#Metabolism सुधारतो कसा?
Science काय सांगते
1️⃣ Metabolism insulin sensitivity वर चालतो
Muscles sugar वापरत असतील तर metabolism सुधारतो. नसतील तर fat साठतो.
2️⃣ Muscle mass ही metabolic engine आहे
Muscle कमी वापरली तर sugar control, fat loss, energy तीन्ही अडखळतात.
3️⃣ Metabolism circadian rhythm ओळखतो
जेवण, झोप, हालचाल यांचा वेळ विस्कळीत झाला तर hormones गोंधळतात.
4️⃣ सतत खाणं metabolism दाबतं
Insulin कायम high राहिला तर fat burning बंद पडतं. Metabolism ला pause लागतो.
5️⃣ Poor sleep थेट insulin resistance वाढवते
झोप कमी = cortisol जास्त
आणि sugar control कठीण.
6️⃣ Chronic stress metabolism ला defensive बनवतो
Stress मध्ये शरीर fat साठवणं सुरक्षित समजतं.
7️⃣ Exercise पुरेसं नसतं, रोजची हालचाल महत्त्वाची
30 मिनिटांचा workout 10–12 तास बसणं neutralize करू शकत नाही.
8️⃣ Calorie कमी करणं ≠ metabolism सुधारणं
खूप कमी खाणं metabolism slow करायला शिकवतं.
9️⃣ Reports उशिरा बदलतात, metabolism आधी
Insulin resistance, fatty liver
reports normal असतानाच सुरू होतात.
🔟 Metabolism correction हा medical process आहे
Observation, timing, sequence, tracking हे सगळं योग्य मार्गदर्शनाशिवाय अवघड.
माझा अनुभव :
Metabolism सुधारतो जेव्हा biology ला योग्य signal मिळतो.
Random प्रयत्नांनी नाही, तर समजून, क्रमाने, track करून.
👉 यापैकी कोणता मुद्दा
तुमच्या बाबतीत जास्त लागू पडतो?
कॉमेंटमध्ये लिहा.
म्हणूनच पुढच्या posts मध्ये आपण metabolism सुधारण्याची योग्य सुरुवात, योग्य क���रम आणि योग्य अपेक्षा यावर सविस्तर बोलणार आहोत.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#Metabolism #Sugar #BP #Obesity #JustForHearts #TheMetabolicFiles #Reversal #ChronicCare
सोशल मीडियावरील असंख्य वाचकांच्या विनंती वरून तसेच सोयीसाठी अलीकडे WhatsApp Channel सुरू केला होता.
सगळे आरोग्यविषयक पोस्ट, काहींचे English translations, आणि YouTube Live updates एकाच ठिकाणी, शांतपणे. वाचायला तसेच forward करायला सोपे.
आज हा channel 1000 लोकांचा झाला आह��
आता एक छोटी, पण महत्त्वाची विनंती… जर तुम्हाला ह्या posts उपयोगी वाटत असेल, तर आत्ताच हा channel मित्र, कुटुंब, WhatsApp ग्रुप्समध्ये share करा आणि त्यांनाही join करायला सांगा.
ज्यांनी अजून join केलं नाही,
ते आत्ता join करू शकता
https://t.co/UtnN9uwYji
तुमच्या एका share मुळे
हा channel 10,000+ लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
आरोग्याची योग्य माहिती माणसांपर्यंत पोहोचवणं हे मोठं काम आहे, आणि ते तुमच्यामुळे घडतंय. 🙂
सर्वांचे मनापासून धन्यवाद ���
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#ThankYou #Gratitude #JustForHearts
एक वाचक अगदी प्रामाणिकपणे म्हणाले
सर, तुम्ही सोपं लिहिता…
पण metabolism म्हणजे काय हेच कळत नाही.
त्यांचा point बरोबर आहे , काही
शब्द सोपा नसतात , समजणं महत्त्वाचं असतं.
चला, metabolism अगदी सोप्या शब्दांत समजून घेऊया
Metabolism म्हणजे शरीराचं “आतलं कामकाज”.
