आरतीच्या ज्योती उजळल्या… आणि गोदातीरी इतिहास घडला! एकाच वेळी, एकाच लयीत गोदामाईची आरती करणाऱ्या रामतीर्थावर ६,२३३ जनजातीय बंधू-भगिनींनी एकत्रितपणे केलेल्या गोदा महाआरतीने नाशिकच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला. श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक सहभागाचा हा अविस्मरणीय सोहळा पुन्हा एकदा अनुभवा!
इतिहास घडला… विक्रमवीर नाशिक!
गोदाकाठावर ५१७ शंखांच नाद एकाच वेळी घुमला आणि त्या दिव्य क्षणाने केवळ विश्वविक्रमच प्रस्थापित क��ला नाही, तर नाशिकच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि सामूहिक शक्तीचा आवाज जगभर पोहोचवला.
भारताच्या प्राचीन परंपरेतून उमटलेला हा शंखनाद आज नव्या इतिहासाचा साक्षीदार ठरला.
या क्षणात भक्ती होती.
या क्षणात अभिमान होता.
या क्षणात संपूर्ण नाशिक एकत्र उभं होतं.
सिंहस्थ महाकुंभाच्या मंगलपर्वाची ही केवळ नांदी नाही… हा आहे एका भव्य अध्यायाचा पहिला निनाद.
#nashik #nashikkar #simhasthamahakumbh #guinessworldrecord
राज्यातील #भरतीपरीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्श��, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी #परीक्षा पद्धतीत मूलभूत बदलांची आवश्यकता असून, उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून तीन महिन्यांत राज्य शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली.
राज्यातील पाचही महसूल विभागांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला असून, समितीला आतापर्यंत सुमार�� ३० हजार ई-मेल व निवेदनांद्वारे सूचना प्राप्त झाल्या आहेत, तर सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला आहे.
परीक्षा वेळापत्रक व अभ्यासक्रमाचे दीर्घकालीन नियोजन, जाहिरात ते नियुक्ती प्रक्रिया कालबद्ध करणे, ‘वन प्लॅटफॉर्म–वन रजिस्ट्रेशन’, गैरप्रकारांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आणि परीक्षांसाठी ‘मॉडेल कोड ऑफ कंडक्ट’ यांसह अभ्यासक्रम, परीक्षा कालावधी, प्रश्नपत्रिका तयार करणारे तज्ज्ञ आणि त्यांच्या मानधनासारख्या बाबींचाही समिती अभ्यास करणार आहे. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या ३०० ते ४०० विविध मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या शिफारशी शासनाला करण्यात येणार असल्याचे व्ही. राधा यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या सूचना व अभिप्रायातून अधिक चोख, पारदर्शक आणि ��िश्वासार्ह परीक्षा पद्धती निर्माण करण्यास मदत होईल, असे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी सांगितले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल (निवृत्त) अजित भोसले यांनी उमेदवारांना केंद्रस्थानी ठेवून व्यापक, सर्वसमावेशक व कालमर्यादित शिफारशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
डॉ. एन. रामस्वामी यांनी राज्य शासन व एमपीएससीच्या भूमिकेचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले, तर वीरेंद्र सिंह यांनी इतर राज्ये व केंद्रीय संस्थांमधील अडचणी निवारणाच्या पद्धतींचा अभ्यास केला जाणार असल्याचे सांगितले.
विभागीय आयुक्त तथा समिती सदस्य डॉ. प्रवीण गेडाम यांनी परीक्षा पद्धती, पायाभूत सुविधा, प्रश्नपत्रिकेची रचना आणि पर्याय निवडण्याच्या पद्धतीबाबत विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्याचे सांगितले.
धुळे जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वंचित राहू नये. लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. #मतदारनोंदणी#Dhule
#नाशिक
���तदार यादी पुनरीक्षण अधिक पारदर्शी होण्यासाठी
राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय बीएलएची नेमणूक करावी
मतदान केंद्रांची रचना मतदारस्नेही करण्यास प्राधान्य द्यावे
:विभागीय आयुक्त डॉ. @PraveenGedam
@CollectorNashik
@my_nmc
@MaharashtraSEC
#नाशिक
मतदार यादी पुनरीक्षण अधिक पारदर्शी करण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय बीएलएची नेमणूक करावी. मतदान केंद्रांची रचना मतदारस्नेही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. @PraveenGedam यांनी दिले.
@CollectorNashik@my_nmc@MaharashtraSEC
सिंहस्थ कुंभमेळ्यातील संभाव्य म���ठ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, आरोग्य, स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी नाशिकसह संलग्न जिल्ह्यांमध्ये प्रभावी समन्वयावर भर देण्यात आला.
नाशिकमध्ये ८ ते १० कोटी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे ४ कोटी भाविक येण्याचा अंदाज लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण, शटल सेवा, आवश्यक सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे नियोजन अधिक बळकट करण्यात येत आहे.
#simhasthamahakumbh #nashik #nashiknews #nashikkumbhmela