आज नवी दिल्ली येथील कर्तव्य भवन येथे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री मा. श्री. हरदीप सिंह पुरी यांची महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार मा. श्री. नारायणरावजी राणे साहेब आणि महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या समवेत भेट घेऊन महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.
मच्छीमार बांधवांसमोरील विविध अडचणी, मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना तसेच संबंधित विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री मा. हरदीप सिंह पुरी यांनी आश्वासित केले.
"माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही" हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होता म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावर हा नीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे.
ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हा दुसऱ्या पक्षात गेला, हा घंट्याचा निष्ठावान.
याला आता जिल्ह्यात कुत्र उभ करत नाही, हा ग्रामपंचायतीला पडेल याची अशी परिस्थिती झाली आहे, याचे दोन भाऊ माझ्यामुळे नगरसेवक झाले ते पण हा नमकहराम विसरला पण असो मी लहान लोकांच्या तोंडी लागत नाही, इथून पुढे काही बोलला तर माझे पदाधिकारी उत्तर देतील.
आणि हो रवी चव्हाण साहेबांचा खरा लाभार्थी वैभव आहे हे जग जाहीर आहे.
जय महाराष्ट्र 🚩
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जलसंपदा मंत्री तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री श्री. गिरीषजी महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
आपल्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल हा विश्वास आहे. आपल्याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@girishdmahajan
आज मुंबई येथे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मा. श्री. शंभूराजे देसाई जी यांची मेघदूत निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देणे, नव्या पर्यटन सुविधा निर्माण करणे तसेच जिल्ह्यातील विविध पर्यटनविषयक प्रश्नांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार श्री. दीपकजी केसरकर उपस्थित होते.
📍 कुडाळ, सिंधुदुर्ग | प्रोजेक्ट संजीवनी
कोकणभूमीचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेशजी प्रभू साहेब हे देशासाठी एक संपत्ती आहेत. देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य आणि त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्या कोकणचे आहे, हे आमचे भाग्य आहे.
‘एक थेंब… एक आशा’ या संकल्पनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य व रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ उपक्रमाचा शुभारंभ आज कुडाळ येथे पार पडला.
यावेळी मा. श्री. सुरेशजी प्रभू साहेब, मानव साधन विकास संस्था, अध्यक्षा सौ. उमा प्रभू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, आरोग्य सभापती श्री. प्रितेश राऊळ यांच्यासह डॉक्टर व संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
आरोग्यसेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या सेवाभावी उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏
📍 सिंधुदुर्गनगरी | १५ ऑगस्ट २०२६.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा मुख्यालय, ओरोस येथे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच क्रीडा, महिला व बालविकास आदी विभागातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार श्री. दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, उपाध्यक्ष श्री. दादा साईल, माजी आमदार श्री. राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. अबीद नाईक, जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
माझा अत्यंत खास मित्र, भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे अकस्मात निधन झाले, आज रत्नागिरी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
राजेश सावंत यांच्याशी माझे नेहमीच सलोख्याचे,आत्मीयतेचे नाते होते, त्यांच्या निधनाने एक जिव्हाळ्याचा मित्र हरपला,
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
मध्यरात्री मुंबईतील घाटकोपर परिसरातील गौसिया चाळ परिसरात दरड कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
दरडीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची सुखरूप सुटका व्हावी आणि बचावकार्याला यश मिळो, तसेच या कठीण प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
📍 कणकवली | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान
आज तहसीलदार कार्यालय, कणकवली येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या शुभहस्ते 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' अंतर्गत लाभ वाटप व निवेदन स्वीकृती कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमास उपस्थित होतो.
यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे, आमदार श्री. प्रमोदजी जठार, आमदार श्री. विक्रांतजी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर, माजी आमदार श्री. अजित गोगटे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. अबीद नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. श्री. नारायणरावजी राणे साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!
मुंबई (CSMT) ते सावंतवाडी नियमित एक्सप्रेस धावणार!
कोकणातील प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली. या नव्या रेल्वे सेवेमुळे चाकरमानी, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून, कोकणच्या विकासाला आणि पर्यटनालाही नवी चालना मिळणार आहे.
ही महत्त्वपूर्ण रेल्वे सेवा सुरू केल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री. अश्विनीजी वैष्णव साहेब, तसेच या सेवेसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे कोकणचे भाग्यविधाते तथा खासदार मा. श्री. नारायणरावजी राणे साहेब आणि भारतीय रेल्वे मंत्रालयाचे मनःपूर्वक आभार.
मुंबईतील मुलुंड येथे शिवसेना मुलुंड विधानसभा आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला, या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आगामी वाटचाल, एस.आय.आर. मतदार पुनरीक्षण प्रक्रियेचा आढावा, पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले.
यावेळी ईशान्य मुंबईचे खासदार श्री. संजयजी पाटील, विधानपरिषद आमदार श्री. रवींद्रजी फाटक, भांडुपचे आमदार श्री. अशोकजी पाटील, शिवसेना सचिव श्री. संजय म्हशीलकर, कॅ. श्री. अभिजीत अडसूळ, उपनेते श्री. आनंद जाधव, विभागप्रमुख श्री. जगदीश शेट्टी, माजी नगरसेविका सुजाता पाटक, माजी नगरसेविका सुनंदा पाटील, अश्विनी साळवी तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मालवण येथील दैवज्ञ भवन येथे मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा उद्देशपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी ३५ पात्र लाभार्थ्यांना प्रवासी वाहतूक सेवा उद्देशपत्रांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ, अधीक्षक अभियंता श्री. सुधीर देवरे, नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष श्री. दिपक पाटकर, जि.प. वित्त व बांधकाम सभापती श्री. संतोष साटविलकर तसेच अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या शुभहस्ते मालवण येथील पोलीस जेट्टी पोर्टा केबिनचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम, मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आज मुंबई, गिरगाव येथील आर्यन हायस्कूल येथे शिवसेना व मी मराठी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य वह्या वाटप व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, उपनेत्या श्रीमती आशाताई मामडी, संस्थेचे संस्थापक श्री. परेश तेलंग, माजी नगरसेवक श्री. दिलीप नाईक, दक्षिण मुंबई सहप्रमुख श्री. संतोष नलावडे, महिला विभाग प्रमुख नीलम पवार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.