समतेचे स्वप्न सत्यात उतरवणारे, शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि सामाजिक न्यायाचे अग्रदूत, आरक्षणाचे जनक, बहुजन समाजाच्या न्यायहक्काचे आधारस्तंभ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्यगुरू, स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांचे जीवन म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्वाची महान गाथा आहे. कणखर, विवेकी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा🌹
शोषितांच्या वेदनांना शब्द न देता समजून घेणारी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धगधगत्या मिशनला आपल्या शांत, संयमी आणि त्यागमयी साथीनं आधार देणारी एक समर्पित सावली — रमाई!
आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्याग, सहनशीलता आणि मायेचं प्रतीक असलेल्या रमाईला कोटी कोटी कृतज्ञ अभिवादन!