Furthermore, should anyone attempt to incite a ‘cultural frenzy’ under the guise of religious worship, plunder Maharashtra and tarnish its cultural heritage, (though I doubt anyone would dare) do not take our restraint as a sign of cowardice! The North Indian and Gujarati communities must also realize that these people are merely pitting you against us to serve their own selfish interests. And if you choose to join them and confront us, be advised: this is Maharashtra! This is the land of the Marathas!
To the BJP, I say: try to come up with something new, rather than constantly stoking conflicts based on religion, region, or caste! To my fellow Marathi brothers and sisters, and to my 'Maharashtra Sainiks': do not fall into their trap but remain vigilant! We shall make the right decision at the right time!
Raj Thackeray
Jai Maharashtra,
The Bharatiya Janata Party (BJP) and the toxic social media ecosystem it nurtures are currently making desperate attempts to incite conflict in Mumbai, Maharashtra, by exploiting the issue of 'Chhath Puja'.
To this end, they are circulating reels on social media depicting the rituals and what they frame as a ‘cultural invasion’ stemming from them. As if that weren't enough, they even attempted to play Bhojpuri music at certain railway stations in Mumbai, which was promptly shut down by the Maharashtra Navnirman Sena (MNS) anyway.
Yet, the BJP remains frustrated because the conflict they so desire has failed to materialize. All this frantic maneuvering is being orchestrated with an eye on the upcoming elections in Uttar Pradesh.
It appears that the BJP’s ‘think tank’ has suffered a decline in its intellectual capacity. The ‘divide and rule’ tactic which they have relied upon for years to win elections is no longer effective. Whenever Lok Sabha elections approach, they stoke Hindu-Muslim tensions; they parade women wearing burqas through public grounds and parks, aiming to frighten the public by suggesting that 'the other' has now encroached upon their own spaces. The social media is rife with videos, often staged, featuring individuals, including men, dressed in burqas to manufacture fear. When state-level elections draw near, they sow the seeds of caste-based hatred. Last year, in a bid to win the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) elections, they manufactured ‘Gujarati versus Marathi’ conflict, centered around the issue of feeding pigeons (kabutarkhana). I have often stated in my speeches that the BJP cannot win elections based on their actual performance; instead, they engineer conflicts between groups and secure victories on the back of the blood spilled in those clashes. Of course, this is largely a superficial spectacle, as the real work is done by the Election Commission. But it provides them with a convenient narrative to explain how they achieved their 'victory'.
Spurred by the 'Gen Z' movement, the journey toward the Bharatiya Janata Party’s (BJP) ouster from power, both at the Centre and in the states, has begun. It is bound to happen soon! This has left the BJP and its mentors completely rattled. They fear that once out of power, the ghosts of everything they have done over the last 12 to 14 years will come back to haunt them. Regardless, whatever is destined to happen to them, will happen!
I urge the Marathi people: there is no need for us to fight on the battlefield of their choosing. That is not the ‘Maharashtra way.’ They may have forgotten Chhatrapati Shivaji Maharaj’s guerrilla warfare tactics, but we must remember it. We shall decide how and when to respond using these tactics. We must not fall into the traps they have laid for their own selfish ends.
The BJP has ruined the nation, destroying the social harmony and tolerance that once existed. The same is happening in Maharashtra. Acting on directives from the Centre, they are effectively selling off Maharashtra piece by piece, to a single industrialist and his cronies, stripping the state bare from every direction. They have even begun to hollow out the Sahyadri mountain range. The very land where our Chhatrapati Shivaji Maharaj and his loyal warriors once lived. Forests are being handed over, lands are being signed away; whatever that industrialist sets his eyes upon in Maharashtra is being gifted to him. Yet we remain seemingly indifferent. I have often said that I have never encountered a society as unvigilant as the Marathi community. A people who wake up to an incident, only to fall back into a slumber and forget everything within a day or two. The Marathi people must not forget what is unfolding all around them. We must express our anger at the right moment; only then do we earn the right to invoke the name of Chhatrapati Shivaji Maharaj!
सस्नेह जय महाराष्ट्र,
भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय.
त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा.
पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी.
भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घा���ून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्��ावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं!
जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच !
माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं ��े आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की.
भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथ�� नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य ��ेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो !
बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते !
भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घे�� !
