महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#गोपीनाथ_मुंडे#GopinathMunde
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज पुण्यतिथी. त्यांचे कर्तृत्व व कार्यक्षम कारभार महाराष्ट्राला दिशादर्शक ठरला. सर्वसामान्याविषयी अखंड आत्मियता बाळगणाऱ्या त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाला यानिमित्ताने विनम्र अभिवादन!
#YashwantraoChavhan
वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ब्रिटीश संसदेत बॉम्बस्फोट घडवून ब्रिटीश सत्तेची झोप उडविणारे महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांना पुण्यतिथी शतशः प्रणाम!
#BatukeshwarDutt#पुण्यतिथी#अभिवादन
मंगल पांडे यांनी इंग्रजांविरूद्ध बंड करत स्वातंत्र्यलढ्याची ज्योत पेटवली. त्यांच्या बलिदानाने ब्रिटिश सत्तेविरोधात तीव्र असंतोष निर्माण होऊन त्याचे रुपांतर १८५७ च्या उठावात झाले. १८५७ च्या उठावाचे अग्रणी, थोर स्वातंत्र्यसेनानी मंगल पांडे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
परिवर्तनवादी साहित्याचा डफ वाजवीत संकुचित, अन्यायकारक रूढी परंपरा आणि विचारांनी पछाडलेल्या समाजाचे डोळे उघडून दिन, दलित, गरिबांच्या आक्रोशाला दिशा देणाऱ्या समाजसुधारक लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली !
#annabhausathe#अण्णाभाऊसाठे#पुण्यतिथी
मराठवाड्यात जायकवाडी व इतर धरणं उभारून स्व. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात विकासाची गंगा आणली. कर्तव्यदक्ष व अभ्यासू प्रशासक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
#shakarraochavan
दिवस-रात्र शेतात बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या सर्जा-राजाशी असलेल्या नात्याचं महत्त्व जपणाऱ्या बेंदूर सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
#बेंदूर#archanaghareofficial#archanagharespeaks
सुख-समृद्धीचे प्रतीक व मुस्लिम नववर्ष मोहरम निमित्त सर्वांना शुभेच्छा.
या मोहरम सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवाना सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो आणि समाजात एकता, बंधुता, सौहार्द वाढीस लागो हीच सदिच्छा.
#Mohram#मोहरम#शुभेच्छा
सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर ह्रदयी माझ्या ।
आणिक काही इच्छा नाही आता, गोड तुझे नाम पाडुरंगा ।
विठ्ठल भक्तीचा ध्यास असलेल्या सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
#AshadhiEkadashi#आषाढीएकादशी#वारी
आपल्या पराक्रम आणि स्वकर्तुत्वाने समुद्रावर अधिराज्य करत कोकण सागरी किनारा परकीय सत्तांपासून सुरक्षित ठेवणारे मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#KanhojiAngre#Maharashtra