शिवसेनेच्या २ दिवसीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराची आज सांगता झाली! चिखलदरा येथे आयोजित या प्रशिक्षण शिबिरातून पदाधिकाऱ्यांना विचार, तत्त्वज्ञान, संघटन कौशल्य आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची नवी दिशा मिळाली.
शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज राजकमल चौक येथील सभास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
अमरावती जिल्ह्यातील संघटन विस्ताराला नवी दिशा आणि अधिक बळ देणाऱ्या या अभियानाच्या शुभारंभासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
श्री संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक, अंजनगाव सुर्जी येथील प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने विधानपरिषदेचे उपसभापती मा. ना. सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. संबंधित विभागांचे अधिकारी व अखिल भारतीय बारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्मारकासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करून पुढील कार्यवाहीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) अंतर्गत प्रलंबित प्रश्नांबाबत विधानपरिषदेचे उपसभापती मा. ना. सचिनजी अहिर यांच्या दालनात संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.
बैठकीत प्रकल्पग्रस्त भागातील स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण तसेच कोळसा उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. संबंधित विभागांनी आढावा घेऊन आवश्यक निर्णय करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
८ सप्टेंबर रोजी मंत्रालयात गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस भरती २०२६-२७ बाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत VC द्वारे सहभाग घेतला.
बैठकीत दरवर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान पोलीस भरतीचे निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याबाबत सकारात्मक निर्णय, ३० जून २०२६ पर्यंतच्या सुमारे ८,९७० रिक्त पदांवर भरती प्रक्रिया, होमगार्ड जवानांना ५ वर्षे वयोमर्यादा सवलत, तसेच DPSI उमेदवारांसाठी किरकोळ शिक्षेची अट शिथिल करणे, One Time Age Relaxation आणि ९२ जागांमध्ये वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढील निर्णय लवकरच जारी करण्याची भूमिका घेण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न व औषध निरीक्षक पदभरतीचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. MPSC तील 3 अधिकाऱ्यांना अटक देखील झालेली आहे. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. अन्यथा यांच्या राजीनामा साठी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी तर करणारच आहे. शिवाय MPSC चे अध्यक्ष व सदस्य हे राजकीय संपर्क विरहित असणारेच असावे व सचिव हा मंत्रालय कॅडर चा नियुक्त न करता वरिष्ठ IAS दर्जाचाच असला पाहिजे, यासाठी देखील प्रभावी मागणी करणार आहे. आयोगाच्या सध्याच्या सहसचिव व परीक्षा नियंत्रक यांच्या प्रतिनियुक्ती करिता आयोगाची मान्यता नसताना आयोगाच्या परस्पर मनमानीपणे मंत्रालयातील अधिकारी एकतर्फी पाठविण्याच्या निर्णयाची व यासंदर्भात आयोगाच्या अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करावी तसेच सदर पदावरील व्यक्तीची नियुक्ती नियम बाह्य असल्याने ती तत्काळ रद्द करावी प्रश्न फुटी संदर्भात प्राथमिक जबाबदारी परीक्षा नियंत्रक यांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा गरज पडली तर विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई देखील लढू. पण विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम नक्की करू.
अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियान
रविवार, दि.३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता
अचलपूर येथून प्रारंभ होईल.
मार्ग: पथ्रोट• अंजनगाव सुर्जी • दर्यापुर • वलगाव • अमरावती समारोप
संकल्पना
आ. बच्चू कडू (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसेना !
बच्चु भाऊ कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रेचे मोठे यश! ✊
मेळघाटातील आजही अंधारात असलेल्या शेवटच्या २२ गावांपर्यंत पोहोचणार सौर वीज!
या कामासाठी शासनाकडून तब्बल ₹४० कोटींचा निधी मंजूर.
संघर्ष मेळघाटाच्या हक्कासाठी…
आता अंधार हटणार, २२ गावं उजळणार!
बच्चु भाऊंच्या संघर्षाला पुन्हा यश! 🔥
सर्व देशबांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हे स्वातंत्र्य चिरकाल राहो,
यासाठी आपण सर्वजण कटीबद्ध राहू.पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
#IndependenceDay
दर्यापूर येथील काँग्रेसचे नगराध्यक्ष सौ. मंदाकिनी सुधाकरराव भारसाखळे व १९ नगरसेवक, अकोट येथील दीपक रामदासजी बोडखे यांच्यासह माजी नगरसेवक व सहकारी सोसायटी सदस्य, नागपूर जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच बेळगाव येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांनी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशामुळे विदर्भासह सीमाभागात शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे.
निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांच्या सेवा, त्याग आणि निष्काम कर्मयोगाचा वसा व वारसा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपणारे,श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईचे उपाध्यक्ष तथा श्री गाडगे महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त, संत गाडगे बाबांच्या संकल्पनेतील नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार, सेवाव्रती आदरणीय स्व. बापूसाहेब देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
माझे मित्र सहकारी दिनेशजी बुब यांच्या अमरावती येथील कार्यालयास भेट दिली. स्व. डॅा. गणेशची बुब यांचा लोकसेवेचा वसा दिनेश बुब यांच्या हातातून अविरत सुरू आहे. शिवसेना पक्षविस्तार व संघटन बांधणी वर चर्चा करण्यात आली.
🎬 शिव-प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२६चा कोल्हापुरातून शुभारंभ!
कोल्हापूर येथे आज "शिव-प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२६" अंतर्गत "मा. माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राष्ट्रीय लघुपट स्पर्धे" च्या अधिकृत शुभारंभ व अनावरण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर, मा. बच्चूभाऊ कडू तसेच प्रहार चित्रपट संघटनेचे प्रमुख संदीप मोहिते पाटील,चित्रपट, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
समाजपरिवर्तन, लोकाभिमुख नेतृत्व आणि प्रेरणादायी विषयांवर दर्जेदार लघुपट निर्मितीला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव नवोदित आणि अनुभवी फिल्ममेकर्ससाठी एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.
देशभरातील दिग्दर्शक, लेखक, निर्माते आणि फिल्ममेकर्सनी या राष्ट्रीय स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पन्हाळा-पावनखिंड मोहीम
हिंदवी परिवार (संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे) आयोजित पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्याचा १६ वे वर्ष आहे. छत्रपती शिवरायांनी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटून पावनखिंडीकडे काढलेला हा पराक्रमाचा मार्ग… तोच मार्ग, जिथे प्रत्येक पाऊल इतिहासाच्या गर्जनेस भिडतं.
गेल्या ३० वर्षांपासून हिंदवी परिवार या मोहिमेच्या माध्यमातून स्वराज्याच्या पराक्रमाला अभिवादन करत आहे. त्या पवित्र वाटेवर चालण्याची संधी आम्हाला लाभली, हे आम्ही आमचं सौभाग्य मानतो.
जय भवानी! जय शिवराय!
मा. बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते छ. संभाजीनगर येथे “उमेद” दिव्यांग स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना इग्नाइट अकॅडेमीच्या स्पर्धा परीक्षा ऑनलाइन कोर्ससाठी १००% शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठीः ८८८८ ९९६११६
सांगोला येथे स्व. आ. गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले.
विधानसभेत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला लाभली. तळागाळातील जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर केलेला संघर्ष, साधी राहणी आणि लोकहिताची बांधिलकी कायम प्रेरणादायी राहील.