निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांच्या सेवा, त्याग आणि निष्काम कर्मयोगाचा वसा व वारसा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपणारे,श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईचे उपाध्यक्ष तथा श्री गाडगे महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त, संत गाडगे बाबांच्या संकल्पनेतील नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार, सेवाव्रती आदरणीय स्व. बापूसाहेब देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
माझे मित्र सहकारी दिनेशजी बुब यांच्या अमरावती येथील कार्यालयास भेट दिली. स्व. डॅा. गणेशची बुब यांचा लोकसेवेचा वसा दिनेश बुब यांच्या हातातून अविरत सुरू आहे. शिवसेना पक्षविस्तार व संघटन बांधणी वर चर्चा करण्यात आली.
🎬 शिव-प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२६चा कोल्हापुरातून शुभारंभ!
कोल्हापूर येथे आज "शिव-प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२६" अंतर्गत "मा. माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राष्ट्रीय लघुपट स्पर्धे" च्या अधिकृत शुभारंभ व अनावरण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर, मा. बच्चूभाऊ कडू तसेच प्रहार चित्रपट संघटनेचे प्रमुख संदीप मोहिते पाटील,चित्रपट, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
समाजपरिवर्तन, लोकाभिमुख नेतृत्व आणि प्रेरणादायी विषयांवर दर्जेदार लघुपट निर्मितीला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव नवोदित आणि अनुभवी फिल्ममेकर्ससाठी एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.
देशभरातील दिग्दर्शक, लेखक, निर्माते आणि फिल्ममेकर्सनी या राष्ट्रीय स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पन्हाळा-पावनखिंड मोहीम
हिंदवी परिवार (संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे) आयोजित पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्याचा १६ वे वर्ष आहे. छत्रपती शिवरायांनी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटून पावनखिंडीकडे काढलेला हा पराक्रमाचा मार्ग… तोच मार्ग, जिथे प्रत्येक पाऊल इतिहासाच्या गर्जनेस भिडतं.
गेल्या ३० वर्षांपासून हिंदवी परिवार या मोहिमेच्या माध्यमातून स्वराज्याच्या पराक्रमाला अभिवादन करत आहे. त्या पवित्र वाटेवर चालण्याची संधी आम्हाला लाभली, हे आम्ही आमचं सौभाग्य मानतो.
जय भवानी! जय शिवराय!
मा. बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते छ. संभाजीनगर येथे “उमेद” दिव्यांग स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना इग्नाइट अकॅडेमीच्या स्पर्धा परीक्षा ऑनलाइन कोर्ससाठी १००% शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठीः ८८८८ ९९६११६
सांगोला येथे स्व. आ. गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले.
विधानसभेत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला लाभली. तळागाळातील जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर केलेला संघर्ष, साधी राहणी आणि लोकहिताची बांधिलकी कायम प्रेरणादायी राहील.
सावकारीच्या जाचाला कंटाळून लातुर जिल्ह्यातील नणंद गावातील तब्बल २५ कुटुंबांना गाव सोडून पलायन करावे लागले. ही वेदना ऐकण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांनी रात्री १२.४५ वाजता, मुसळधार पावसातही सभा घेतली.
पावसाळी अधिवेशनातही त्यांनी बेकायदेशीर सावकारी आणि फायनान्स कंपन्यांच्या मनमानीचा मुद्दा सभागृहात ठामपणे मांडला होता. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे, त्यांना कायदेशीर संरक्षण आणि न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.
पेपरफुटीच्या विरोधात मुळ संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांनी उभारलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीच्या लढ्याचे प्रभावी उदाहरण ठरले. त्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे हा लढा यशस्वी झाला.
आज संभाजीनगर दौऱ्यादरम्यान अभिजीत दिपके व त्यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येक लढवय्याला माझा सलाम!
शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय!
शिर्डी येथे ५ दिव्यांग व्यावसायिक स्टॉलचे उद्घाटन करून दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल टाकले. दिव्यांग संवाद कार्यक्रमात RTI चा प्रभावी वापर करून प्रत्येक शहरात दिव्यांगांसाठी राखीव स्टॉलचा हक्क मिळवण्याचे आवाहन केले. आज ५ स्टॉल, तर पुढील वर्षी शिर्डीत ५० स्टॉल उभे करण्याचा संकल्प व्यक्त केला.
