गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde@mpsc_office
शिवसेना प्रणित एसटी कर्मचारी सेनेच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मा. आ. बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, अडचणी व मागण्या सविस्तरपणे ऐकून घेण्यात आल्या.
“एसटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” अशी ग्वाही यावेळी बच्चूभाऊ कडू यांनी दिली.
आज छत्रपती संभाजीनगर येथे मा.बच्चू भाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. या अधिवेशनला राज्याच्या
कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनात ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांच्या प्रमुख मागण्याबाबत सभागृहात आवाज उठविणार आहे. तसेच ग्रामविकास मंत्री यांच्याकडे देखील विशेष पाठपुरावा करणार आहे.
माझ्या जन्मगावचे रत्न, विदर्भाच्या अनुशेषासह अनेक जनहिताचे प्रश्न सत्तेच्या ताकदीवर नव्हे, तर प्रचंड अभ्यास, निष्ठा आणि लोकहिताच्या तळमळीवर सोडवणारे आदरणीय माजी आमदार बि. टी. देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांचे कार्य, विचार आणि जनसेवेची परंपरा सदैव प्रेरणादायी राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
बच्चू भाऊ कडू यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
तात्पुरत्या दिव्यांगांना दिलासा; विशेष सहाय्य योजनांचे लाभ पूर्ववत सुरू राहणार.
दिव्यांगांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही, हा संघर्ष पुढेही सुरूच राहील!
उमरेड विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून पक्षसंघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार.
“गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” या संकल्पनेला बळ देत उमरेड विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा भगवा अधिक जोमाने फडकवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc
मुंबईतील बाळासाहेब भवन येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली.
२२ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात RGSA मार्फत थेट नियुक्ती आणि मानधन दुप्पट करण्यासाठी आम्ही सरकारकडे ठाम पाठपुरावा करणार आहोत.
जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी तसेच जुलमी ब्रिटिश सत्ता आणि शोषणाविरुद्ध लढा पुकारणारे, महान क्रांतिकारक 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
जय जोहार! जय आदिवासी!
गोंदिया-भंडारा येथे शिवसैनिक प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षवाढ आणि संघटन मजबूत करण्यासाठी हा प्रवेश सोहळा निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे.
अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सुधाकर पाटील भारसाखळे यांनी आज मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या समवेत सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही शिवसेनेत प्रवेश केला. अमरावती जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवणारा आणि संघटन विस्ताराला नवी ऊर्जा देणारा हा प्रवेश आगामी काळात निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आज अमरावती येथे शिवसेना विभागीय आढावा बैठक संपन्न झाली. आगामी काळात “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी तसेच शिवसेना पक्ष विस्तार यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस अमरावती संपर्कप्रमुख आ. किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आज रविभवन, नागपूर येथे शिवसेना पक्षाची पूर्व विदर्भ विभागीय बैठक उत्साहात पार पडली. पूर्व विदर्भात पक्ष विस्तारासाठी “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हा व्यापक कार्यक्रम येणाऱ्या काळात राबविण्यात येणार आहे.
या बैठकीस आ. कृपाल तुमाने, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. मनिषाताई कायंदे , मा. आ. चंद्रिकापुरे, शिवसेना संघटक किरण पांडव तसेच प्रमुख शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई येथील आय.एम.सी. हॅाल, चर्चगेट येथे शिवसेना पश्चिम विदर्भ संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आगामी निवडणूक, पक्षविस्तारासाठी गाव तेथे शाखा, शेतकरी संवेदना यात्रा ई. विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.