🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त एस विभागीय कार्यालयात ध्वजारोहण!
स्वातंत्र्य दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागीय कार्यालयात आज सहायक आयुक्त श्रीमती समरीन सय्यद यांच्या हस्ते, ध्वजारोहण करण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस विभाग, विक्रोळी पूर्व येथील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले सर्वसाधारण रुग्णालयात आज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
#CleanMumbai#CleanlinessDrive#स्वच्छमुंबई
🇮🇳भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर राष्ट्रध्वज तिरंगा रंगसंगतीतील आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. त्याचे मनोहारी दृश्य...
#IndependenceDay#JaiHind#स्वातंत्र्यदिवस
पथविक्रेता योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभाग स्तरावरील प्राथमिक कार्यवाहीला गती द्यावी - महापौर श्रीमती रितू तावडे
पथविक्रेता योजनेची अंमलबजावणी सुकर होण्यासाठी महापौरांनी केल्या विविध सूचना
🔷शासनाकडून पथविक्रेता योजनेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर, त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु करता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग स्तरांवरील प्राथमिक तयारी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यादिशेने कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत. तसेच, पथविक्रेता योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौरांनी विविध सूचना देखील केल्या आहेत.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज संदर्भात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक १४ ऑगस्ट २०२६) आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते, उपआयुक्त श्रीमती चंदा जाधव, उपआयुक्त सर्वश्री विश्वास मोटे, संतोषकुमार धोंडे, मनीष वळंजू, अनुज्ञापन अधीक्षक श्री. अनिल काटे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
🔷पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज विषयक अद्ययावत माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा आणि उपआयुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते यांनी संगणकीय सादरीकरणासह दिली. पथविक्रेता समित्यांवरील अशासकीय सदस्यत्वासाठी अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना संवर्गातून १०७, निवासी कल्याण संघ संवर्गातून २७ आणि व्यापारी संघांचे प्रतिनिधी संवर्गातून १९ असे एकूण १५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदस्य नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे त्यांनी सांगितले.
🔷तसेच, पथविक्रेता सर्वेक्षणातून नोंदणीकृत झालेल्या ९९ हजार ४३५ पथविक्रेत्यांपैकी आतापर्यंत ५७ हजार ६९७ पथविक्रेत्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे. उर्वरित संख्या विचारात घेता, पडताळणीमध्ये ३ हजार ९५० अर्जदार हे मयत असल्याचे आढळले आहे. तर ३७ हजार ७८८ जण हे एकतर संपर्क होवूनही कार्यालयांमध्ये आलेले नाहीत अथवा त्यांच्याशी संपर्क होवू शकलेला नाही. दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या वाढीव मुदतीत क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरण प्रक्रिया सुरु राहील. शासनामार्फत पथविक्रेता योजना अधिसूचित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
🔷महापौर श्रीमती रितू तावडे यांनी निर्देश दिले की, पथविक्रेता समिती व ७ परिमंडळीय नगर पथविक्रेता समित्यांचे पुढील कामकाज प्रशासनाने विहित प्रक्रियेनुसार वेगाने पूर्ण करावे. विशेषतः शासनाला सादर करण्यात आलेली पथविक्रेता योजना मंजूर होवून अधिसूचित झाल्यानंतर त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु झाली पाहिजे. अनधिकृत पथविक्रीबाबत तक्रारीसाठी उपलब्ध करुन दिलेल्या यंत्रणेची व्यापक जनजागृती करावी, इत्यादी निर्देश श्रीमती तावडे यांनी महापौर या नात्याने दिले.
