सरस्वती मंदिर ट्रस्ट संस्थेची सेकंडरी स्कूल आज आपल्या गौरवशाली प्रवासाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. माझ्यासारख्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. या शाळेने केवळ शिक्षणच दिलं नाही, तर असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. माझ्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या, लाजऱ्या-बुजऱ्या स्वभावाच्या एका सामान्य मुलाला या शाळेने आत्मविश्वास दिला, संस्कार दिले आणि समाजात उभं राहण्याची ताकद दिली. आज खासदार म्हणून लोकांची सेवा करण्यापर्यंतचा माझा प्रवास घडवण्यात या शाळेचा मोठा वाटा आहे.
#nareshmhaske #SaraswatiMandirTrust #75YearsOfExcellence #AmrutMahotsav #GoldenJubileePlus #SchoolMemories
देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत व्हावी, उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन मिळावं आणि गुंतवणुकीसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण व्हावं या उद्देशाने केंद्र सरकार कंपनी कायदा सुधारणा कायदा २०२६ आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण कायद्याचा खोलवर अभ्यास करून त्यामध्ये आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी खासदार श्री. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि या समितीत माझी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या समितीत माझ्यासह निशिकांत दुबे, विनोद तावडे, मंगुटा श्रीनिवासूलू रेड्डी, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, ॲड. उज्ज्वल निकम आणि देवेंद्र ठाकूर यांसारखे खासदार देखील सहभागी आहेत.
#nareshmhaske #CompaniesActAmendment2026 #ParliamentaryCommittee
#CorporateGovernance #EaseOfDoingBusiness
देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत व्हावी, उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन मिळावं आणि गुंतवणुकीसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण व्हावं या उद्देशाने केंद्र सरकार कंपनी कायदा सुधारणा कायदा २०२६ आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण कायद्याचा खोलवर अभ्यास करून त्यामध्ये आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी खासदार श्री. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि या समितीत माझी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या समितीत माझ्यासह निशिकांत दुबे, विनोद तावडे, मंगुटा श्रीनिवासूलू रेड्डी, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, ॲड. उज्ज्वल निकम आणि देवेंद्र ठाकूर यांसारखे खासदार देखील सहभागी आहेत.
आज संसद भवन, नवी दिल्ली येथे या समितीची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत देशातील उद्योग, लेखा व कंपनी प्रशासन क्षेत्राशी संबंधित प्रमुख संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपली मतं समितीसमोर मांडली. ICAI, ICSI, ICMA, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, परराष्ट्र व्यापार विभाग, MSME मंत्रालय तसेच NI-MSME या संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रस्तावित सुधारणांबाबत सविस्तर सादरीकरण केलं. तसेच उद्योग क्षेत्राला अधिक सुलभता देताना पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यामध्ये संतुलन कसे राखता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान मी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. कंपनी कायद्यातील या सुधारणांचा आयकर आणि जीएसटीच्या महसुलावर काही परिणाम होईल का? काही प्रकारच्या ऑडिटमधील सवलतींमुळे शेल कंपन्यांना वाव मिळण्याची शक्यता आहे का? तसेच NFRA ला अधिक अधिकार देण्यामागे सरकारची नेमकी भूमिका काय आहे? यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून स्पष्टीकरण मागितलं. कायद्यामध्ये सुलभता आणताना आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता अबाधित राहणं देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचंही मी यावेळी नमूद केलं.
समितीचं पुढील काम केवळ बैठकींपुरते मर्यादित नसून देशभरातील उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, उद्योजक, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, संशोधक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा, उद्योगांसाठी सुलभ आणि त्याचवेळी उत्तरदायी व पारदर्शक असा कायदा तयार व्हावा, यासाठी समिती व्यापक विचारमंथन करत असून राष्ट्रहित आणि जनहित लक्षात घेऊन प्रत्येक तरतुदीचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
@Shivsenaofc@mieknathshinde@mpsudhirgupta@supriya_sule@AGSawant@miujjwalnikam@TawdeVinod@nishikant_dubey@GuruMYSRCP
#CompaniesActAmendment2026 #ParliamentaryCommittee
#CorporateGovernance #EaseOfDoingBusiness #EconomicGrowth
#NareshMhaske
नवी मुंबईकरांना गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होणं, केबल जळण्याच्या घटना, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होणं आणि नागरिकांना तासन्तास अंधारात रहावं लागणं या समस्या वारंवार होत होत्या. या गंभीर प्रश्नांकडे महावितरण प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने नवी मुंबईतील ऐरोली महावितरण कार्यालयाकडे आंदोलन करण्यात आलं.
