एकापाठोपाठ एक मराठी सिनेमागृह ���ाना टाकत असताना बंद नाट्यगृह सुरु करून नाट्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून तुम्ही धडाकेबाज सुरुवात केली आहे. अध्यक्षपदी विराजमान होताच हा पहिला कार्यक्रम हाती घेतलात. यापेक्षा यथोचित सुरुवात दुसरी असूच शकत नाही.
तमाम नाट्य रसिक तुमचे ऋणी रहातील धन्यवाद सर
दर महिन्याला उपलब्ध होत असलेले 'एकमेव व्यासपीठ'
@ विशाखा कशाळकर प्रतिष्ठान, निर्मित
'खुला एकांकिका वाचन मंच स्पर्धा'
उपक्रम 1 : 29 नोव्हेंबर 2022, 4 pm ते 10 pm ( रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर )
लेखन, वाचन, तज्ज्ञ व दर्शकांच्या उपस्थितीत चर्चा-मूल्यमापन ते प्रकाशनाची ठोस योजना
व्हिसल ब्लोईंग सूट” ( मराठी चित्रपट )
Audio-Visual |दृकश्राव्य | Multi Layered | बहुस्तरीय आविष्काराचा आगळा वेगळा प्रयोग !!
****** USE HEADPHONES FOR BETTER EXPERIENCE *******
https://t.co/AjkAoWDtrv
मा. श्री. द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपति
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदानापासून तब्बल 122 वर्षानंतर....
अगदी स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत वाट पहात तिष्ठत असलेला सर्व वनवासी, आदिवासी समाज आज तुमच्या रूपाने देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला आहे.
🙏🌹
शिवलेल्या नववाऱ्या,
शिवलेली धोतरं, फिल्मी गाण्यांच्या चालीत गुदमरणाऱ्या लोककला.तू माझ्या टिऱ्या बडव मी तुझे ढोल वाजवतो.महाराष्ट्र देशाची एकूणात उसवत चाललेली संस्कृती. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चरित्रांची गावठी वर्जन्स. करतोय ना कुणीतरी? या उपकारात काय करतोय त्याचे काहीच न वाटणं...
विस्टल ब्लोइंग सूट Whistle blowing suit
गीत - सृष्टि हे घर, कैक जीवांचे
गीतकार - ज्ञानेश्वर मर्गज
गायक - राहुल देशपांडे
गायिका - मधुरा कुंभार
संगीतकार - परीक्षित भातखंडे
स��शोधन, कथा, पटकथा, संवाद, निर्माता आणि दिग्दर्शक - ज्ञानेश्वर मर्गज
प्रमुख भूमिका - विशाखा कशाळकर
पहिनावे पर मत जाईये जनाब
गिरेबान झाक कर देखिये
उलझा हुआ सा कोई
भीतर दुबक कर बैठा है
वो आदिवासी है.
बस इल्म समझो...
वो मुझमे भी है और
आपमे भी !!!!!!
#आदिवासी#adivasi#hindimovies#ज्���ानेश्वर_मर्गज
एरवी माय मराठीला पायरीवर सुध्दा बसू न देणारे आज तिला डोक्यावर घेवून कसे काय नाचत आहेत?
कधी नव्हे तो मराठी भाषा दिवस इतका जल्लोषात कसे साजरा करतायत सगळे पक्ष?
निवडणुका जवळ आल्यात का?
दिवसाच्या प्रत्येक क्षणाची सोबत केलेला आवाज शांत झाला. सप्तसूर पोरके झाले आणि सर्वांना शोकमग्न करीत
माता सरस्वतीचे स्वर्गलोकी प्रस्थान झाले.
भावपूर्ण आदरांजली आणि सस्नेह धन्यवाद. देवी, तू आमच्या आयुष्याची संगीत साक्ष आहेस. 🙏🌷
#ज्ञानेश्वर_मर्गज
150 वर्ष पारतंत्र्यात झगडलेल्या प्रत्येक ज्ञात अज्ञात वीरांमुळे मिळालेले स्वातंत्र्य 75 व्या वर्षात पदार्पण करते आहे.
आमचा यातला वाटा शून्य !! फक्त जाण आणि भान ठेवले तरी पुरेसे आहे.
ज्यांना स्वातंत्र्याचे मोल आहे त्यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सस्नेह शुभेच्छा !!
आठही दिशांनी कानीकपाळी नकारार्थी बडबड, गॉसिप आणि येता जाता खच्चीकरण करणाऱ्या सर्व स्वकियांच्या मेंदूच्या ठिकऱ्या करीत, त्याचा भाला पार 87.58 मीटर अंतरावर गेला. आणि ' गोल्ड ' झाला.
#ज्ञानेश्वर_मर्गज