शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू, पण उद्योजकांना नको; शिंदेंच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
https://t.co/jXraggGSx1
#GulabraoPatil#Maharashtra#shivsena
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाशी संबंधित 8 महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. कृषी क्षेत्रात महाॲग्री-एआय धोरणाला चालना देण्यापासून ते न्यायव्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात NDPS कायद्यांतर्गत विशेष न्यायालय, तसेच अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ येथे अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायालयांना मंजुरी देण्यात आली. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या भांडवलवाढीमुळे रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार आहे. याशिवाय जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ, नवीन न्यायालयांची स्थापना आणि अवैध गौण खनिज उत्खननावर दहापट दंडाची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे हे निर्णय शेतकरी, न्यायव्यवस्था, ग्रामविकास आणि मुंबई रेल्वेसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.
.
.
.
#MaharashtraCabinet #DevendraFadnavis #MaharashtraNews #CabinetDecisions #MumbaiRailwayDevelopment
MHT-CET पेपरफुटी प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री या गंभीर विषयावर मौन का बाळगत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांवरील कारवाई, लाठीचार्ज आणि सोशल मीडिया पोस्ट हटवण्याच्या आरोपांवरून त्यांनी सरकारला घेरले. तरुणांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.
.
.
.
#MHTCET #AdityaThackeray #MaharashtraPolitics #CETPaperLeak #StudentProtest