#nareshmhaske #NaviMumbai #Airoli #Mahavitaran #PowerSupply
नवी मुंबई हे नियोजनबद्ध विकासाचं आणि आधुनिक नागरी सुविधांचं एक आदर्श उदाहरण मानलं जातं. उंच इमारती, विस्तीर्ण रस्ते, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि वेगाने वाढणारी लोकसंख्या यामुळे देशभरात नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पण या आधुनिक शहरात राहणाऱ्या नागरिकांना आजही वारंवार होणारी वीज खंडितता, कमी दाबाचा वीजपुरवठा आणि अपुऱ्या वीज वितरण व्यवस्थेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
#nareshmhaske #NaviMumbai #PowerCrisis #ElectricityIssue #Mahavitaran #PowerSupply #LoadShedding
सरस्वती मंदिर ट्रस्ट संस्थेची सेकंडरी स्कूल आज आपल्या गौरवशाली प्रवासाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. माझ्यासारख्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. या शाळेने केवळ शिक्षणच दिलं नाही, तर असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. माझ्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या, लाजऱ्या-बुजऱ्या स्वभावाच्या एका सामान्य मुलाला या शाळेने आत्मविश्वास दिला, संस्कार दिले आणि समाजात उभं राहण्याची ताकद दिली. आज खासदार म्हणून लोकांची सेवा करण्यापर्यंतचा माझा प्रवास घडवण्यात या शाळेचा मोठा वाटा आहे.
गेल्या आठवड्यात शाळेत आग लागण्याची एक छोटी घटना घडली होती. त्यावेळी मी दिल्लीत असल्यामुळे शाळेला भेट देता आली नाही. पण आज शाळेचे विश्वस्त श्री. सुरेंद्र दिघे यांच्या सांगण्यावरून शाळेला भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. नौपाडा पोलीस ठाण्याचे पीआय श्री. महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या घटनेची सखोल चौकशी करून सत्य लवकरात लवकर समोर आणण्याची विनंती केली.
शाळेच्या परिसरात फेरफटका मारताना अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळाले. नव्याने उभारण्यात आलेल्या इमारती, सुधारित सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेलं आधुनिक वातावरण पाहून खूप आनंद झाला. विशेष म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळेसोबतच इंग्रजी माध्यमाची शाळाही सुरू करण्यात आली आहे. बदलत्या काळानुसार पालकांच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन संस्था काम करत आहे. काही काळापूर्वी ही मराठी शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात होती पण संस्थेने मराठी शाळा कायम ठेवत नव्या जोमाने तिचा विकास केला आहे. मराठी भाषेचा आणि संस्कारांचा वारसा जपत आधुनिक शिक्षणाची जोड देण्याचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.
शाळेभोवती फेरफटका मारताना चिंचेच्या झाडाची आठवण झाली. ते झाड म्हणजे आमच्यासाठी जवळची आठवण होती. शाळेच्या इमारतीचं काम करताना ते झाड काढून टाकावं लागलं पण आता पुन्हा एकदा नवीन चिंचेच्या झाडाचं रोप लावण्यात आलं आहे. त्या झाडाजवळ गेलो आणि अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मी पाचवीत शिकत असताना चिंचेच्या झाडाला दगड मारला म्हणून टिळक सरांनी मला शिक्षा केली होती आणि आई-वडिलांनाही शाळेत बोलावलं होतं. गंमतीची गोष्ट म्हणजे चिंचेच्या झाडाला दगड मारणारा मी नव्हतो पण शिक्षा मात्र मला मिळाली होती. आजही आयुष्यात नकळतपणे एखादं चुकीचं पाऊल टाकत असेन तर टिळक सरांच्या त्या पट्टीची आठवण होते.
या शाळेने आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान दिलं नाही तर आयुष्य जगण्याचे संस्कार दिले. माणूस म्हणून कसं असावं, समाजात कसं वागावं आणि जबाबदारीने कसं जगावं याची शिकवण दिली. त्यामुळे आजही या शाळेच्या परिसरात पाऊल टाकलं की असंख्य आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. यावेळी माझ्यासोबत माझा शाळेतील मित्र अतुल जोशीही उपस्थित होता. दोघांनी मिळून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
#nareshmhaske #SaraswatiMandirTrust #75YearsOfExcellence #AmrutMahotsav #GoldenJubileePlus #SchoolMemories
नागरिकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत विश्वासाने सत्ता दिली आहे. त्या विश्वासाला पात्र ठरत जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर राहू आणि गरज पडल्यास त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा देऊ.
#nareshmhaske#shivsena#thane#thaneloksabha
संत कबीर हे भारतीय अध्यात्म, समाजसुधारणा आणि साहित्य क्षेत्रातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या विचारांनी आणि काव्यरचनेतून समाजाला सत्य, प्रेम, समता आणि मानवतेचा मार्ग दाखवला. कबीरांनी आपल्या दोह्यांमधून जीवनाचं गूढ अत्यंत सोप्या भाषेत मांडलं. त्यांनी जात-पात, धर्मभेद आणि कर्मकांड यांना विरोध करून माणसाने माणसाशी प्रेमाने वागावं असा संदेश दिला. त्यांच्या विचारांमध्ये समाजाला एकत्र आणण्याची आणि योग्य दिशा देण्याची ताकद होती. संत कबीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#nareshmhaske #SantKabir #KabirJayanti #SantKabirJayanti
ठाणे शहर झपाट्याने विकसित होत असून पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही मोठी प्रगती होताना दिसत आहे. वाढत्या लोकसंख्येला आणि भविष्यातील गरजांना लक्षात घेऊन शहरात दर्जेदार शैक्षणिक संस्थांची उभारणी होणं ही काळाची गरज आहे. ठाणे महानगरपालिकेत सभागृहनेता म्हणून कार्यरत असताना शैक्षणिक भूखंड वाटपाचं धोरण स्वीकारून मंजूर करण्यात आलं होतं. त्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचा सकारात्मक परिणाम आज दिसून येत आहे. मुंबईसह संपूर्ण देशात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली चिल्ड्रेन्स अकॅडमी आता ठाण्यात दाखल झाली आहे. घोडबंदर रोड परिसरात संस्थेने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी भव्य शाळा उभारली असून आज जवळपास ५०० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.