राज ठाकरे ।
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुम���ी सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्जत येथे सभे��ा संबोधित केलं.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे म्हणल्यावर कर्जत येथे इंटरनेट बंद केलंय म्हणे. इंटरनेट बंद केलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो का? नुसतं कर्जतमध्ये बंद केलंय, पण बाकी अख्खं जग बघतंय. अर्थ्या तासात सगळं भाषण युट्युबवर पडेल मग सगळं जग बघेल. हे लोकं कोणत्या जगात जगतात तेच कळत नाही. मनात काळं असेल तर अशा गोष्टी करायच्या सुचतात.
* आज सकाळी जंगलात जी झाडे तोडली आहेत ती बघायला गेलो होतो, तिथं लाकडं रचून ठेवली होती. तोडलेल्या झाडांची रचलेली लाकडं पाहून जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखं वाटलं.
* हे राज्यात बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केंद्रात बसलेल्या दोघांकडून शून्य किंमत आहे. कोणता प्रकल्प करायचा, कसा करायचा हे सगळं दिल्लीत ठरतं.
* मी पूर्वीपासून सांगत होतो, हा महाराष्ट्र जर या दोघांच्या हातात गेला तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हातात राहणार नाही.
* आज तुम्ही रडत बसता आणि निवडणुकीच्या तोंडावर जातीच्या, धर्माच्या नावावर यांना मतदान करता. परत पुढचे पाच वर्ष रडत बसता. किती काळ हे चालू राहणार.
* आमच्या लाडक्या बहिणींना १५०० रुपये देतायत. हे १५०० रुपये देऊन तुमची तोंडं बंद केली जात आहेत.
* त्यादिवशी मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकत होतो. मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले, केंद्राने आणि एका खाजगी कंपनीने ठरवून आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर हा प्रकल्प सुर��� झाला. हे सगळं केंद्रात ठरतं हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं.
* सत्तेची भिती, पदाची भिती या भितीमधून या गोष्टी घडतात. हा असा गप्प, शांत राहणारा, मान खाली घालून चालणारा हा महाराष्ट्र? गुजरातमधली २ माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार?
* आज मी जंगलात भेट दिली तेव्हा मला महिला भेटल्या. हात जोडून विनंती करत होत्या, आमचं जंगल वाचवा. तुमच्यावर हात जोडायची वेळ येते? तुमचे कोयते काय करतात अशावेळी ?
* आज भीमाशंकरचा प्रकल्प आलाय. त्याचं टेंडर वगैरे काही नाही असाच देऊन टाकलाय. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अशाच प्रकारचे एकूण २३ प्रकल्प येत आहेत.
* यापुढे महाराष्ट्रात जे खाजगी प्रकल्प येत आहेत. त्यांना जे पाणी आणि वीज लागणार आहे त्याची तरतूद व्हावी यासाठीची पूर्वतयारी म्हणून हे प्रकल्प सुरू केले जात आहेत
* या सगळ्यातून तुमचे मतदारसंघ फोडले जात आहेत असे प्रकल्प आले की तुम्ही आहात त्या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होणार. आणि तिथे दुसरे लोकं स्थायिक होणार. हे सगळं तुम्ही समजून घेतलं पाहिजे.
* सर्बियामध्ये तरुणांनी, तिथल्या जेनझीने सत्तापालट करून दाखवला. मी आधीही माझ्या भाषणांत सांगितलंय जेनझी या महाराष्ट्राच्या खेडापाड्यातसुद्धा आहे. तुम्ही कधी जागे होणार आहात?
* तुम्ही जर शांत बसणार असाल तर मला तुमचं नेतृत्व नाही करायचं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणायचं आणि पेटून उठायचं नाही याला काय अर्थ आहे?
* गडचिरोलीत ��ेतीची सुपीक जमीन आणि जंगलातली झाडे कापून ती जमीन एका खाणीसाठी दिली.
* जंगलातली झाडं जेव्हा तोडली तेव्हा त्या झाडावर राहणारे पक्षी वर हवेत घिरट्या घाल��� होते. ही घिरट्या घालायची वेळ पुढच्या काळात तुमच्यावरसुद्धा येणार आहे.
* हे सगळे प्रकार, त्यासाठी केलेली आंदोलनं, मोर्चे हे तुम्ही निवडणुकीच्यावेळी लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर उपयोग काय या सगळ्या आंदोलनांचा?
