महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच 19 ऑक्टोबर 2024 ला देशाच्या तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पाठवलं होत.यामध्ये तिन्ही घटक पक्षांनी हा दावा केला होता की,निवडणूक आयोगाने सर्व्हर्स / सॉफ्टवेअर्स कोणीतरी मॅनेज करत आहेत.याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर होणार आहे.आज ही बाब सत्य होताना दिसते आहे.ज्ञानेश कुमार व्यतिरिक्त जे दोन निवडणूक आयुक्त आहेत ते सुखबीर सिंग संधू
आणि विवेक जोशी हीच बाब जनतेसमोर आणत आहेत.याधीचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि आताचे निवडणूक आयुक्त
ज्ञानेशकुमार यांनी या देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं आहे.आणि यासारख दुसरं पाप या लोकशाही म्हणवण्याऱ्या व्यवस्थेत नाही..!
अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी सत्��ाग्रह करून,सर्व जातींना मंदिर प्रवेश असावा यासाठी प्रयत्न करणारे, समाजातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि पुराणमतवादी विचारांच्या विरोधात लढा उभारणारे,
द्रविड आंदोलनाचे प्रणेते,
पेरियार रामस्वामी नायकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.!
अविनाश जाधव आयोजित मनसे दहीहंडी उत्सव, ठाणे येथे उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा हा उत्साहपूर्ण सोहळा अनुभवताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
@JadhavMns#दहीहंडीउत्सव
अर्बन नक्षल, दिमागी नक्षल वगैरे संज्ञा सहज चिटकवल्य�� जातात. पण त्याची नेमकी व्याख्या काय ??? बापटांना नक्की ऐका !
#VidyanandBapat #MaharashtraPolitics
आचार्य अत्रे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पंचमहाभूतांपैकी एक होते. मराठी मनाचा महाराष्ट्र जेंव्हा घडला तेंव्हा त्यात आचार्य अत्रेंचा सिंहाचा वाटा होता. आचार्य अत्रेंची वाणी आणि लेखणी म्हणजे एक मुलूखमैदा��ी तोफ होती..!
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
ज्यांनी निसर्गाला केवळ साधन नाही, तर आपली आई मानून जपले, ज्यांनी आपल्या संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा वारसा पिढ्यान्पिढ्या जतन केला, त्या तमाम आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आदिवासी समाज हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांचा सन्मान झाला पाहिजे. शिक्षण, रोजगार, आरोग्य, विकास आणि समान ��ंधी यांचा लाभ प्रत्येक आदिवासी बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे..!
आदिवासी समाजाची अस्मिता जपूया, हक्कांसाठी एकजुटीने उभे राहूया आणि सामाजिक न्यायाचा लढा अधिक मजबूत करूया.
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या आहेत.
मी मुख्य राष्ट्रीय प्रवक्ता च्या अधिकारात हा निर्णय घेत आहे
@supriya_sule
जय भीम,
भारत देशातील शोषणाविरोधातील लढ्याचा आवाज म्हणून जर कोणाकडे पाहिले जात असेल तर ते फक्त आणि फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच !
जेव्हा एका ठराविक समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते... जेव्हा शूद्रांना पाण्याजवळही जाऊ दिले जात नव्हते. तेव्हा त्यांनी अख्खा तलावच ���ंघर्ष करून उघडा करून दिला. ज्या मनुस्मृतीचा पगडा अनेक शतके या देशाच्या मानगुटीवर होता.ती मनुस्मृतीच त्यांनी जाळून टाकली.
रूपयाचे महत्व काय आणि त्यासमोरील समस्या काय, हे त्यांनी पुस्तकात वर्णन करून इथल्या रिझर्व्ह बॅंकेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी शिक्षणातील जेवढ्या पदव्या घेतल्या; तेवढ्या पदव्या या देशात आजपर्यंत कोणीही घेऊ शकलेले नाही. त्याही साध्यासुध्या विद्यापीठातील नाही तर कोलंबिया, हार्वर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगातील नंबर एकवर असलेल्या विद्यापीठातून घेतल्या.
हे यासाठी महत्वाचे आहे की आहे की, जेव्हा ते व्यवस्थेविरुद्ध उभे र��हिले तेव्हा त्यांच्या डोक्यात होते की, "मला स्वतःला वर्गात न बसताच शिक्षण घ्यावे लागले." कदाचित अनेकांना हे माहित नसेल की त्याकाळातील जातीव्यवस्थेमुळे त्यांना वर्गातही बसू दिले नव्हते. वर्गाबाहेर बसून त्यांना अभ्यास करावा लागला होता.
स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या संविधान समितीमध्ये त्यांना स्थान मिळाले. ते घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाले अन् भारताचे संपूर्ण संविधान त्यांनी हाताने लिहिले; ते लिहित असताना त्यांनी जगातील सर्व देशांची संविधाने अभ्यासली, जगातील सर्व धर्मांचा आणि धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि भारताला अनेक युगे कामाला येईल, भारताला एकसंघ ठेवेल, असे संविधान त्यांनी तयार केले. पण, हे लिहिताना त्यांनी सर्वांना सांगितले की, "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा !"
आधी शिका... शिक्षणाला अभूतपूर्व महत्व आहे, हे त्यांनी आधीच ओळखले होते. म्हणून त्यांनी स्वतःच्या ताकदीवर पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. सिद्धार्थ महाविद्यालय आणि छत्रपती संभाजी नगरचे मिलींद काॅलेज ही त्यांचीच अपत्ये ! म्हणून जेव्हा कुठल्याही व्यवस्थेविरुद्ध, कुठल्याही अन्याय - अत्याचाराविरूद्ध घोषणा द्यायची असते तेव्हा मनातूनच एक घोषणा येते, ती असते ... जय भीम !!
जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भिमराव..!
पृथ्वी ही नागाच्या फण्यावर तरली नसून, कष्टकरी व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असं ठणकावत मनामनात ��्रांतिची ठिणगी पेटविणारे, शोषितांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वाहणारे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!