मराठी रंगभूमीला नवे सौंदर्य, विचारांची खोली आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाची नवी दिशा देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी ‘बाई’ म्हणून आदराने ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
आपल्या करारी व्यक्तिमत्त्वाने, कडक शिस्तीने आणि कलाप्रती असलेल्या अविचल निष्ठेने त्यांनी मराठी रंगभूमीवर अमिट ठसा उमटवला. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
समाजाच्या आरोग्यसुरक्षेची जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने पार पाडणारे डॉक्टर हे प्रत्येक राष्ट्राच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. विज्ञाना��िष्ठित वैद्यकीय सेवेद्वारे ते केवळ आजारांवर उपचार करत नाहीत, तर समाजात विश्वास, आश्वासकता आणि जीवनाविषयीची नव्याने उमेद निर्माण करतात. सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
शेतीला केवळ उपजीविकेचे साधन न मानता राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा केंद्रबिंदू म्हणून पाहणारे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. महाराष्ट्र कृषीदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
तुकाराम महाराज हे फार गरीब कुटुंबातून होते असं नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये सावकारी होती त्यांच्या घरी अनेक कर्ज खताची कागदपत्र होती. एकदा डोंगरावर चिंतन करताना तुकारामांना साक्षात्कार झाला असं म्हटलं जातं. त्या साक्षात्कारानंतर त्यांनी डोंगरावरून खाली येऊन आपल्या बंधूंशी चर्चा केली आणि चर्चा करून आपल्याकडील कर्ज खतं घेतली आणि ती इंद्रायणीत बुडवली. कर्ज खत बुडवून त्यांनी लोकांना कर्जमुक्त केलं. आपल्याकडून कोणाची फसवणूक किंवा नाडवणूक होता कामा नये तरच आपल्याला समाजाला काही सांगण्याचा अधिकार असतो अशी त्यांची धारणा असावी. गरिबाकडून व्याज वसूल करणे हेही शोषण आहे म्हणून त्यांनी लोकांना दिल��ल्या कर्जाची कागदपत्र बुडवली. असंख्य लोकांना कर्जातून मुक्त केलं. यावरून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे प्रणेते हे संत तुकारामांना म्हणता येईल. त्यांचा हा विद्रोही विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.
"भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी" हा तुकाराम महाराजांचा बाणा घेऊन पुढे जाण्याचा हा काळ आहे. रंजल्या गांजल्यांना सहकार्य करताना नाठाळाच्या माथी काठी हाणण्याचा तुकाराम महाराजांचा संदेश आजच्या काळात सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही. तुकाराम महाराजांनी कर्मकांड, ढोंगीपणा, जातीभेद, सत्तेचा अहंकार यावर कठोर प्रहार केले हे विसरता कामा नये.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाची दारं खुली केली, संत तुकारामांनी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला आणि गांधर्व परंपरेने कलेचं लोकशाहीकरण केलं या तिन्ही परंपरांचा समान धागा हा म्हणजे सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेव��ं. आज त्यांच्या जयंती, पुण्यतिथी वा वर्धापनदिन��� साजरा करताना आपण त्यांच्या विचारावर चालण्याचा निर्धार केला पाहिजे. महाराष्ट्राची खरी ओळख मंदिराच्या कळसात नव्हे तर ज्ञान, समता, करुणा आणि संस्कृती या अखंड परंपरेत आहे अशी माझी धारणा आहे.
मला आनंद आहे की आज तुमच्या सोहळ्यामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिलीत. कधीतरी वेळ काढून गांधर्व महाविद्यालय आणि या क्षेत्रात इथे चाललेलं संत विद्यापीठाचे काम हे मी अधिक गांभीर्याने बघू इच्छितो. कृपया कधीतरी वेळ काढून या ठिकाणी मला सहभागी होण्याची संधी द्या. मी त्या खोलात जाऊन अधिक यासंबंधीची माझी वैचारिक धारणा मजबूत करायला त्याची उपयुक्तता होईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत !
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ आयोजित गांधर्व मंच आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात 'संत ज्ञानेश्वर माऊलींचं ७५० वा जयंती महोत्सव, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम ह्यांचं ३७५ वं स्मृतिवर्ष आणि गांधर्व महाविद्यालयाचा १२५ वा वर्धापन दिन' ह्या पार्श्वभूमीवर उपस्थितांशी संवाद साधला.