तुम्ही जे खाता , ते शरीर
➡️ ऊर्जा बनवतं
➡️ साठवून ठेवतं
➡️ वेळ आली की वापरतं
ही सगळी प्रक्रिया म्हणजे metabolism.
उदाहरण :
���ुमचं शरीर म्हणजे एक घर समजा.
•अन्न = घरात येणारा सामान
•पचन = सामान उघडणं
•Metabolism =
👉 काय लगेच वापरायचं
👉 काय साठवायचं
👉 काय टाकून द्यायचं
जर हे सगळं नीट झालं तर शरीर हलकं, ऊर्जा चांगली.
जर ��िघडलं तर fat साठतो, sugar वाढते, cholesterol वाढतं.
सध्या सगळीकडे metabolism ची चर्चा सुरू आहे
कारण आज बहुतेक आजार एकाच ठिकाणी येऊन थांबतात metabolism.
👉 Diabetes
👉 Fatty Liver
👉 Obesity
👉 High Cholesterol
👉 BP
👉 Heart Disease
हे वेगळे आजार वाटतात,
पण मुळात सगळे metabolic बिघाडाचे परिणाम आहेत.
पुढच्या काही वर्षांत trend काय असणार?
Medicines वाढणार नाहीत…
Lifestyle वर जास्त भर येणार आहे.
•आपण कसं खातो
•किती वेळ बसतो
•किती हलतो
•झोप कशी आहे
यावर treatment ठरणार आहे.
म्हणजेच
metabolism समजणं ही पुढच्या काळात basic गरज ठरणार आहे.
माझा 25+ वर्षांचा अनुभव काय सांगतो?
जे रुग्ण “report” पेक्षा शरीर कसं काम करतं हे समजून घेतात, त्यांचा control जास्त टिकाऊ असतो.
आता स्पष्ट आहे , Metabolism म्हणजे
➡️ diet नाही
➡️ exercise नाही
➡️ औषध नाही
Metabolism = शरीर रोज कसं वागतं ते.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#Metabolism
#SimpleHealth
#UnderstandYourBody
#LifestyleMedicine
#SeniorDoctorSpeaks
#JustForHearts
“Exercise नाही तरी sugar control शक्य आहे?”
हो, जर NEAT समजून घेतलं तर
Exercise साठी Gym ला च जायला पाहीजे असे काही नाही.
रोजच्या साध्या हालचालींमधून जे metabolic काम होतं, त्यालाच म्हणतात NEAT - Non-Exercise Activity Thermogenesis.
थोडक्यात समजून घेऊया 👇
1️⃣ NEAT म्हणजे नेमकं काय?
Exercise सोडून उरलेली सगळी हालचाल चालणं, उभं राहणं, घरकाम, जिने, शरीर हलत ठेवणं हे सगळं NEAT.
2️⃣ Diabetes मध्ये NEAT इतकं महत्त्वाचं का?
हलती muscles glucose वापरतात.
म्हणजे insulin कमी लागतो → insulin resistance हळूहळू ���मी ��ोते.
3️⃣ Pre-diabetes मध्ये औषध टाळायला NEAT मदत करतो का?
हो.
जे लोक NEAT वाढवतात, weight + waist control करतात,
त्यांच्यात अनेक वेळा औषधांची गरज पुढे ढकलता येते , काहींमध्ये टाळताही येते.
4️⃣ Established diabetes मध्ये काय फरक पडतो?
NEAT मुळे
• post-meal sugar कमी वाढते
• sugar variability कमी होते
• काही रुग्णांत dose escalation टाळता येते
(औषध बंद नाही , पण control सोपा होतो)
5️⃣ Exercise vs NEAT , काय जास्त महत्त्वाचं?
Exercise = planned, वेळेवर, intensity जास्त
NEAT = दिवसभर चालणारं metabolic support
👉 Exercise आ���वड्यात 4–5 दिवस
👉 NEAT रोज, दिवसभर
दोन्ही एकमेकांना पूरक.
6️⃣ NEAT चे अजून काही relatable उदाहरणं
• जेवणानंतर 10 मिनिटं चालणं
• TV पाहताना दर 20–30 मिनिटांनी उठणं
• घरात काम करताना खुर्चीवर न बसता उभं राहणं
• दुकान जवळचं असेल तर गाडी न वापरणं
• lift थांबवून 1–2 मजले जिन्याने
7️⃣ Smartwatch मध्ये काय पाहायचं?
