी महसूल विभागाची ५ एकर जागा मंजूर, तसेच नागपूर जिल्ह्यातील ‘गादा’ जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी ४ कोटीं रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
#RevenueDepartment#MaharashtraGovernment#matheran
जिल्हा नियोजन भवन, नागपूर येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांकडून विविध विषयांवरील निवेदने स्वीकारण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येक प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
#जनसंवाद#Nagpur
शहीद कुटुंबांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय!
राज्यातील शहीद जवान व अधिकाऱ्यांच्या वीर माता,वीर पत्नी किंवा अधिकृत वारसांना शासनाकडून देण्यात येणारी शेतजमीन त्यांच्या नावावर हस्तांतरित करताना आता मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
#शहीदजवान#मुद्रांकशुल्कमाफी
https://t.co/1639SHtIr9
पन्नास वर्षे बंद असलेला रस्ता... हजारो शेतकऱ्यांच्या अडचणी... आणि लोकसहभागातून घडलेला विकासाचा नवा मार्ग!
पहा चितेगाव-चेहडी शिवरस्त्याची प्रेरणादायी कहाणी २६ जून रोजी महसूल विभागाच्या अधिकृत YouTube चॅनलवर...
महसूल विभाग, महाराष्ट्र शासन.
#farmer