🔷तसेच, पथविक्रेता योजना ही सुकर व सुलभपणे राबविता यावी यासाठी महापौरांनी विविध सूचनाही केल्या आहेत. एकाच फेरीवाल्याच्या दुबार किंवा अधिक नोंदी होवू नयेत, विक्री प्रक्षेत्र निश्चित करताना रुग्णालये आणि शाळा - महाविद्यालयांचे प्रवेशद्वार, रेल्वे स्थानकांमध्ये ये - जा करण्याचे मार्ग, अग्निशमन केंद्रं, धार्मिक स्थळांचे प्रवेशद्वार, अरुंद पदपथ व वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे, बस थांबे व आपत्कालीन मार्ग अशा ठिकाणी अडथळा होवू नये, याची खबरदारी घ्यावी. पथविक्रेत्यांची संख्या, उपलब्ध क्षेत्र यांचा सुयोग्य ताळमेळ बसवावा. पिण्याचे पाणी - कचरा पेटी - प्रसाधनगृहे यासह आवश्यक मूलभूत सुविधांची सुनिश्चिती करावी. पथविक्रेत्यांना व नागरिकांना आपल्या सूचना किंवा तक्रारी मांडण्याची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. दर महिन्याला किंवा ठराविक कालावधीने पथविक्रेता समित्यांची बैठक होवून कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल, याकडे लक्ष द्यावे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कामकाज सुलभ, जलद व पारदर्शक ठेवावे, यासह विविध महत्त्वाच्या सूचना महापौर श्रीमती रितू तावडे यांनी प्रशासनाला लिखित स्वरुपात केल्या आहेत.
🔷पथविक्रेता योजना अंमलबजावणी सुरु होताना यातील सूचनांचा अभ्यास करुन यथायोग्य अवलंब करण्यात येईल, अशी ग्वाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
महत्त्वाची सूचना!
संकलित करण्यायोग्य नसलेले गणना पत्र (Uncollectable Enumeration Form) प्रवर्गातील मतदारांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गृहभेटीदरम्यान गैरहजर असलेले, कायमचे स्थलांतरित, मृत तसेच अन्यत्र नोंदणी केलेले किंवा इतर या गटातील मतदारांचा या यादीत समावेश आहे.
संकलित करण्यायोग्य नसलेल्या गणना पत्रासंबंधित मतदार यादी तपासण्यासाठी खालील लिंकला भेट द्या:
https://t.co/VMgPuav7rW
#mybmcupdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
@maharashtrasec@ecisveep@ceo_maharashtra
कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे (GVP’s) कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहे.
या अंतर्गत, एस विभागातील विक्रोळी पूर्व येथील टागोर नगर- बीट क्रमांक ३ या ठिकाणी आज सखोल स्वच्छता करण्यात आली. (२/२)
#MyBMUpdate
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बृहन्मुंबई क्षेत्रातील स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रातील दृश्यमान स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध घालणे आणि (१/२)
🔷जलवाहिनीवरील गळती रोखण्याकामी यश
🔷ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीला आढळलेली गळती बंद करण्याचे काम काल रात्री पासून सुरू होते ते प्राथमिक यशस्वी झाले आहे .
🔷महानगरपालिका जल कार्य विभागाच्या (नगरबाह्य) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून जलवाहिनीवरील छिद्र लाकडी खुंटी बसवून बंद केले आहे. त्यामुळे जलवाहिनीवरील गळती सद्यस्थितीत पूर्णपणे थांबली आहे.
🔷आता क्षतिग्रस्त जलवाहिनीच्या भागाभोवतीचा परिसर खोदकाम करून उघडण्यात येणार असून, तेथील साचलेले पाणी उपसून परिसर कोरडा करण्यात येईल. त्यानंतर खराब झालेल्या भागावर मृदू पोलाद (MS) पॅच प्लेट बसवून ती वेल्डिंगद्वारे कायमस्वरूपी दुरुस्त करण्यात येईल.
🔷विशेष म्हणजे, जलकार्य विभागाने (नगरबाह्य) पाणीपुरवठा पूर्णपणे बंद अथवा अलग न करता ही दुरुस्तीची कार्यवाही सुरू ठेवली आहे.
🔷पाणीपुरवठा सुरळीत ठेवत जलवाहिनीची तातडीने आणि सुरक्षितपणे दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷ठाणे - तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती आढळून आली आहे.
🔷ही जलवाहिनी जमिनीखाली असून तिच्यावर आवरण (encasement) करण्यात आले आहे. जलवाहिनी सुमारे ३ ते ४ मीटर खोलीवर असल्याने गळती दुरुस्तीचे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे.
🔷गळतीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जलवाहिनीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून गळतीचा स्रोत शोधणे आणि जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
🔷३००० मिलीमीटर व्यासाची ही महत्त्वाची जलवाहिनी असल्याने गळतीमुळे मुंबई परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी कार्यरत असून, दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
#MyBMCUpdates
🔹सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेणारी बैठक केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडली.