Steps पेक्षा हे बघा:
• किती वेळ बसून होतात?
• किती वेळ standing / moving?
• active minutes दिवसभर पसरलेत का?
8️⃣ “मी already exercise करतो, तरी NEAT का?”
कारण exercise 30–45 मिनिटं असतं,
पण उरलेले 23 तास metabolism काय करतो , ते NEAT ठरवतो.
9️⃣ Guidelines काय सांगतात?
ADA, EASD स्पष्ट सांगतात:
“Prolonged sitting is harmful , even in people who exercise.”
म्हणजे बसणं break करणे फार महत्त्वाचं.
🔟 25 * वर्षांचा माझा clinical अनुभव काय सांगतो?
जे रुग्ण NEAT वाढवतात,
ते diet-exercise पेक्षा जास्त टिकाऊ control मिळवतात.
NEAT हा shortcut नाही.
तो metabolic system ला रोज “support” देणारा उपाय आहे.
👉 तुमच्या रोजच्या आयुष्यात NEAT कुठे वाढवता येईल?
घर, ऑफिस, प्रवास, कुठे शक्य आहे ते कॉमेंटमध्ये लिहा.
चर्चा झाली की उपाय सापडतात.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#NEAT
#DiabetesCare
#PreDiabetes
#MetabolicHealth
#LifestyleMedicine
#JustForHearts
Angioplasty / Bypass नंतरही श्वास का लागतो?
(Heart problem संपला असं वाटतं… पण शरीर वेगळं सांगतं)
“Doctor, stent घातला आहे… सगळे reports normal आहेत… पण थोडं चाललं तरी दम लागतो.” हे वाक्य रोज ऐकायला मिळतं.
👉 हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही.
👉 पण घाबरण्याचंही कारण नाही.
सोप्या शब्दात कारण समजून घेऊया
1 Blockage काढली म्हणजे heart लगेच मज��ूत होत नाही
Angioplasty / Bypass ने रक्ताचा रस्ता मोकळा होतो.
पण heart चा स्नायू (muscle) आधीच थकलेला किंवा कडक झालेला असू शकतो.
2 Heart दोन कामं करतो
एक - रक्त जोरात पुढे ढकलतो
दुसरं - आरामात सैल / relaxation होऊन रक्त आत घेते
3 काही लोकांत problem “जोरात ढकलण्याचा” असतो ( pumping )
Heart थकलेला → शक्ती कमी → दम लागतो.
4 काही लोकांत problem “Relax होण्याचा” असतो
Heart कडक → नीट सैल होत नाही → आत pressure वाढतो → श्वास लागतो.
👉 हे muscle relaxation problem आहे ,
Heart relax होत नाही, जसं शरीरात stiffness असते तसं.
5 म्हणूनच Echo normal असूनही त्रास होतो
Report मध्ये pumping ठीक दिसतं
पण heart आतून ताणलेला असतो.
6 लक्षात ठेवा , हा त्रास तुमच्या चुकीमुळे नाही. हा आळस, कमजोरी किंवा वयाचा दोष नाही.
7 यावर उपाय आहेत
योग्य औषधं , योग्य हालचाल , योग्य जीवनशैली
हे सगळं एकत्र केल्यावर फरक पडतो.
स्वतःला विचारायचे 3 प��रश्न
✔ चालताना वारंवार थांबावं लागतं का?
✔ जिने चढताना छातीत जडपणा / दम येतो का?
✔ रात्री उशी वाढवावी लागते का?
👉 उत्तर “हो” असेल तर
हे ignore करू नका.
8 आजपासून दम येण्याची वेळ आणि कारण लिहून ठेवा
चालताना? जेवणानंतर? रात्री झोपताना?
👉 ही माहिती treatment खूप उपयोगी पडते.
9 हे पहिलं पाऊल आहे…
ही पोस्ट Heart Failure Rehab Series मधली पहिली पोस्ट आहे.
तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांसाठी
तुम्हाला किंवा घरात कुणाला
Angioplasty / Bypass नंतर दम लागत असेल , तर comment मध्ये लिहा 👇
“दम कधी आणि कसा लागतो?”
तुमच्या प्रश्नांवर पुढच्या पोस्ट्स ठरवूया.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#HeartFailureRehab
#AfterAngioplasty
#Breathlessness
#HeartCare
#JustForHearts
“Sir, metabolism वाढवायचा म्हणजे नेमकं काय करायचं?”
Metabolism च्या पोस्टवर अनेकांनी विचारलं
सोपं उत्तर आहे.
Metabolism वेगळा boost करायचा नसतो. तो liver ठीक केल्यावर आपोआप सुधारतो.
कारण liver हेच ठिकाण आहे जिथे
fat burning, sugar control आणि cholesterol regulation
हे सगळं ठरतं.
म्हणून metabolism सुधारायचा असेल,
liver reset पासून सुरुवात करा.
Metabolism कसं सुध���रतं?
10 practical, science-backed actions 👇
1️⃣ Sugar आणि fructose आधी कमी करा
Fructose liver मध्ये थेट fat वाढवतो.
Cold drinks, packaged juices, sweet snacks
हे पहिलं थांबवा.
2️⃣ Late dinner थांबवा
रात्री liver detox आणि repair करतो.
उशिरा जेवण म्हणजे fat burn थांबवणं.
3️⃣ Protein नियमित ठेवा
Protein शिवाय liver repair होत नाही.
प्रत्येक meal मध्ये थोडं protein गरजेचं.
4️⃣ Refined carbs कमी करा
मैदा, bakery, biscuits, snacks
हे liver मध्ये fat साठवतात.
Simple घरचं अन्न safer.
5️⃣ Alcohol = reset चा pause button
थोडंसुद्धा alcohol
liver reset process थांबवतो.
Break घ्या.
6️⃣ Meal नंतर 10–15 मिनिटं चालणं
Post-meal walking मुळे
liver fat आणि insulin resistance कमी होतात.
7️⃣ Sleep हा liver चा मुख्य healer
7–8 तास झोप
कोणत्याही supplement पेक्षा प्रभावी आहे.
8️⃣ Stress कमी नसेल तर liver heal होत नाही
Chronic stress → cortisol वाढतो
→ liver fat वाढतं.
Shant shwas, thodi विश्रांती आवश्यक.
9️⃣ Detox pills नको, routine बदला
Liver detox स्वतः करतो.
आपण फक्त त्याला अडथळे निर्माण करायचे थांबवायचे.
🔟 Consistency > Intensity
एक आठवडा perfect नको.
तीन महिने सातत्याने थोडं-थोडं
हेच खरा reset.
Metabolism reset
कोणत्याही powder किंवा shortcut ने होत नाही.
तो तेव्हा होतो
जेव्हा liver ला पुन्हा
योग्य signals मिळतात.
ही पोस्ट पुरेशी आहे
जे follow करतील, त्यांना फरक जाणवेल.
आणि ज्यांना
थोडं hand-holding,
दैनंदिन motivation
आणि structured reset हवा असेल,
त्यांनी Just For Hearts YouTube channel ला भेट द्या
आणि Join → Challenge level निवडा. नियमित discussions / videos / micro challenges मधून recovery ला सुरूवात करा
👉 या 10 पैकी
तुमच्यासाठी सगळ्यात कठीण बदल कोणता आहे?
Comment मध्ये नक्की सांगा.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#LiverHealth
#FattyLiverReversal
#MetabolismReset
#InsulinResistance
#GutLiverAxis
#LifestyleHealing
#RoutineOverSupplements
#JustForHearts
Fatty Liver : 12 आठवड्यांचा Metabolic Reversal Program
“नेमकं काय करायचं?”
गेल्या 3 प��स्टमधून आलेल्या अशा असंख्य comments and inquiries साठी हे निवेदन
या 12 आठवड्यांत आपण काय करतो?
