मनाची शांतता आणि स्थिरता पाहिजे असेल तर ज्या परिस्थिती पासून आपण व्यावहारिक दृष्टया अलिप्त राहू शकत नाही...
तिथं परिस्थितीशी भावनिक दृष्टया अलिप्त राहता येणं, फार गरजेचं...🌸
व्यक्त होणं हे जरी अंतःकरण रिक्त झाल्यासारखं वाटत असलं तरीही समोरच्याचे आकलन ही त्याची वैयक्तिक बाब आहे. आणि हे व्यक्त होणाऱ्याला समजायला हवं.
पराभवाच प्रतिबिंब दाखवणारा विंचू नेहमीच दंश करतो.पण खाली बघून जगावं हा सल्ला याच वेळी महत्वाचा वाटतो.शेवटी खंत उरते ती हतबल क्षमतेची.🌸
कडाक्याचं ऊन! त्या उन्हाच्या झळा सोसत पक्ष्यांनी कुठंतरी निवारा शोधावा.तिथं असलेल्या पाण्यात मनसोक्त पंख भिजवावे. त्या भिजल्या पंखाची थरथर करत गारवा अनुभवावा. पुन्हा आनंदे बागडावं.ते पाहून आपण नकळत सुखाच्या गारव्यात चिंब व्हावं. या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद खूप मोठा असतो..
बऱ्याचदा चूक बरोबर सापेक्ष असतात तेंव्हा महत्वाचं असत, ते फक्त समजून घेणं, सगळ्या बाजूने विचार करून परिस्थिती हाताळणं....
उगाच नाही गोष्टी आणि त्यांचे चांगले_वाईट परिणाम हे दृष्टिकोनावर आणि परिपक्वतेवर अवलंबून राहत..✍️🌸
#haveagoodday