महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, लातूरचे माजी नगराध्यक्ष, राज्यसभेचे माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले. 'अमेरिकन निग्रो : साहित्य आणि संस्कृती' यासह जवळपास 80 ग्रंथ लेखनातू�� त्यांनी वैचारिक सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात योगदान दिले. 2009 साली युनोमध्ये 150 राष्ट्रांच्या लोकप्रतिनिधींसमोर भारताच्या शांतता धोरणावर त्यांनी दीर्घ भाष्य केले. लोकमत परिवाराशी त्यांचा स्नेह होता. विचारवंत, राजकारणी, साहित्यिक म्हणून ते कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रध्दांजली.