• जेवण, चालणं, झोप यांचा योग्य rhythm
• स्नायू सक्रिय करून insulin sensitivity सुधारणा
• लिव्हरवरचा metabolic भार हळूहळू कमी
• Sugar, triglycerides, bloating, fatigue यावर काम
• Reports पेक्षा routine आणि pattern सुधारणा
👉 हा उपचार नाही , शरीराची दिशा बदलण्याची प्रक्रिया आहे.
या program मध्ये काय नाही?
❌ Detox / tonics / shortcuts नाही
❌ औषधे बंद करायला सांगत नाही
❌ कठोर diet किंवा extreme exercise नाह���
❌ “७ दिवसात liver clean” असे दावे नाहीत
हा program कुणासाठी आहे?
✔️ माहिती असूनही एकट्याने जमत नाही अशांसाठी
✔️ 8–12 आठवडे सातत्याने बदल करायला तयार असलेल्यांसाठी
✔️ fatty liver पुढे diabetes / heart disease कडे जाऊ नये यासाठी
महत्वाची स्पष्टता
हा program माझ्या मार्गदर्शनाखाली qualified medical + lifestyle team च्या सहकार्याने चालतो.
👉 हा group coaching आहे
👉 One-to-one coaching इथे दिली जात नाही (आणि बहुतेक वेळा गरजेचीही नसते)
ज्यांना वैयक्तिक चर्चा हवी असेल,
ते दिलेल्या नंबरवर video consultation स्वतंत्रपणे book करू शकतात.
शुल्काबद्दल पारदर्शकता
अशा metabolic reversal programs साठी
सामान्यतः मोठे fees घेतले जातात.
👉 आम्ही separate consultation fees घेत नाही
👉 कोणतंही product / upselling नाही
👉 Hidden costs नाहीत
हा program Just For Hearts YouTube channel च्या
Challenge Membership अंतर्गत उपलब्ध आहे. Membership fees
₹119 / महिना आहे.
ही फी नाही , हा खर्च उपचारासाठी नाही, structure , सातत्य आणि process alignment साठी आहे.
शेवटी स्पष्ट सांगतो
माझे posts आणि वेळ मिळेल तसा YouTube Live ��े completely free आहेत. व पुरेसे आहेत.
अनेक जण त्यावर स्वतःही सुधारणा करू शकतात
ते पूर्णपणे योग्य आहे 👍
पण ज्यांना वाटतं,
“मला हे नीट, शिस्तीत, मार्गदर्शनासह करायचं आहे”
त्यांच्यासाठी हा guided program आहे.
अधिक प्रश्नांसाठी limited time साठी WhatsApp group उपलब्ध करून देत आहे , आपल्या शंका विचारू शकता.
माझे सहकारी दिव्या सांगलीकर व Dr मनिषा देवकर आपल्या सर्वांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देतील.
हे 12 आठवडे report बदल���्यासाठी नाहीत,
शरीर recovery कडे align करण्यासाठी आहेत.
Sonography ला वेळ लागतो ,
सवयी बदलल्या की सुधारणा मागोमाग येते.
https://t.co/kHoKNF9l4d
#FattyLiver
#MetabolicHealth
#LifestyleMedicine
#PreventDiabetes
#HeartHealth
#JFHChallenge
#HealthWithDiscipline
“Fatty Liver → Diabetes → Heart Disease : हा प्रवास कसा सुरू होतो?”
(या विषयावर 3 पोस्टची मालिका - भाग 3)
1️⃣ Fatty liver म्हणजे
लिव्हर insulin resistant झालेला असतो.
म्हणजे insulin असूनही
लिव्हर glucose ��यार करत राहतो.
2️⃣ सुरुवातीला fasting sugar normal दिसते.
पण post-meal sugar (जेवणानंतरची साखर)
हळूहळू वाढू लागते.
3️⃣ हाच stage म्हणजे prediabetes.
जिथे report अजून “ठीक” असतात
पण disease process सुरू झालेली असते.
4️⃣ Liver fat वाढल्यावर
VLDL (वाईट cholesterol particles) वाढतात →
triglycerides वाढतात, HDL कमी होतं.
5️⃣ ही lipid pattern
हृदयाच्या रक्तवाहिन्यांसाठी
सगळ्यात जास्त धोकादायक मानली जाते.