---
श्री. सदानंद मोरे, ज्यांचे विचार आपण ऐकल��� ते कलावंत श्री. अवधूत गुप्ते, संसदेतील सहकारी श्री. श्रीरंग बारणे, महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, श्री. भाऊसाहेब भोईर, श्री. देवदत्त निकम, श्री. तुषार कामठे, श्री. सुनील गव्हाणे, श्री. यश साने, श्री. संदीप खोत, सुलोचनाताई धर, संगीताताई ताम्हाणे, संगीताताई बांगर, ज्योतीताई, डॉ. स्वातीताई मुळे, श्री. राजू ढोरे, श्री. विजय जगताप, श्री. अभय टिळक आणि अन्य सहकारी, बंधू भगिनींनो...
आजचा दिवस मला आनंद आहे, मी ह्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहू शकलो. ह्या सभागृहामध्ये माझा पहिलाच प्रसंग आहे कारण गदिमा ह्यांच्या नावानं अतिशय उत्तम सभागृह महानगरपालिका आणि त्यांच्या सहकार्याने ह्याठिकाणी उभं राहिलं आहे.
एक काळ असा होता कि, महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात रेडिओ सुरु व्हायचा आणि त्या रेडिओवर गीतरामायण ऐकायची संधी लोकांना मिळायची. ते इतकं लोकप्रिय झालं की रस्त्यावर ट्रॅफिक सुद्धा असायची नाही. असं हे गीतरामायण अत्यंत सोप्या भाषेत गदिमांनी लोकांसमोर ठेवलं त्याचं विस्मरण कुणालाही होऊ शकत नाही. आज त्या गदिमांच्या नावानं हे सभागृह केलं हा यथोचित त्यांचा सन्मान आहे, महानगरपालिका - त्यांचे सहकारी या सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो.
संत ज्ञानेश्वर माऊलींचं ७५० वा जयंती महोत्सव, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम ह्यांचं ३७५ वं स्मृतिवर्ष आणि गांधर���व महाविद्यालयाचा १२५ वा वर्धापन दिन अशा तीन निमित्तानं आज आपण याठिकाणी जमलेले आहोत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हा महाराष्ट्राचा श्वास आहे. ज्ञानोबा-तुकाराम जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरला निघालेल्याले दिसतात. ��णि त्यांच्या नामघोषाच्या शक्तीची कल्पना ही त्यामधून येते. गांधर्व महाविद्यालय हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आणि या तिन्हीच्या निमित्तानं आपण गायन-वादन स्पर्धा घेतल्या आणि त्याचा बक्षीस समारंभ आज इथे होतोय. मी त्यामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं आणि विजेत्यांचं अभिनंदन करतो, आणि त्यांच्या भावी काळासाठी शुभेच्छा देतो. ह्यानिमित्ताने पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर या महान कलावंत���ची आठवण होणं क्रमप्राप्त आहे. एखादा माणूस किती झपाटून काम करू शकतो, हे त्यांच्या कर्तृत्वाकडे बघितल्यानंतर लक्षात येतं.
वारकरी परंपरेने महाराष्ट्रात सामाजिक लोकशाही प्रस्थापित केली. समाजाच्या जातीच्या भिंती ओलांडण्याचं काम केलं गेलं. पंढरपूरच्या वारीमध्ये श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष कोणत्या जातीचे असा कोणी विचार करत नाही. ते एकत्र चालतात. भारतीय राज्यघटनेतील समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ह्याची बीजं संत परंपरेमध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळं संतांचा वारसा केवळ आध्यत्मिक नसून लोकशाही मूल्यांचा तो वारसा आहे.