* ज्या सह्याद्रीत शिवछत्रपती खेळले, बागडले तो सह्याद्री आज महाराष्ट्राचेच लोक संपवत आहेत. आणि महाराष्ट्रातला नागरिक हताश होऊन बघत बसला आहे. याबद्दल शिवछत्रपतींना काय वाटत असेल, याचा एकदा विचार करा.
* या सगळ्या अन्यायाविरोधात जर आपल्याला लढता येत नसेल तर परमेश्वरच वाचवू शकेल या महाराष्ट्राला.
* शिवरायांनी आज्ञापत्रात सांगून ठेवलंय कोणतंही झाड कापले जाऊ नये. निदान त्या शिवछत्रपतींचं तरी ऐकणार आहोत की नाही आपण?
* महावितरणचा IPO डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकार लाँच करणार आहे. म्हणजे यापुढे तुमच्या घरात येणाऱ्या वीजेचा दर हे सरकार नाही तर एक खाजगी कंपनी ठरवणार आहे.
* जिथे जिथे महाराष्ट्रावर संकट येईल तिथे महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे. हा महाराष्ट्र वेगवेगळा ठेऊन चालणार नाही नाहीतर यांना जे साध्य करायचंय ते साध्य होईल.
* उद्या टोरंटचा हा प्रकल्प ��ूर्ण झाल्यानंतर याचं वितरण कसं होणार आहे? कुठे होणार आहे? कुणामार्फत होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारने जरूर दिली पाहिजेत.
* तुम्हाला मी आत्ता सांगतो, आज या गोष्टी तुम्ही हसण्यावारी नेत आहात. भविष्यात तुमची पोरं म्हणतील, माझा बाप नालायक निघाला. जेव्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तेव्हा लक्ष दिलं नाही.
* जर तुम्ही जागे असाल आणि पेटून उठलात तर त्या एकाच गोष्टीला ज���ातलं कोणतंही सरकार घाबरतं.हे जर नको असेल तर लोण्यासारखे थंड बसा.
* जर आपली जंगलं वाचवायची असतील तर शिवछत्रपतींचे आज्ञापत्र वाचा. महाराष्ट्रातला माणूस पेटून उठला या गोष्टीचा शिवछत्रपतींनाही आनंद वाटेल.
* मी उद्योगधंद्यांविरोधातला माणूस नाही, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हे माझंही मत आहे. पण महाराष्ट्राला काय हवं आहे हे महाराष्ट्रातल्या माणसांनी ठरवलं पाहिजे. दुसरं कोणी ठरवून चालणार नाही.
* मला फक्त एवढंच सांगायचंय जिवंत रहा. जी लढाई करायचीय त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचंय. मी तुमच्या बरोबर आहे पण नेतृत्व तुम्हालाच करायचंय. मलाही बघायचं आहे, महाराष्ट्र जिवंत आहे की नाही.
* शिवछत्रपतींच्या म���त्यूनंतर सुद्धा १२५ वर्षे या संपूर्ण हिंद प्रांतावर मराठ्यांनी राज्य केलं. तो मराठी माणूस आज शांत कसा बसलाय?
* मला पोलिसांनाही सांगायचंय त्यांना साथ देऊ नका. तुम्हीही या महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत. उद्या तुमच्याही घरावर टकटक होणार.
राज ठाकरे ।
आज २८ ऑक्टोबर ��र्जत येथे टोरेंट कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी जी बेसुमार जंगलतोड सु��ु केली आहे त्या जागेला भेट दिली. गुजरातमधल्या एका कंपनीला काम मिळावं म्हणून हा सारा खटाटोप सुरु आहे .
बाकी आज संध्याकाळच्या कर्जत येथील पोलीस ग्राउंडवरच्या सभेत सविस्तर बोलेनच.
आज २६ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूकदार मेळाव्याला, वाशी नवी मुंबई येथे संबोधित के��े..
ई-चलानला कोणाचाही विरोध नाही. परंतू ते ज्या प्रकारे लावले जातात ते तपासलं पाहिजे.
आपल्या वाहतूकीचा प्रश्न मी ��नेकदा भाषणांमधून बोलून दाखवला आहे. तो पुढील काळात आणखी आक्राळ-विक्राळ होणार आहे. मला या देशातलं ट्रॅफिक बघितल्यानंतर या देशाचा वर्तमान आणि भविष्य दिसतं.