6️⃣ म्हणून fatty liver असलेला रुग्ण
“फक्त लिव्हरचा” नसतो.
तो future cardiac risk मध्ये असू शकतो.
7️⃣ ही सगळी प्रक्रिया
वर्षानुवर्षे शांतपणे चालते.
म्हणून लक्षणं उशिरा दिसतात.
8️⃣ चांगली बातमी: fatty liver मध्ये पेशी मरत नाहीत त्या overload झालेल्या असतात.
म्हणून योग्य बदल केल्यास 8–12 आठवड्यांत metabolic सुधारणा सुरू होते
(ultrasound बदलायला जास्त वेळ लागू शकतो).
➡️ आजपासून स्वतःसाठी इतकंच ठरवा:
• जेवणाची वेळ रोज साधारण एकसारखी
• जेवणानंतर थोडी हालचाल
• झोपेची वेळ आणि कालावधी नीट
• सतत बसून राहणं कमी
हे छोटे self-care बदलच
insulin sensitivity सुधारण्याची सुरुवात करतात.
या 3 पोस्ट वाचताना जे प्रश्न पडले
“माझ्या बाबतीत हे किती लागू आहे?”
“मी नेमकं काय, किती काळ करायचं?”
ते comment मध्ये नक्की विचारा.
उद्या गुरुवारी YouTube Live मध्ये
हे सगळं शांतपणे, विज्ञानाच्या आधारावर
mechanisms, timelines आणि practical clarity सह घेणार आहोत.
YouTube Live ची वेळ व channel details
evening पर्यंत update केली जातील.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#FattyLiverReversal #JFHChallenge #PreventiveCardiology #MetabolicReset
“Fatty Liver कुणासाठी आजार ठरतो… आणि कुणासाठी नाही?”
(या विषयावर 3 पोस्टची मालिका - भाग 2)
1️⃣ प्रत्येक fatty liver ला औषधांची गरज नसते.
पण प्रत्येक fatty liver ला
clinical judgement (वैद्यकीय समज) लागते.
2️⃣ Fatty liver सोबत
कंबरभोवती चरबी, triglycerides जास्त, HDL कमी,
BP किंवा prediabetes असेल
→ तो metabolic fatty liver मानला जातो.
3️⃣ अशा लोकांमध्ये fatty liver
हा future diabetes आणि heart disease चा
सगळ्यात पहिला visible marker असतो.
4️⃣ उलट, एखाद्याला ultrasound मध्ये
incidental Grade 1 fatty liver दिसतो,
बाकी reports normal असतील
→ panic करण्याची गरज नसते.
5️⃣ ALT (लिव्हर एन्झाइम) जास्त असणं
नेहमी seriousness दाखवत नाही
आणि ALT normal असणं
सुरक्षिततेची हमी देत नाही.
6️⃣ खरा प्रश्न असा आहे:
लिव्हर fat साठवत आहे की
fat वापरण्याची क्षमता क��ी झाली आहे?
7️⃣ Muscle mass (स्नायू) कमी असेल
तर sugar आणि fat
दोन्ही शेवटी लिव्हरकडेच जातात.
8️⃣ म्हणून exercise फक्त
“कॅलरी burn” नसून
metabolism योग्य दिशेने वळवण्यासाठी असतो.
➡️ हे वाचताना स्वतःला विचारा:
“मी वजन कमी करण्यासाठी चालतोय
की माझे स्नायू वापरण्यासाठी?”
“अशाच छोट्या निरीक्षणांवर आम्ही
आमच्या Just For Hearts ह्या YouTube channel वर
step-by-step मार्गदर्शन करत असतो .”
👉 उद्या ��ेवटचा भाग
Fatty liver दुर्लक्षित राहिलं तर शरीरात पुढे काय sequence सुरू होतो?
तुमचे प्रश्न comment मध्ये ठेवा , सगळे घेऊ.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#FattyLiverScience #JFHChallenge #CardioMetabolicHealth #PreventiveMedicine
@KulkarniRL Here is special English translation post link on demand by our followers..