१२५ वर्षांपूर्वी शास्त्रीय संगीत काही ठराविक घरण्यांपुरतं मर्यादित होतं. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांनी संगीत सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं. संगीत हे केवळ अभिजनांचं नसून सर्व समाजाचं आहे ही भूमिका त्यांनी घेतली. आणि त्या अर्थानं सांस्कृतिक लोकशाहीची एक मोठी चळवळ त्यांनी उभी केली. त्या काळात भारतीय शास्त्रीय संगीताची स्थिती चिंताजनक होती. अशा काळात पं. पलुस्कर ह्यांनी एक ध्यास घेतला, आणि तो ध्यास होता भारतीय शास्त्रीय संगीताला वैभव मिळवून देण्याचा. आणि त्यावरून १८९६ साली त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी भारत या���्रा सुरू केली. संगीत हे केवळ ��रबारापुरतं किंवा अभिजनवर्गापुरतं मर्यादित राहू नये ते समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावं ही त्यामागची प्रेरणा होती. पंडित पलुस्कर एक श्रेष्ठ गायक होते. त्याचप्रमाणे भारतीय संगीत क्षेत्रातील एक क्रांतिकारी विचारवंत, संघटक होते. १९०१ साली लाहोर येथे त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना करून 'अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया मंडळा'ची पायाभरणी त्यांनी केली ती फक्त शिक्षण संस्थ��� नव्हती तर भारतीय संगीताच्या नवजागरणाचं केंद्र होतं. पुढे पंडित पलुस्कर यांनी भारतातील विविधं शहरांमध्ये अनेक गांधर्व महाविद्यालय स्थापन केले आणि संगीत शिक्षणाची चळवळ उभी केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या समस्त शिष्यांनी एकत्र येऊन 'अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळा'ची स्थापना केली ती केवळ गुरूंना वाहिलेली श्रद्धांजली नव्हती तर त्यांचा वारसा पुढे नेण्याची एक सामूहिक प्र��िज्ञा होती. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धनासाठी एक अग्रगण्य संस्था म्हणून उभी आहे आणि ती तुम्हा-आम्हा सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे
वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आध्यात्मिक क्षेत्रात लोकशाही प्रस्थापित करणारे संत म्हणून आपल्यापुढे संत ज्ञानेश्वर यांचा उल्लेख करावा लाग���ल. तत्कालीन कर्मठ लोकांचा त्रास त्यांना सहन करावा लागला पण त्याबद्दल मनामध्ये त्यांनी कधी कटूता येऊ दिली नाही. संस्कृतमधील भगवद्गीता त्यांनी मराठीत आणून प्रचंड ज्ञानाचं भांडार लोकांसाठी खुलं केलं आणि हे काम मराठीसाठी क्रांतिकारक असं काम होतं. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचे लोकशाहीकरण. त्याद्वारे धर्मग्रंथांची मक्तेदारी त्यांनी मोडून काढली. ज्ञानावर, शिक्षणावर माहितीवर सर्वांचा अ��िकार आहे हा विचार ज्ञानेश्वरांनी दिला आणि ७५० वर्षानंतरही तो विचार आपल्याला दिशादर्शक ठरतोय. "जो जे वांछील तो ते लाहो" ही केवळ प्रार्थना नाही तर सर्व समाजाची संकल्पना आहे. माणसाचं वय तो किती वर्ष जगला यापेक्षा तो मृत्यूनंतर किती वर्ष आठवणीत राहिला यावर मोजलं जावं असा विचार केला तर आज ७५० वर्ष नंतर ज्ञानेश्वर आपल्याला दिशादर्शक ठरतात यावरून त्यांचा मोठपण लक्षात येतं.
जगद्गुरु संत तुक���राम ३७५ वं वैकुंठ गमन वर्ष असं म्हटलं जातं. काही वर्षांपूर्वी असं म्हटलं तर चालण्यासारखं होतं, पण आजच्या काळामध्ये वैकुंठ गमन वगैरे म्हणणं मला काय पटत नाही. असं म्हणणं म्हणजे एका विशिष्�� वर्गाने आपली कृत्य लपवण्यासाठी थोपवलेल्या गोष्टींना खरं मानण्यासारखं होईल. गेल्या तीन-चार दशकांमध्ये महाराष्ट्रात बरीच वैचारिक घुसळण झाली. संत तुकाराम महाराजांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. पूर्वी त्यांना मर्यादित रचनाकाराच्या स्वरूपात आपल्यापुढे आणलं जात होतं पण नव्या पिढीच्या अभ्यासाकांनी तुकाराम महाराजांच्या संदर्भात नवीन मांडणी केली. त्यामध्ये डॉ. आ. हं. साळुंखे यांचा ��ल्लेख मी मुद्दाम करीन. साळुंखे ह्यांनी तुकाराम महाराजांना 'विद्रोही तुकाराम' असं म्हटलं. त्यांच्या काळात सामाजिक वास्तव काय होतं, आणि त्या वास्तवाला तुकोबाराय कसे भिडले, प्रस्थापित व्यवस्थेने त्यांना कसा छळलं, आणि त्यांच्याशी कसा संघर्ष केला, हे सगळं नव्याने मांडण्यात आलेला आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढणारे 'विद्रोही तुकाराम'यांच्या भोवती विणलेल्या चमत्कारिक कथा खोडून काढून ���ुकारामांचं एक तेजस्वी स्वरूप आपल्या सगळ्यांच्या समोर आलं. वारकरी संप्रदायातील संतांच्या मांदियाळी मधून तेजस्वी संत म्हणून त्यांची ओळख आपल्याला करून देण्यात आली ती तेवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही तर जागतिक साहित्यात संत तुकारामांचे स्थान हे अनेक साहित्यिकाने आणि अभ्यासकाने मान्य केलेला आहे.
बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे, शिक्षण, आरक्षण व सामाजिक न्यायाचे क्रांतिकारी पुरस्कर्ते, सर्वसामान्यांच्या हृदयात चिरंतन स्थान मिळविणारे,सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, सुधारणावादी लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
'रयत शिक्षण संस्थे'च्या प्रवरानगर येथील 'महात्मा गांधी विद्यालय, कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प्रवरानगर' ह्या शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधला.
---
आत्ताच आपण ज्यांचे विचार ऐकले ते रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक आमदार श्री. दिलीप वळसे पाटील, महाराष्ट्रातल्या ���ार्वजनिक जीवनातले एक ज्येष्ठ नेते श्री. बाळासाहेब थोरात, लोकसभेचे आमचे सहकारी खासदार श्री. निलेश लंके, डॉ. सुधीर तांबे, आमदार श्री. सत्यजित तांबे, रयतचे चेअरमन श्री. चंद्रकांत दळवी, व्हॉइस चेअरमन ॲड. भगिरथ शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील सातारा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, श्रीमती मीनाताई जगधने, श्री. दादाभाऊ कळमकर, ॲड. संदीप वर्पे, श्री. बाबासाहेब भोस, श्री. अरुण कडू पाटील, या कार��यक्रमासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते आमचे सहकारी श्री. रावसाहेब म्हस्के पाटील, श्री. एकनाथ घोगरे पाटील, अन्य सहकारी आणि बंधू-भगिनींनो...
आजचा हा कार्यक्रम कायम लक्षात राहणारा कार्यक्रम आहे आणि माझ्यासाठी अभिमानाचा आहे. आयुष्यातील एक वर्ष रयतेमध्ये माझं जे गेलं ते 'महात्मा गांधी विद्यालय, प्रवरानगर' या शाखेमध्ये गेलं. मला आठवतंय की, तो साधारण एक वर्षाचा कालखंड अनेक गोष्टी मला शिकवून गेला. मला आठवतंय की, काही प्र��्नावरून संघर्ष करायचा ,आंदोलन करायचा हा विचार आम्ही लोकांनी केला. तो काळ गोवा मुक्तीचा होता. गोवा हा पोर्तुगीजांकडून भारताकडे यावा यासाठी नानासाहेब गोरे, मधु लिमये, मधू दंडवते अशा अनेक लोकांनी संघर्ष केला, त्यांना अटकही झाली, काही वेळेला त्या ठिकाणी गोळीबार झाला.