मेंढपाळ अर्जुन महानर यांच्या उपोषणाची दखल घेत मेंढपाळांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
मा. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित बैठकीत मेंढपाळांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
वनहक्क समितीच्या धर्तीवर स्वतंत्र ‘मेंढपाळ वनहक्क समिती’ स्थापन करून मेंढपाळांसाठी पारंपरिक चराईचे मार्ग खुले करण्यात यावेत, अशी मागणी मा. बच्चू कडू यांनी केली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात महसूल विभागाच्या अखत्यारीतील उपलब्ध जमिनी मेंढपाळांना चराईसाठी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. मेंढपाळांसाठी स्वतंत्र विमा योजना येत्या १५ दिवसांत लागू करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यासोबतच पशुधनाचे नियमित लसीकरण व आरोग्य तपासणी करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. राज्याबाहेरून येणाऱ्या पशुधनाची आरोग्य तपासणी, नोंदणी व आवश्यक नियंत्रण व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.
पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार अचलपूर-चांदूरबाजार मतदारसंघातील विविध जलसंपदा प्रकल्पांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जलसंपदा मंत्री मा. गिरीश महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
बैठकीत वासणी प्रकल्पाची रखडलेली कामे तातडीने सुरू करणे, बोरगाव पेठ, बोरगाव दोरी व बोरगाव तळणी येथील पुनर्वसनाची कामे पूर्ण करणे, चंद्रभागा प्रकल्पातून सिंचन क्षेत्र वाढविणे, भगाडी प्रकल्पाला बोर्डीनाला प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देणे, पिंपरी बॅरेज व राजनापूर्णा बॅरेजची कामे सुरू करणे, बेलोरा-गणोजा प्रकल्पातून उर्वरित गावांना ठिबक सिंचनाचा लाभ देणे, राजुरा प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करणे तसेच सुप्रमा व करजगाव प्रकल्पांच्या पाणी नियोजनासह विविध विषयांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
या सर्व प्रकल्पांबाबत आवश्यक कार्यवाही करून कामांना गती देण्याबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेतली. यामुळे अचलपूर-चांदूरबाजार मतदारसंघातील सिंचन, पाणीपुरवठा व शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांना निश्चितच चालना मिळणार आहे.
समाजवादी विचारांचे ज्येष्ठ नेते, गांधीवादी विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
समाजप्रबोधन, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना !
अचलपुर येथील फिनले मिल बंद असल्यामुळे शेकडो कामगार व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर प्रश्नावर विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर कामगार मंत्री मा. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत NTC प्रशासन मिल कायमस्वरूपी बंद करण्याच्या मानसिकतेने काम करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच २०१९ च्या वेतन संहिता कायद्याचे उल्लंघन होत असल्याची बाब केंद्र व राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
यावेळी पुढील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या:
कामगारांचे थकीत वेतन देण्यासाठी आवश्यक असल्यास मिलची संपत्ती जप्त करून लिलावाची कार्यवाही करण्यात यावी.
केंद्र व राज्य कामगार विभागाने संयुक्तपणे १५ दिवसांच्या आत प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाला वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा.
मुंबईतील NTC मिल कामगारांप्रमाणेच फिनले मिल कामगारांनाही बोनस देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी.
फिनले मिल कामगारांचे मागील ४ महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याचे निर्देश देण्यात आले.
बोगस बियाणे व सावकारग्रस्त शेतकर्यासाठी विशेष जनता दरबार
दि. १५ जुलै २०२६
कुरळपुर्णा, ता. चांदुरबाजार जि. अमरावती
(टिपः- आपल्या प्रकरणा सोबत संबंधित सर्व कागदपत्रासह हजर रहावे)
मेळघाट येथील वाहतुक समस्या, दिव्यांग बांधवांच्या एस.टी. सवलत, बसस्थानक सुविधा, U-DID तपासणीतील अडचणी, ई-बस सवलत, तसेच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यासंदर्भातील महत्त्वाच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक झाली.
वरील विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. मंत्री महोदयांनी या विषयावर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
अचलपूर, चांदूरबाजार व मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांच्या कामासंदर्भात मा. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.
मेळघाटातील पाणी समस्या आजही गंभीर असून, सध्या ३६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अपूर्ण, बंद किंवा तांत्रिक अडचणींमुळे ठप्प असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सदर गावांची वस्तुस्थिती तपासून तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करून नागरिकांना नियमित व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
आई जिजाऊ, आई अहिल्यादेवी, सावित्रीआई आणि माय रमाई यांच्या पवित्र विचारांची पुण्याई, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, सहकार्य आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे.
आपण व्यक्त केलेला विश्वास, प्रेम आणि सदिच्छा आम्हाला जनसेवेच्या वाटचालीत अधिक बळ देतात.
मनःपूर्वक धन्यवाद!