Eat, Pray, Love: a story of returning to yourself.
https://t.co/34Bauhl19J
Eat. Pray. Love. Not a travel story—an inner reset.
Joy without guilt. Silence without hurry.Balance over perfection. Health is not just reports.
Happiness is not a luxury.
Giving yourself time is not selfish it’s healing.
#EatPrayLove#Life#MentalWellbeing#justforhearts
🎬 Eat Pray Love
स्वतःकडे परत येण्याची गोष्ट
हा चित्रपट एका स्त्रीची कथा सांगतो
जिच्याकडे सगळं आहे, तरी मन शांत नाही.
ती आयुष्याला pause देते आणि तीन देशांतून प्रवास करते:
🍝 Eat (इटली): आनंद, चव, जगण्याचा आस्वाद
🙏 Pray (भारत): अंतर्मुखता, शिस्त, मनाची स्थिरता
🧘 Love (बाली): समतोल, नातं, स्वतःशी जुळवून घेणं
हा चित्रपट प्रवासाबद्दल नाही
तो मन, शरीर आणि आयुष्य यांचा समतोल कसा साधायचा याबद्दल आहे.
ह्या चित्रपटावर आधारित जीवन / आरोग्यासाठी 10 साधे परंतू deep meaning चे धडे / Life lessons
1️⃣ आनंद guilt शिवाय घ्या.
कधी मनसोक्त जेवण, हसू, थांबणं हेही आरोग्���ाचाच भाग.
2️⃣ मन थकलंय का, शरीर आधी सांगतं.
झोप बिघडणं, चिडचिड, थकवा ही शरीराची भाषा आहे. ऐका
3️⃣ सगळं सोडून जायची गरज नसते.
कधी थोडं थांबणं म्हणजेच reset.
4️⃣ प्रार्थना म्हणजे मनाचा उपचार.
मन शांत असेल तर शरीरही साथ देतं.
5️⃣ शांत बसणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही.
मन शांत झालं की निर्णय स्पष्ट होतात.
6️⃣ समतोल म्हणजे perfect routine नाही.
काम, आनंद, एकांत सगळ्याला थोडी जागा.
7️⃣ स्वतःशी नातं जुळलं की इतर ��ाती सोपी होतात.
पहिलं नातं , स्वतःशी.
8️⃣ आरोग्य फक्त रिपोर्ट्स नाही.
मन शांत नसेल तर शरीरही साथ देत नाही.
9️⃣ आनंद luxury नाही, गरज आहे.
तो दुर्लक्षित केला की शरीर भरपाई मागतं.
🔟 स्वतःला वेळ देणं selfish नाही.
ते survival आहे आणि उपचारही.
हा चित्रपट पाहिल्यावर
सगळे इटलीला किंवा बालीत योग करायला जाणार नाहीत 😄
पण एवढं नक्की होऊ शकतं
➡️ एक जेवण शांतपणे
➡️ एक दिवस स्वतःसाठी
➡️ एक सवय मनासाठी
आणि कधी कधी ��ेवढंच पुरेसं असतं.
चित्रपट पाहिला नसला तरी संदेश सोपा आहे
आयुष्य सुधारायला आधी स्वतःकडे वळा.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#EatPrayLove #LifeBalance #MentalWellbeing
#HealthyMindHealthyBody #SelfCareIsHealth #JustForHearts
Breaking news never stops.
But BP, sugar, and anxiety keep rising.
This is not coincidence. It’s biology.
Your brain is not designed for 24×7 alerts.
Every “breaking” headline switches your nervous system into stress mode → cortisol rises → BP, sugar, and heart rate go up.
Uttarayan is not just a festival — it’s a natural reset for your body.
More morning sunlight → better sleep, hormones, digestion, immunity & energy.
Just start with:
☀️ 15 minutes of sunlight
🚶♀️ 15 minutes of walking
🥗 Light meals
Small habits. Big health shift.
@justforhearts
#justiceforghodbunderroad#thanewest
What a smart work has been done @gjodbunderroad #thanewest...roads with service lane are open along with bridge and metro work...
Amazing job by our governing people....
All big trucks stuck on the road...very good job....amazing plannin