आपल्याकडे केवळ फ्लायओव्हर आणि ब्रिजेस बांधले जातात. ते बांधत असताना ट्रॅफिकबाबत कोणत्याही प्रकारचा विचार केला जात नाही.
मला पोलीस संरक्षण असूनही माझी माझ्या सर्व चालकांना सक्त ताकीद आहे, कितीही घाई असली तरीही सिग्नल मोडायचा नाही.
रोज किती नवीन गाड्यांचे रजिस्ट्रेशन होतायत, किती गाड्या रस्त्यावर येतायत, कुठे किती लोकं राहायला येतायत कुणालाही माहिती नाही. आणि शेवटी या सगळ्याचा ताण येतो आमच्या पोलिसांवर येतो.
उद्या जर कधी मुंबईची लोकल कोलमडली आणि सगळे जर स्वत:च्या गाड्या घेऊन रस्त्यावर आले तर काय होईल? कशाचंही नियोजन नाही आणि आपण फक्त सांगायचं आपला जीडीपी ७.८ टक्के झालाय. त्याचा काय उपयोग?
खरंच मी वाट बघतोय, हा मह���राष्ट्र माझ्या हातात ��त्ता कधी देतोय याची. या सगळ्या गोष्टींना शिस्त लावायला रॉकेट सायन्स लागत नाही त्यासाठी फक्त इच्छाशक्ती लागते.
I shared a documentary by Sabir Bhatia on my social media detailing the long-standing friendship between Gautam Adani and Narendra Modi, and how the Indian industrial landscape is consequently being handed over to Adani. It garnered over 4.8 million views on Twitter alone and received an overwhelming response on Facebook as well, not to mention the additional, uncounted views from shares by others.
My intention was for this serious issue to reach the public, and that objective has been achieved. While Sabir Bhatia produced this documentary recently, I had already delivered a major presentation back in January 2026 at Shivtirth in Mumbai, illustrating how the Adani Group is effectively setting out to swallow the entire nation.
That presentation received an exceptional response, and those videos remain available on my social media to this day. In fact, some clips from our presentation were even incorporated into this documentary. Anyways.
I have clarified my stance on this matter time and again: my opposition is not directed at any specific individual, but rather against the rise of a monopoly. I have often stated in my speeches that the Prime Minister should foster the growth of many industrialists across the country, creating vast employment opportunities and generating immense wealth for the nation, and empower them to conquer global markets.
However, if the government chooses to favor only one person to the point where it poses a threat to the nation, we oppose it and will continue to do so. My opposition is, therefore, directed against any form of monopoly, whether it involves Adani or anyone else.
Even now, the central government has directed the state government to hand over several hundred hectares of forest land in Bhimashankar to the Gujarat-based Torrent Group. This government has handed over vast tracts of forest and wilderness land in Maharashtra to a select group of industrialist friends, and it plans to hand over even more! I care little about which political party anyone belongs to; however, as citizens of Maharashtra, how can you remain so indifferent while our state is being sold off right before your very eyes? Does it not even spark a sense of outrage among our Marathi Members of Parliament, MLAs, and ministers to see this happening? Such total submission to power is entirely inconsistent with the history, traditions, and culture of Maharashtra. Why, then, do you bother raising slogans in the name of Chhatrapati Shivaji Maharaj or putting on a farce by singing the state anthem? Anyway..
Sabeer Bhatia’s documentary received such an overwhelming response that it was only natural for those in power to grow anxious, fearing that their secrets might be exposed. The intensity of this fear must have been significant, as I received a request, conveyed through the Mumbai Police Commissioner, to take it down.
My primary objective, both during the meeting in January 2026 and through the subsequent posting of this documentary, was and remains, to enlighten the nation. However, the request I received came from the Mumbai Police Commissioner. The Mumbai and Maharashtra Police forces are among the most efficient in the country, and I have always held them in high regard. Out of respect for the head of the Mumbai Police, I am choosing to honor this request.
Therefore, I am deleting the post containing the documentary. The fire has already been ignited. In January 2026, from Shivteerth, I ignited a spark against the authoritarianism in this country, that has now grown into a raging wildfire. Our struggle continues. Our post from January 2026 remains exactly where it was, and it will stay there. The documentary we shared was produced by others; our sole objective was to ensure it reached the public, a goal that has been achieved. On this occasion, I am bringing our well-researched analysis of this subject back into the spotlight. I am re-sharing a portion of our January 2026 presentation here; please take another look.
गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर ���िळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही.
थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी ��क मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं.
त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो.
या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाही���ा विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी.
पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही रा��ील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे.
आत्ता देखील ��पल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फा���्स करता ? असो..
पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी.
मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्त��ंची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच.
म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ’फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नविन धार्मिक ध��रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. ही क्लिप खरंतर २९ मिनिटांची आहे. त्यातल्या ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी.
मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. ��ॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे ! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यांत बोललं ग���लं आहे याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा २ वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली ? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय , आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घु��वू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे ��णि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल.
महाराष्ट्रातील ३२५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून, या गंभीर परिस्थितीचा आज मुंबईत ग्रामीण भागातील माझ्या पदाधिकारी सहकाऱ्यांशी भेटून सविस्तर आढावा घेतला.
यावेळी दुष्काळग्रस्त भागांतील परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामीण जनतेला भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. याचदरम्यान पत्रकारांशी संवाद साधत दुष्काळाच्या प्रश्नासह राज्यातील इतर राजकीय घडामोडींवरही भूमिका मांडली.
आज माझ्या हस्ते मुंबई प्रेस क्लबच्या इमारतीत छायाचित्रकार श्री. गजानन दुधाळकर यांच्या 'डान्स ऑफ डेमोक्रसी' या छायाचित्र प्रदर्शनाचं उदघाट्न झालं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद झाला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे...
२०१८ पासून मी बॅलेटपेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतोय. त्यावेळी मी देशा���ील अनेक नेते आणि निवडणूक आयुक्तांनाही भेटलो होतो. त्यावेळी मी काय बोलतोय हे लोकांना कळाल�� नाही ते आता कळतंय.
• मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी. मी मतदान करतोय याचं समाधान मला असलं पाहिजे.
• जगातील बहुतांश पुढारलेल्या देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होतं. फ्रान्समध्ये एका मतदाराने तक्रार केल्यानंतर तिथली ईव्हीएम मशीन्स बंद करून बॅलेट पेपरवर मतदान सुरू झालं मग भारतात ईव्हीएम मशिन्स कशाला हव्यात?
• पुढच्या साधारण ३ ते ४ महिन्याांमध्ये या देशात काहीतरी मोठी गडबड होईल एवढं निश्चित.
• पुढील काळात सरकारमधल्या अनेक गोष्टी समोर येतील. सरकार चुकांवर चुका करत राहील त्यातून काही महिन्यांमध्ये संपूर्ण देश रस्त्यावर आला तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
• सरकारने महाराष्ट्रातील ३००-३२५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. ही परिस्थिती आणखी खराब होणार आहे आणि कोणतीही पूर्वतयारी नसल्याने ती परिस्थिती सरकारला झेपणार नाही.
• अमेरिकेत��ल कलाकार राष्ट्राध्यक्षांविषयी मत मांडतात म्हणून लगेच त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घातला जात नाही. आपल्याकडे त्याच भीतीने अनेक कलाकार बोलत नाहीत.
• शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठीचार्ज केला, पोलिसांच्या गणवेशात तुम्ही तुमच्या पक्षाचे लोकं घुसवलेत, तुम्ही हंगामा केला, मुलांनी काहीच केलं नव्हतं.
• सबीर भाटीया यांनी अदानींवर एक डॉक्युमेंट्री बनवली आहे, ती काढून टाकायला सांगितलं आहे. कशाला काढायची? लोकांना पाहुदेत. प्रत्येक वेळी भाजपने स्पॉन्सर केलेलेच चित्रपट पाहायचे का आ���्ही?
• नागरी सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. हीच परिस्थिती जर भारतीय जनता पक्ष विरोधात असताना घडली असती तर ते काय बोलले असते?
• लॉरेन्स बिश्नोईसारख्या लोकांना जेलमधून बाहेर काढून फटकावून काढला पाहिजे. त्याशिवाय कायद्याची भीती कशी राहिल?
• मी अनेकदा हे सांगितलं आहे, आपल्याकडे लॉ आहे पण ऑर्डर नाही. माझा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे, ���्यांना फ्री हँड दिला तर ते क्राईम रेट शून्यावर आणतील.
• गेल्या काही वर्षांमध्ये देशात साचलेल्या गोष्टी फार काळ ��बून राहू शकत नाहीत. प्रत्येकाचा राग हा एक ना एक दिवस बाहेर येईल.