मला आठवतंय ज्या दिवशी पोर्तुगीज सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवर या महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांवर गोळीबार केला त्याच्य���मध्ये हिरवे गुरुजी नावाचे एक शिक्षक मृत्युमुखी पडले. ही बातमी आली आणि सबंध राज्यामध्ये संघर्ष सुरू झाला. मी महात्मा गांधी विद्यालयांमध्ये शिकत असताना आमच्या शा��ेच्या मुलांची बैठक... प्रवरानगरला घ्यायची आणि आम्ही सांगितलं सगळ्यांना आज आपण शाळा बंद ठेवायची. संघर्ष करायचा, पोर्तुगीजांचा निषेध करायचा आणि आम्ही शाळा बंद ठेवली आणि शाळेसमोर मिरवणूक काढली. कुठे जायचं काही माहिती नव्हतं. प्रवरा साखर कारखाना हेच एक महत्त्वाचे केंद्र होतं. आम्ही मिरवणूक काढली आणि साखर कारखान्यावर गेलो. त्या कारखान्यामध्ये पद्मसिंह विखे पाटील हे त्या वेळेला हजर होते. आ���्ही त्यांना सांगितलं कि, गोव्याला पोर्तुगीजांनी आपल्या लोकांच्यावर गोळीबार केला आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही प्रवरानगर बंद ठेवा असा निर्णय घेतला आहे. तुम्ही कारखाना बंद ठेवा. विखे पाटलांनी आम्हाला विचारलं, "कारखाना बंद ठेवला तर गोवा मिळणार आहे का? आणि गोवा मिळत असेल तर मी कारखाना कायमचा बंद करायला तयार आहे." आम्हाला काय त्याचं उत्तर देता आलं नाही. माझ्या लक्षात आलं माझ्या सार्वजनि��� जीवनात पहिला मोर्चा मी प्रवरा नगरला काढला आणि तो गोवा मुक्तीसाठी काढला आणि त्या वेळेला महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेचा मी विद्यार्थी होतो. आनंद आहे त्या शाळेमध्ये आज आपण अमृत महोत्सवाच्या वेळेस एकत्रित आलो.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्ञानाचे दरव��जे हे उपेक्षितांच्या मुलाबाळांच्यासाठी उघडे केले. अनेक ठिकाणी शाखा काढल्या. लाखो विद्यार्थ्यांना शिकायची सुविधा दिली. हजारो शिक्षक पुढे आले आणि शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांतिकारक निर्णय कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या काळात केला होता. आनंद याचा आहे सातारा जिल्ह्यामध्ये 'रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना झाली असेल पण 'रयत शिक्षण संस्थे'ची वाढ ही अहमदनगर मध्ये झाली. ती अहमदनगर मध्ये व्हायला, पद्मसिंह विखे पाटील, धनंजय गाडगीळ, शंकरराव धुमाळ कॉम्रेड कडू अशा अनेकांची नाव घ्यावी लागतील. या सगळ्यांनी कर्मवीरांचा विचार स्वीकारला आणि पहिली शाखा ही कर्जतला उभी केली. दादा पाटील आणि त्यांचे सहकारी त्यामध्ये होते आणि त्यामधून या नगर जिल्ह्यात या 'रयते'चं रोपट पोहोचलं आणि आज हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकतात याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे.
आजच्या या कार्यक्रमांमध्ये आनंदाची गोष्ट एक आहे कि, या जिल्ह्यातला माजी विद्यार्थी नितीन लोंढे आणि त्याचे सहकारी आज मुंबईमध्ये धारावी म्हणून सगळ्यात गलिच्छ असा जो भाग आहे. तिथं जे कचऱ्याचे ढीग आहेत ते हलवण्याचे काम ही मुलं करतात. ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं. आज तिथे ६५० वि��्यार्थी काम करतात, पगार चांगला मिळतो आणि स्वतःचं कुटुंब चालवत असताना आपल्याला ही जी संधी या संस्थांनी दिली त्या संस्थांना मदत करतात. धोंडे यांची जी संस्था आहे त्यांनी सातारला रयत शिक्षण संस्था यांना १ कोटी रु. इतकी देणगी दिली. याशिवाय इतर ठिकाणच्या शाखांना ६ कोटी आणि ५० लाख दिले आणि प्रवरेच्या या शाखेला ५० लाख रुपयांची मदत त्यांनी दिली आहे. कोट्यावधीची मदत एक कष्टकरी कामगार आणि त्यांचे सहकारी जिथे आपण शिकलो त्याच्याबद्दलचं उत्तरदायित्व अंतकरणांमध्ये ठेवून प्रामाणिकपणाने देण्याचा करतात हे चित्र आपण या ठिकाणी पाहिलं. मी त्यांच�� अभिनंदनही करतो. पुढे अशीच मदत करत रहा आणि या गरीब मुलांना ज्ञानाचे दरवाजे खुले करायचे हा जो आदर्श विचार आहे तो शक्तिशाली करण्याचं काम तुम्ही करत आहात, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो.
आज या ठिकाणी नवीन शाखा आपण उभी केली, त्यांचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि माझे खात्री आहे ही संस्था आणि ही शाखा महाराष्ट्रात नावारुपाला येईल यासंबंधीचा पूर्ण विश्वास बाळगून माझे शब्द इथे मी संपवतो. ज�� हिंद, जय भारत !
आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI)’ ची नियामक मंडळाच्या सभेला उपस्थित राहिलो आणि प्रमुख सहकाऱ्यांसमवेत विभागवार आढावा घेतला.
ह्याप्रसंगी राज्याचे सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. दिलीप वळसे पाटील, संस्थेचे विश्वस्त श्री. बाळासाहेब थोरात, श्री. जयंत पाटील, श्री. जयप्रकाश दांडेगावकर, श्री. विशाल पाटील, नियामक मंडळाचे सदस्य श्री. हर्षवर्धन पाटील, श्री. राजेश टोपे, श्री. सतेज उर्फ बंटी पाटील, डॉ. विश्वजित कदम, श्री. नरेंद्र मुरकुंबी, श्री. विवेक कोल्हे, श्री. श्रीराम शेटे व नियामक मंडळातील इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शरीर आणि मनाल��� एकत्र जोडणाऱ्या, भारताच्या प्राचीन ऋषीपरंपरेने जगाला दिलेल्या अमूल्य ज्ञानसंपदेचा,आज संपूर्ण विश्व अभिमानाने स्वीकार करत असताना, निरोगी, संतुलित व आनंदमय जीवनासाठी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया,जागतिक योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राच्या सामाजिक पुनर्निर्माणाचे शिल्पकार, विवेकवाद व बुद्धिप्रामाण्यवादाचे कणखर पुरस्कर्ते, अंधश्रद्धा व जातिभेदाविरुद्ध आयुष्यभर लढणारे समाजसुधारणेचे निर्भीड अ��्रदूत,थोर तत्त्वचिंतक, लेखक व 'सुधारक'कार ��ोपाळ गणेश आगरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
राजमाता जिजाऊंच्या दूरदृष्टीतून रुजलेल्या संस्कारांचे बीज पुढे स्वराज्याच्या भक्कम पायाभरणीचे सामर्थ्य ठरले. मातृत्व��च्या सामर्थ्याने राष्ट्रघडणीचा आदर्श निर्माण करत त्यांनी असंख्य पिढ्यांसाठी प्रेरणेचा अखंड दीप प्रज्वलित केला. स्वराज्याच्या विचारांचे बीज रोवणाऱ्या राजमाता जिजाऊंना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन
रक्ताचा प्रत्येक थेंब नवजीवनाची उमेद देतो; एका निस्वार्थ कृतीतून एखाद्याला नव्याने जगण्याच�� संधी मिळते, हाच खऱ्या अर्थाने पुनर्जन्माचा अनुभव आहे. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जीवनदानाच्या या महान कार्यासाठी प्रेरित होऊया.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते मा. रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित राहून मा.रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आलोय. ज्यांच्याबद्दलची तुम्हा-आम्हा सगळ्यांच्या अंतकरणामध्ये एक अत्यं��� आदराची भावना आहे.ज्यांच्या सन्मानासाठी आपण इथं आलो आहोत ते रामशेठ ठाकूर, सौ. ठाकूर, परेश ठाकूर, प्रशांत ठाकूर,कुटुंबातील अन्य घटक,याशिवाय गेल्या काही काळाच्यासाठी अगत्याने उपस्थित असलेले श्रीनिवास पाटील, विश्वजीत कदम, बाळासाहेब पाटील,शशिकांत शिंदे,नितीन पाटील आणि उपस्थित बंधू भगिनींनो..
आज रामशेठ यांचे स्वागत आणि सन्मान संस्थेच्या वतीने आज आपण या ठिकाणी करत आहोत. रामशेठ याचं आयुष्य हे अत्यंत कष्टात गेलं. रायगड सारखा जिल्हा एकेकाळी अनेक अडचणींमध्ये सापडला होता आणि त्या जिल्ह्यामध्ये रामशेठ जन्माला आले. त्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य एक होतं आणि आजही आहे की संकटं आहेत, प्रश्न आहेत पण त्या सगळ्यावर मात करून उभ राहायचं आणि जिल्ह्याच्या सामान्य लोकांना संघटित करून त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा.