सरस्वती सेकंडरी स्कुल मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या आमच्या सरस्वतीय सुजाता भारती आणि चिल्ड्रेन्स अकॅडमीचे श्री. रोहित भट यांनी ही आधुनिक शाळा उभारली आहे.
शाळेच्या पाहणीसाठी त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या निमंत्रणाला मान देत मी शाळेला भेट दिली. तेथील अत्याधुनिक वर्गखोल्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेलं नियोजन, आधुनिक शिक्षण पद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांना विविध विषयांचं ज्ञान अधिक सोप्या व प्रभावी पद्धतीने मिळावं यासाठी तयार केलेलं शैक्षणिक वातावरण पाहून खरोखरच आनंद झाला.
शिक्षण ही समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि अशा दर्जेदार संस्थांमुळे ठाणे तसेच आजूबाजूच्या परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल सुजाता भारती आणि रोहित भट यांचं कौतुक करत मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या उभारणीत आणि विकासात केलेल्या सहकार्याची दखल घेत संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार करण्यात आला.
#nareshmhaske #thane #ThaneDevelopment
नवी मुंबई हे नियोजनबद्ध विकासाचं आणि आधुनिक नागरी सुविधांचं एक आदर्श उदाहरण मानलं जातं. उंच इमारती, विस्तीर्ण रस्ते, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि वेगाने वाढणारी लोकसंख्या यामुळे देशभरात नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पण या आधुनिक शहरात राहणाऱ्या नागरिकांना आजही वारंवार होणारी वीज खंडितता, कमी दाबाचा वीजपुरवठा आणि अपुऱ्या वीज वितरण व्यवस्थेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घणसोली, ऐरोली, नेरूळ आणि आसपासच्या परिसरातील हजारो कुटुंबे गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्यांनी त्रस्त आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो, ज्येष्ठ नागरिकांना अस्वस्थतेचा सामना करावा लागतो, रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होतो, घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम खोळंबते, तर छोट्या व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान होतं.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अनेक वेळा निवेदने देण्यात आली, बैठका घेण्यात आल्या, मात्र अपेक्षित गतीने कामं होत नसल्यामुळे अखेर माझ्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने हल्लाबोल आंदोलन केलं. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वीज वितरण यंत्रणेचा विस्तार न झाल्यामुळे विद्यमान यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. परिणामी वारंवार बिघाड, कमी दाबाचा पुरवठा आणि तांत्रिक अडचणी वाढत आहेत.
नागरिकांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणं हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे घणसोली येथील २२/११ केव्ही सबस्टेशनचे रखडलेलं काम तातडीने पूर्ण करणं, ऐरोलीतील नेवा सबस्टेशन कार्यान्वित करणं, नवीन ट्रान्सफॉर्मर्स उभारणं, जुन्या व जीर्ण झालेल्या केबल्सची त्वरित बदली करणं आणि संपूर्ण वीज वितरण व्यवस्थेचं तांत्रिक ऑडिट करणं ही काळाची गरज आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कामांकडे दुर्लक्ष झालं तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते आणि त्याचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसू शकतो.
त्यामुळे महावितरण प्रशासनाने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात. नाहीतर नागरिकांच्या हक्कांसाठी शिवसेना आणि युवासेना आणखी तीव्र भूमिका घेण्यास मागेपुढे पाहणार नाही.
या आंदोलनात शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश (बाबा) कदम, बेलापूर विधानसभा शहरप्रमुख किशोर पाटकर, नवी मुंबई महानगरपालिका गटनेते मनोज हळदणकर, ज्येष्ठ नेते तथा माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी उपमहापौर मंदाताई म्हात्रे, शिवसेना संघटक सरोजताई पाटील, महिला संघटक शितलताई कचरे, नेरुळ विभागप्रमुख विजय माने, ज्येष्ठ नेते अंकुश सोनवणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख ममित भोईर, युवासेना ऐरोली विधानसभा शहरप्रमुख चेतन पाटील, नगरसेविका अनिता मानवतकर, नगरसेविका चैताली पाटील, समाजसेवक भावेश पाटील, सुरेश मानवतकर यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#nareshmhaske #NaviMumbai #PowerCrisis #ElectricityIssue #Mahavitaran #PowerSupply #LoadShedding