जल, जंगल आणि भूमीच्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहत स्वाभिमानाची मशाल प्रज्वलित करणारे जननायक बिरसा मुंडा हे संघर्ष, आत्मसन्मान आणि सामाजिक जागृतीचे अजरामर प्रतीक आहेत. त्यांच्या त्यागमय कार्यातून समतेची प्रेरणा आणि परिवर्तनाची चेतना अखंड प्रवाहित होत राहील. थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन.
महाराष्ट्रात जे विधानसभा निवडणुकीत जे घडले ते केवळ निवडणुकीतील गैरप्रकार नव्हते. ते लोकशाहीवर एक पद्धतशीर, तंत्रज्ञानाने
चढविलेला हल्ला होता.
१९ ऑक्टोबर २०२४ रोजी, मतदान सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला औपचारिकपणे भाजपकडून अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यां मध्ये करत असलेल्या फेरफार बद्दल सतर्क केले होते.
ही निवडणूकोत्तर तक्रार नव्हती. ती पूर्वसूचना होती.
आमच्या तक्रारीत भाजपचे कार्यकर्ते विरोधी मतदारांना ओळखण्यासाठी आणि हटविण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करत होते, तर बनावट आधार कार्ड आणि फेरफार केलेल्या डेटाचा वापर करून बनावट मतदार कसे जोडत होते याचे तपशीलवार वर्णन केले होते.
विरोधी मतदारांना लाल रंगात चिन्हांकित केले गेले होते म्हणजेच हटवण्याचे लक्ष्य होते. भाजप समर्थकांना हिरवे चिन्हांकित केले गेले होते म्हणजेच काढून टाकण्यापासून संरक्षण दिले गेले होते.
या याद्या निवडणूक आयोगाच्या मतदार मान्यता प्रणालीवर परिणाम करणाऱ्या खाजगी सर्व्हरवर अपलोड केल्या गेल्या. फसव्या मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यासाठी सायबर कॅफे आणि आधार सेतू केंद्रांना जोडण्यात आले होते. प्रत्येक मतदारसंघात अंदाजे १०,००० बनावट मतदार होते.
१७ ऑक्टोबर रोजी, निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने धाराशिवमध्ये एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये तुळजापूरमध्ये बनावट मतदार नोंदणींचा पूर उघडकीस आला - त्यात सहभागी असलेल्यांची नावे घेतली आणि हे किती खोलवर गेले आहे हे दाखवून दिले.
आम्ही १३ मतदारसंघांमधून ठोस पुरावे सादर केले: शिर्डी, चंद्रपूर, कोथरूड, नागपूर, गोंदिया आणि इतर.
आणि तरीही, निवडणूक आयोगाने मौन बाळगले. पण आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही भाजपला आमच�� संविधान आणि लोकशाही चिरडून टाकू देणार नाही. आम्ही लढू कारण लोकशाही केवळ निवडणूक रणनीतींबद्दल नाही, ती विश्वासाबद्दल आहे.
आम्ही कोणत्याही परिस्थितीत भारतीय संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असलेल्या संस्थांना मार्गावरून हटवू देणार नाही.
#VoteChori
फडणवीस किती निष्क्रिय आहे बघा.
दिड तास झाले तरी बंद पडलेल्या मोनो रेलमधून प्रवाशांना बाहेर काढले गेले नाही. शेवटी श्वास गुदमरलेल्या प्रवाशांना खिडकीची काच फोडावी लागली.
राजीव गांधींनी देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्राला मुक्त विचारांचे दालन खुले केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताने सॉफ्टवेअर व आयटी क्षेत्रात जागतिक ओळख निर्माण केली. त्यांनी नव्या पिढीला आधुनिक शिक्षण, नवतंत्रज्ञान आणि विकासाची दिशा दाखवली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने देशाचा सर्वांगीण विकास साधणारे व नव्या भारताच्या आकांक्षांना जाणणारे, माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
ताडोबा अभयारण्यात छोटा मटका हा वाघ प्रचंड लोकप्रिय आहे. त्याची शरीरयष्टी आणि त्याचा जंगलातील प्रभाव हा अनेक पर्यटकांना आणि वन्यजीव अभ्यासकांना मोहित करून गेला आहे. अनेक झुंजींमध्ये त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्���ांना आपल्या प्रभावक्षेत्रातून पळवून लावले आहे. त्याने जेवढे क्षेत्र आपल्या प्रभावाखाली ठेवले होते; तेवढे क्षेत्र कुठल्याही वाघाने आपल्या प्रभावाखाली ठेवले नसल्याचे वनप्रेमींचे म्हणणे आहे.
अलिकडे झालेल्या दोन झुंजींमध्ये त्याच्या पायाला जखमा झाल्या असून त्यातून रक्त वहात ��हे, असे त्याला बघणार्यांनी कळविले आहे. मात्र, त्याच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांनी त्वरीत या वाघावर उपचार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मी सर्व वन्यजीवप्रेमींच्या वतीने करीत आहे.
#savematka #tadoba #maharashtra
#wildlife #tiger #zonauang #AnimalCare
@CMOMaharashtra
@MSEDCL मग मागील सहा तासात काय केलं?आता आपण सांगत माझी नवीन तक्रार नोंदवून घेत आहेत म्हणून. यापेक्षा अजून दुसरा कुठला पुरावा पाहिजे आपल्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा. प्रश्न सोडवा तात्काळ
कात्रज आंबेगाव धनकवडी त्रिमूर्ती चौक कात्रज मधील इलेक्ट्रिक लाईन रात्री तीन वाजेपासून ट्रेस होत आहे. या संदर्भात या पूर्वी तक्रार केली होती. कृपया विद्युत पुरवठा योग्य दाबाने सुरळीत कर���वा @MSEDCL @AjitPawarSpeaks
@MSEDCL सहा तासापासून मी धीर धरलेला आहे पण अजूनही माझ्या तक्रारीचे निवारण आपण केलेले नाही. अत्यंत भयंकर पाऊस सुरू आहे आणि अशा परिस्थितीत कमी दाबाने विद्युत पुरवठा सुरू आहे. एक तर बंद करा किंवा सुरळीत करा @AjitPawarSpeaks@MSEDCL @