दोन लोक त्या जिल्ह्यामध्ये असे होऊन गेले. एक भाऊसाहेब राऊत आणि दोन नारायण राघू पाटील. नारायण राघू पाटील यांनी त्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. भाऊसाहेब राऊतांनी त्या जिल्ह्याचे नेतृत्व केलं. महारा���्ट्राची विधानसभा आणि देशाची लोकसभा इथं आपलं कर्तृत्व दाखवलं आणि नंतरच्या काळामध्ये डी.बी पाटील असतील, दत्तूशेठ असतील, वाजेकर असतील आणि रामशेठ असतील यांनी या स��ंध जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये आणि विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देऊन जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचं काम त्या काळात केलेलं होतं आणि हे काम आम्ही रोज अगत्याने बघत आलोय.
हा जिल्हा संघर्षाचा जिल्हा आहे.लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर शांत न बसणारा जिल्हा आहे. अनेकदा मी गेलो. त्यातले अनेकदा मी संघर्षाच्या निमित्ताने गेलो. रामशेठना आठवत असेल. दापोलीला गोळीबार ��ाला होता आणि आपण दोघेही तिथं होतो.काही लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी तिथल्या लोकांना आधार द्यायचं काम आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं.
असा गोळीबार होतो किंवा संघर्षाच्यासाठी दुसरं काही कारण असो.ही अखंड संघर्षाची मालिका या जिल्ह्यात चालत आली आहे,आणि त्यामुळे हे काम,हा विभाग,हे क्षेत्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील गरिबांच्या घरी मुला-मुलींना ज्ञानदानाची कवाडं खुली झाली पाहिजे आणि त्यासाठी काही करावं लागलं तर मुक्तहस्ते करायचं हे सूत्र या जिल्ह्याच्या सबंध नेतृत्वाने वर्षानुवर्ष केलं आणि त्यापैकी रामशेठ एक आहेत.
सामान्य कुटुंबातून,कष्टातून पुढे आलेले, रयतेमध्ये शिक्षण घ्यायचे संधी मिळाली आणि परत त्याच्यानंतर रामशेठ असोत,समोर बसलेले म्हात्रे असोत या सगळ्यांनी स्वतःच्या कष्टाने एक कर्तुत्वाचा डोंगर त्या भागामध्ये उभा केला आणि हजारो हातांना काम कसं देता येईल,त्यांना सन्मानाने राहता कसा येईल ही भूमिका घेतली.
अलीकडच्या काही काळामध्ये रामशेठनी सगळा व्यवसाय सोड��न दिला. ते देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्हा लोकांसोबत होते, महाराष्ट्रातल्या सार्वजनिक कामात काही प्रश्न असतील तर त्याच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घ्यायला आमच्या सोबत असतं आणि रयत शिक्षण संस्था त्यांच्या दृष्टीनं सर्वस्व आहे रयतच्यासाठी कोणत्याही प्रकाराची काही नवीन गोष्ट घेतली जातयं हे कळलं कि रामशेठ हळूच सांगणार की माझ्या वतीनं एवढ. हे सांगणार आणि पाठवणार.
अलीकडच्या काळात ते सांगत���त, जे काही द्यायला हवंय ते तुम्हीच ठरवा. फक्त नाव जाहीर करू नका आणि रक्कम जाहीर करू नका. ठीक आहे. आम्ही तर नाव जाहीर करायचं काम सोडलं, रकमेचही सोडलं पण त्याबाबतची कमतरता रयतला कधी भासली नाही कारण कुठलंही काम म्हटलं की रामशेठ आम्हा सगळ्यांच्या मागे आहेत हे आम्ही गेले अनेक दशकं बघतो आहे.
आज त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय ते त्यांना ७५ वर्ष झाली म्हणून. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. अनेक कुटुंब उभी केली. नवनवीन उपक्रम हातात घेतले,आणि आहे हे दातृत्व रायगड प���रतं सीमित न ठेवता जिथं रयत आहे त्यांच्यासाठी रामशेठ आणि त्याचं कुटुंब हे कायम उभं राहिलं आहे आणि त्यामुळे रयतच्या सगळ्या कुटुंबीयांनी निर्णय घेतला की रामशेठ आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपण बोलवूया आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना सन्मानित करूया.
ही सन्मानित करण्याची संधी त्यांनी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि एवढेच सांगतो तुम्ही हे जे समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे त्यामागं तुमचा हा जो दृष्टिकोन आहे त्याला आम्हा लोकांची कायमची साथ ही तुमच्या पाठीशी असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हा सर्वांची रजा याठिकाणी घेतो.