There is a documentary on Netflix titled ‘How to Become a Tyrant’. It appears Amit Shah might be watching it seriously every day. Instead of that, you should read about the peaceful protests and the freedom movement led by Mahatma Gandhi, who hailed from the very same Gujarat you come from. I wonder why I even have such expectations of them! Anyway...
Just because you are in power today, don’t be under the illusion that you will remain so forever. You were not born with a guarantee of eternal power. Recall examples from around the world of how the very people turn against a ruler with a dictatorial mindset once they lose power. Forget the rest of the world; even a look at India's history reveals how this nation humbled everyone from the Mughals and the Portuguese to the British, who once arrogantly claimed that the sun never sets on their empire. Do you, the current rulers, really think the people here won't bring you down to earth too? As a government, you are expected to show maturity; if you lack it, then learn it and internalize it.
Everyone has the right to protest, and that right must undoubtedly remain inviolate!
Raj Thackeray
“No nation can be grateful at the cost of its liberty” - these are the words of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar. He made this profound statement while presenting the draft of the Indian Constitution in November 1949. The nation's values of freedom and expression must never be jeopardized for the sake of blind devotion to a leader or to indulge their eccentric behavior.
This statement needs to be reiterated today because the duo of Modi and Shah harbors an extreme authoritarian mindset. Leveraging this authoritarianism, they captured the country's institutions to seize power. Power that is now being wielded solely to serve the interests of a handful of industrialists. If protesters are to be crushed and arrested simply for opposing this arrogant abuse of power or demonstrating against it, then this unchecked tyranny must be uprooted from the country, from the grassroots to the highest levels.
Are protests forbidden in this country? Are questions not to be asked? Who are you to snatch away the right to protest? Protests have been ongoing in Delhi since October 3rd, demanding the resignation of the corrupt Chief Election Commissioner, Gyanesh Kumar. Using the Delhi Police as an instrument, the government not only crushed protesters but also harassed the female journalists covering the agitation.
Fearing protests in Delhi today, you have shut down metro services, blocked roads, suspended internet and bus services, and are even detaining protesters directly from flights. What kind of approach is this? Young men and women in their twenties and thirties across the country are restless; they cannot see a future for themselves. That is why they are taking to the streets to protest peacefully, and you are trying to crush them? With what face will Modi go around the world claiming that our country is democratic? Is this democracy?
I don’t understand this immense love for Gyanesh Kumar. Is it because Gyanesh Kumar, and the election officials before him, are your instruments for seizing power? The Election Commission is an autonomous body. What’s wrong in demanding the resignation of its chief if he has messed up things? What’s wrong with wanting an honest and transparent electoral system? My right to vote is being taken away, I am unable to track where and to whom my vote is going. Don’t I have the right to express my anger when my vote is getting insulted this way? Or is it that the two leaders at the top fear that if Gyanesh Kumar is forced to resign and reveals the masterminds behind the vote theft, the entire charade of their power will be exposed?
Under Articles 19(1)(a) and (b) of the Indian Constitution, citizens have the full right to stage peaceful protests. Why do you wish to crush this right? Just yesterday, the Honorable Supreme Court asked, "Why use a sledgehammer to swat a fly?" Typically, the police department in Maharashtra detains protesters and then releases them, ensuring that citizens' constitutional rights remain intact in the process. But in Delhi, female journalists covering the protest have complained of harassment by the police after being detained. If those covering the protest are being harassed, what guarantee is there that the protesters themselves will be treated properly?
It appears that the anger over the youth of this country forcing you to yield and compelling Dharmendra Pradhan to resign has not yet subsided. During the Anna Hazare agitation, Modi and Shah allowed protests to take place in Gujarat because it served their interests; yet, while in power in that very state, they crushed numerous protests against their own government. In short, their hypocrisy and double standards are glaringly obvious.
आज आपण सत्तेत आहोत म्हणजे अनंत काळापर्यंत असू ही अपेक्षा बाळगू ��का. तुम्ही काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही आहात. जेव्हा सत्तेतून एखादा हुकूमशाही मानसिकतेचा सत्ताधारी जातो त्यानंतर त्याची जनताच कशी पळताभुई करतात याची जगभरातील उदाहरणं आठवा. जगभरातील सोडा भारताचा इति��ास वाचलात तरी कळेल जिथे मुघलांपासून, पोर्तुगीजांपासून ते आमच्या साम्रज्यावरचा सूर्य मावळत नाही असा माज करणाऱ्या ब्रिटिशांचा जिथे या देशाने माज उतरवला, तिथे स्वकीयांचा माज इथली जनता उतरवणार नाही, असं वाटतंय का तुम्हा सत्ताधाऱ्यांना ? सरकार म्हणून तुमच्याकडून मॅच्युरिटीची अपेक्षा आहे, ती नसेलच तर शिकून घ्या, आत्मसात करा.
आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आणि त��� अबाधितच राहिला पाहिजे हे निश्चित !
राज ठाकरे ।
"No nation can be grateful at the cost of its liberty" हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते.
एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी क��ंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.
हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे !
या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञाने�� कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं.
आज दिल्लीत आंदोलनं होतील या भीतीने दिल्लीत मेट्रो सेवा बंद केलीत, रस्ते अडवलेत, इंटरनेट सेवा बंद केली आहे, बस सेवा थांबवली आहे, आंदोलकांना विमानातून उचलून नेलं जात आहे. ही को���ती पद्धत ? देशातील २०,३० वर्षांचे तरुण तरुणी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ती शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी जाऊन आमच्या देशात लोकशाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत ? ही असली लोकशाही?
मला समजत नाही या ज्ञानेश कुमारबद्दल इतकं प्रेम का ? ज्ञानेश कुमार आणि त्या आधीचे निवडणूक अधिकारी हे तुम���े सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून ? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्या प्रमुखाने काही ��ोंधळ घातला असेल तर त्याचा राजीनामा व्हायलाच हवा. तसंच संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही प्रामाणिक आणि पारदर्शक असायला हवी या मागणीत गैर ते काय ? माझ्या मताचा अधिकार काढून घेतला जातोय, किंवा माझं मत कुठे आणि कोणाला जातंय हे मला समजत नाहीये. आणि त्यातून माझ्या मताचा अपमान होतोय हा राग व्यक्त करण्याचा अधिकार पण नसावा ? का वरच्या दोघांना भीती आहे की ज्ञानेश कुमारला राजीनामा द्यायला लागला आणि त्याने माझे मतचोरीचे करवते धनी कोण हे जर सांगितलं तर आत्तापर्यंतचं सत्तेचं सगळंच बिंग फुटेल म्हणून!
भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) आणि (ब) यानुसार नागरिकांना शांततेत निदर्शनं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार तुम्हाला का चिरडायचा आहे ? काल तर चक्क माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विचारलं, माशी मारायला हातोडा कशाला वापरताय ?. बरं आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं असं सहसा महारा���्ट्रात पोलीस डिपार्टमेंट करतं. आणि हे करताना नागरिकांच्या संविधानिक अधिकारांना धक्क��� बसणार नाही हे पाहतात. पण इथे दिल्लीत तर महिला पत्रकार ज्या हे आंदोलन कव्हर करत होत्या, त्यांच्या तक्रारी आहेत की पोलिसांनी स्थानबद्ध केल्यावर त्यांचा छळ केला म्हणून. जर आंदोलन कव्हर करणाऱ्यांचा छळ होत असेल तर आंदोलकांना नीट वागवतील याची काय खात्री ?
या देशातील तरुणांनी तुम्हाला झुकवलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला हा राग अजून शमला नाहीये असं दिसतंय. अण्णा हजारे ���ंदोलनाच्या वेळेस मोदी-शाह गुजरातमध्ये आंदोलनं होऊ देत होते कारण ती फायद्याची होती. पण त्याच गुजरातमध्ये त्यांनी सत्तेच्या काळात त्यांच्या सरकारच्या विरोधातील अनेक आंदोलनं चिरडली. थोडक्यात हे बेगडी आणि दुटप्पी आहेत हे स्पष्ट दिसतंय.
नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंट्री आहे, How to Become a Tyrant (tyarant म्हणजे जुलमी शासक ) ही डॉक्युमेंट्री बहुदा अमित शाह रोज गांभीर्याने बघत आहेत असं दिसतंय. त्यापेक्षा ज��या गुजरातमधून तुम्ही येता त्याच राज्यातून आलेल्या महात्मा गांधींनी शांततेतली केलेल्या आंदोलनांबद्दल आणि स्वातंत्र्य चळवळीबद्दल जरा वाचा. अर्थात यांच्याकडून मी अपेक्षा का बाळग���ोय हेच समजत नाही ! असो . . .