खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी शिकवण देणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, शिक्षक साने गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#सानेगुरुजी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन!
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा प्रागतिक विचारांचा वारसा जपत, पक्ष संघटना अधिक सक्षम करत, राज्याच्या शेवटच्या घटकासाठी काम करण्याचा निर्धार करूया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व निष्ठावंत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना २७ व्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!
@NCPspeaks@PawarSpeaks
जल, जंगल आणि जमीन या हक्कांसाठी अन्यायाविरुद्ध निर्भयपणे लढत स्वाभिमानाची ज्योत तेवत ठेवणारे महान जननायक, थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, शौर्य, सुशासन आणि लोककल्याणकारी विचारांना मानाचा मुजरा !
महाराजांनी दिलेला स्वाभिमान, न्याय, सर्वसमावेशक विकास आणि जनतेप्रती उत्तरदायित्वाचा आदर्श आपल्या कार्यातून जपण्याचा संकल्प करूया.
जय शिवराय ! जय महाराष्ट्र ! 🚩
#ShivrajyabhishekSohala #ChhatrapatiShivajiMaharaj
निसर्गाचे संवर्धन ही आजची गरज आणि उद्याच्या सुरक्षित भविष्याची हमी आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विकासाचा मार्ग स्वीकारणे, नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि हरित जीवनशैलीचा अंगीकार करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा संकल्प अधिक दृढ करूया.
#WorldEnvironmentDay
सामान्य माणसाच्या प्रश्नांना राजकारणाच्या केंद्रस्थानी आणणारे, जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे आणि संघर्षातून नेतृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे लोकनेते,माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#गोपीनाथ_मुंडे#GopinathMunde
सायकल म्हणजे फिटनेस, पर्यावरण आणि आनंदाचा संगम!
आरोग्य आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी संतुलित ठेवण्याचे कार्य सायकल करते. त्यामुळे सायकलचा वापर निश्चितच वाढवायला हवा.
सर्व सायकलस्वारांना “जागतिक सायकल दिनाच्या”हार्दिक शुभेच्छा !
#जागतिक_सायकल_दिन#World_Bicycle_Day_2026
📍 राममूर्ती
मौजे राममूर्ती ता.जालना येथे श्री. शेषराव नारायणराव भुतेकर यांच्या हॉटेल वसुंधराचे उद्घाटन करण्यात आले.भुतेकर यांनी उभा केलेला नवीन व्यवसाय वृद्धिंगत होत जावो,या सदिच्छा व शुभेच्छा..!
दै. लोकमतच्या ‘महाराष्ट्राचा महासरपंच’ उपक्रमातील गुणवंत सरपंचांचा गौरव!
📍जालना
दै. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्राचा महासरपंच’ या अभिनव उपक्रमांतर्गत मौजे सुखापुरी ता.अंबड या ग्रामपंचायतने जलसंधारणामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्ह्यातून 'प्रथम क्रमांक' मिळाल्याबद्दल लोकमत समूह ,बीकेटी टायर्स, टाटा सोलर, संतूर साबण,आणि आयटेल यांच्याकडून सुखापुरी गावचे आदर्श सरपंच श्री.भगवानराव राखुंडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!
तसेच ग्रामीण नेतृत्वाला प्रोत्साहन देणारा आणि ग्रामविकासाला नवी दिशा देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, याबद्दल दै. लोकमत वृत्तपत्र समूहाचे मनःपूर्वक अभिनंदन.!.
#महाराष्ट्राचा_महासरपंच #लोकमत #जालना #ग्रामपंचायत #सरपंच_अॅवार्ड #आदर्श_गाव
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आपल्या मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी आवाजाने त्यांनी हिंदी, मराठीसह अनेक भाषांतील गीतांना अजरामर केलं. त्यांच्या गीतांनी भारतीय संगीतसृष्टीला समृद्ध करत अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक सुवर्णमयी पर्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
परभणी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.श्री.संजय उर्फ बंडू (बॉस) जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा..!आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!
📍 हस्ते पिंपळगाव
मतदार संघातील मौजे हस्ते पिंपळगाव येथील स्व.निवृत्ती देवराव मगर यांचे निधन झाले.आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली..!
📍 परभणी
सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा – सामाजिक एकतेचा सुंदर उत्सव !
आज परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शरदचंद्रजी पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी मा.भीमराव हत्तीअंबीरे यांच्या पुढाकारातून संबोधी अकादमी,महाराष्ट्र आयोजित संबोधी अकादमी महाराष्ट्र
25 वा रौप्यमहोत्सवी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.समाजातील एकता आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ करणारा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे.
यावेळी मा.ना.मेघनाताई साकोरे-बोर्डीकर,पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.विजयजी गव्हाणे, डॉ. सुक्रे,बन्सीधर शेळके उपस्थित होते.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी अभिवादन..!
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जालना येथील स्मारकस्थळी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी जालना महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती.वंदना अरुण मगरे, उपमहापौर श्री.राजेश रामभाऊ राऊत, दयाळकर सर यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी कुशाग्रतेने, जनहित जोपासत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. जनसेवेचे व्रत अंगिकारून, अनेक लोककल्याणकारी योजना राबवून प्रजेचे हित जपणाऱ्या उत्कृष्ट राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
#ahilyabaiholkar
📍 मानेपुरी
मतदार संघातील मौजे मानेपुरी येथील श्री.अरुण वाघ यांच्या आईचे निधन झाले.आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली..!
📍विहामांडवा ता.पैठण
मतदार संघातील मौजे रेणापूरी ता.अंबड येथील श्री.वैभव व्यंकटराव कवडे यांनी विहामांडवा येथे नवीन सुरू केलेल्या शिवकृपा कृषी सेवा केंद्राला आज भेट दिली.कवडे यांनी उभा केलेला नवीन व्यवसाय वृद्धिंगत होत जावो,या सदिच्छा व शुभेच्छा..!
📍विहामांडवा ता.पैठण
मतदार संघातील मौजे भांबेरी ता. अंबड येथील माजी सरपंच श्री.सहदेव भारती यांनी विहामांडवा येथे नवीन सुरू केलेल्या कृषीधन ऍग्रो एजन्सीचे उद्घाटन उदघाटन करण्यात आले.भारती यांनी उभा केलेला नवीन व्यवसाय वृद्धिंगत होत जावो,या सदिच्छा व शुभेच्छा..!
यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.