🔹मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी, खासदार श्री. रवींद्र वायकर, खासदार डॉ. (श्रीमती) ज्योती वाघमारे, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले, सुधार समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे, एल प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. विजयेंद्र शिंदे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष श्रीमती मीनल तुर्डे यांच्यासह विविध नगरसेवक, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा - लवंगारे, केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य खात्यातील विविध अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
🔹केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांचा लाभ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना व्हावा, या उद्देशाने अधिक नियोजनबद्धरित्या प्रयत्न करावेत. दवाखाने, रूग्णालयातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी केंद्रीय योजनांचा प्रभावीपणे वापर करावा. रुग्णांच्या सुविधेच्या अनुषंगाने केंद्रीय योजनांचा अधिक प्रचार व प्रसार करावा. धर्मादाय रूग्णालयातील दुर्बल घटकांसाठी आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री. प्रतापराव जाधव यांनी दिले.
🔹या बैठकीत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना, NACOFच्या माध्यमातून जेनेरिक औषध केंद्रे, ‘हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, महानगरपालिकेत प्रोटॉन थेरपी सेंटर, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्भाशय, स्तन व मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी, सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्त्वावर आधारित ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्प, अत्याधुनिक आयुष दवाखाना, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर महिलांसाठी मानसिक आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य निधी तसेच महानगरपालिका रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सौरऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@mpprataprao@TawdeRitu@misanjayghadi@PrajaktaVerma
हर घर तिरंगा अभियान २०२६
९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन तिरंगा ध्वजासोबत आपली सेल्फी अपलोड करा आणि देशभक्तीच्या या उत्सवात सहभागी व्हा.🇮🇳
📲 आजच सहभागी व्हा:
https://t.co/HHdZPMAV5z
#harghartiranga#harghartiranga2026#independenceday2026
#घरोघरीतिरंगा
#हरघरतिरंगा
#vandemataram150
#hgt2026
#jaihind
🔹महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील केशवराव खाड्ये मार्गावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. विकास नियोजन आराखड्यानुसार सुरू असलेल्या या उड्डाणपुलाच्या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली व विविध निर्देश दिले.
🔹केशवराव खाड्ये मार्गावर उभारण्यात येणारा 'केबल स्टेड पूल' हा रेल्वे रूळांवरील महानगरपालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी ८०३ मीटर तर रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी २३.०१ मीटर इतकी आहे.
🔹या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून केबल - स्टेड पुलास आधार देण्यासाठी ७८.५ मीटर उंचीचा पायलॉन (भव्य लोखंडी खांब) उभारण्यात आला आहे. पायलॉनच्या पश्चिमेकडील ९५ मीटर लांबीच्या स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. पूर्वेकडील १६५ मीटर लांबीच्या स्पॅनची उभारणी रेल्वे हद्दीतील जागेत रेल्वे विभागाकडून आवश्यक खंड (Block) प्राप्त झाल्यानंतर करण्यात येणार आहे.
🔹पायलॉनच्या पश्चिम दिशेकडील बहुतांश खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. तथापि, वाहतूक वळविण्याच्या (Traffic Diversion) कामामुळे पाच खांबांची उभारणी अद्याप प्रलंबित आहे. वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) परवानगीनंतर वाहतूक वळविण्यात येईल. या कामी महानगरपालिकेच्यावतीने काँक्रीटचा सेवा रस्ता (Service Road) बांधण्यात येत आहे. विविध उपयोगिता वाहिन्या टाकण्याची कामेही सुरू आहेत.
🔹वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने या सेवा रस्त्यावर वाहतुकीचे अवागमन केले जाईल. एकूणच, उड्डाणपुलाचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्याचे पूल विभागाचे उद्दिष्ट्य आहे.
🔹प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे यांसह संबंधित अभियंते उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔹महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य बनविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे.
🔹या अभियान अंतर्गत, ‘एच पूर्व’ विभागाकडून सांताक्रूझ (पूर्व) परिसरात आज कारवाई करण्यात आली. यामध्ये टीपीएस-३ परिसरातील मार्ग क्रमांक ६, ७ आणि ११ येथील ०६ अनधिकृत दुकानांचे तसेच नानासाहेब धर्माधिकारी मार्गालगतच्या पदपथांवरील ०५ अनधिकृत दुकानांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यात एका फुड व्हॅनचाही समावेश आहे. या कारवाईमुळे सुमारे ५०० मीटरचे पदपथ मोकळे झाले.
#PedestrianFirst
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@AshwiniBhide