आज शिवराज्याभिषेक द��न. या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
६ जून १६७४ ला जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल त्यावेळचं वातावरण काय आनंदी, उत्साही असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण हिंद प्रांत हा परकीयांच्या आक्रमणाने पूर्ण खचला होता. आक्रमकांच्या फौजांपुढे आपला टिकाव लागणारच नाही हे गृहीत धरून जवळपास प्रत्येक जण आक्रमकांना शरण गेला होता. अशावेळेला 'स्वराज्य' असावं असं स्वप्न बघायचं, आणि वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यायची आणि पुढे १ वर्षांत तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ करायची.
पुढे जवळपास २९ वर्�� झुंज देऊन एक असं राज्य जिथे आपली संस्कृती, आपली भाषा, यांना कुठलाही अटकाव नाही, आपली करपद्धती, आपली राज्यशासन पद्धती असलेलं एक राज्य उभं करायचं आणि त्याची घोषणा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगासमोर करायची. हा दिवस असा दिवस आहे ज्याने पुढे मरहट्ट्यानी हिंद प्रांतावर राज्य केलं, त्याची बीज रोवलीच पण पुढे ब्रिटिशांच्या विरोधात उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देखील राज्याभिषेक दिनातूनच मिळाली.
या दिवसाची तुलना ही ४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेतील १३ वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा केली त्याच्याशी होऊ शकते किंवा १४ जुलै १७८९ साली झालेल्या फ्रेंच क्रांतीच्या दिवसाशी होऊ शकते. या दोन्ही घटना घडायच्या आधी जवळपास १०० वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झा���ा, ज्यातून त्यांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा विचार रुजवला.
जसं या दोन घटनांनी अमेरिका आणि युरोप यांचा भूगोल बदलला आणि भविष्यच बदललं तशीच ताकद आपल्या शिवराज्याभिषेक दिवसांत आहे.
हा दिवस फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सण म्हणून साजरा व्हायला हवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची आस सामान्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढची अनेक शतकं हा हिंद प्रांत खितपत पडला असता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासार��ा साजरा व्हायला हवा.
आणि मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करत हा दिवस साजरा करावा.
पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !
राज ठाकरे ।
'आशाताई' -दि लास्ट एम्परर
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.
लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्��, आदर्शवत वाटत राहतं.
तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.
'गाणं हे माझं पॅशन आ��े' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात ��्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.
मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी ��पल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.
'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' ��्हणत युगायुगांचं वैराग्याच�� प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.
व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.
जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी ��ाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.
मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला !
जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशात��ई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !
आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.
राज ठाकरे।
भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर��ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन.
त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील.
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेल��, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक श���कसंवेदना. ॐ शांती.
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नस��ल तर ते तोंडावर सांगायचं ��णि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच��या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
1. Data Scientist toolbox :
Give Away Alert!!
1. Artificial Intelligence
2. Machine Learning
3. Cloud Computing
4. Ethical Hacking
5. Data Analytics
6. AWS Certified
7. Data Science
8. BIG DATA
9. Python
10 MBA
For 24 Hours only!
To get it:
1. Like, Retweet and Follow
2. Reply "Send"
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता,टायमिंग व विविध भावछटांच्या सशक्त सादरीकरणासाठी त्यांना हा सन्मान मिळाला
विनोदानं मराठी मन जिंकलं, अभिनयानं अख्खं भारत!
अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा हा गौरवपूर्ण क्षण प्रत्येक #मराठी माणसाच्या काळजात अभिमानाचं स्पंदन जागवतं.
मराठी कलाविश्वासाठी ऐतिहासिक क्षण.
हास्याचा बादशहा आज देशाच्या ���न्मानाचा मानकरी ठरतोय.!!
अभिनंदन अशोक मामा ❤️❤️
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एका फ्लाइटमधून प्रवास करत असताना, फ्लाइट क���प्टनने अशोक सराफ यांच्या सख्ख्या भाचीच्या तोंडून अशोक मामांना मनमोहक अनाउन्समेंट करत सन्मान व्यक्त केला. अशोक मामा यांना मिळालेला हा आदर पाहून मनभरून आनंद आणि अभिमान वाटतो.
#LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #AshokSaraf #Padmashree
#महाराष्ट्र_दिन#१_मे_२०२५
मराठी माणसाच्या भल्यासाठी #स्वायत्तमहाराष्ट्र हाच एकमेव पर्याय आहे.
आम्ही परप्रांतीय लोंढे रोखण्यासाठी व्हिसा कायदा(InnerLine permit) आणि अधिवास कायद्याची मागणी करत आहोत. राज्यातील नोकऱ्या, परवाने स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने मिळण्यासाठी मागणी करत आहोत. पण हे सर्व करण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करावे लागणार आहे. जुने विचार बाजूला ठेवून, नवीन विचाराने काम करावे लागणार आहे.येणाऱ्या काळात #मराठी मुद्दावर संघर्ष अटळ आहे. महाराष्ट्र राज्यावरील हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, #स्वायत्तमहाराष्ट्राची मागणी लावून धरावी लागणार. जर या मागण्यांसाठी आपण संघटित झालो नाही, तर येत्या काह�� दशकात राज्यावरील आपले हक्क अधिकार संपुष्टात आलेले असतील.
मुंबईसह महाराष्ट्र राज्य व्हावे ��ासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. 🙏
#autonomousmaharashtra
महाशिवरात्रीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. महादेवांच्या आशीर्वादाने सर्वांना संपन्न, समृद्ध आणि आरोग्यदायी आयुष्य लाभू दे, हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना.
हर हर महादेव !
#महाशिवरात्री२०२५#Mahashivratri2025
आज आमचा अतुल गेला.... एक उमदा नट आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ���सं अतुलचं होतं. आम्ही सगळे बालमोहन शाळेचे विद्यार्थी. आम्ही शाळेत असतानाचा काळ असा होता की सिनेमाच्या जगातले राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे आमचे शाळेबाहेरचे हिरो पण अर्थात आमच्यापासून मैलांवरचे असलेले हिरो किंवा आम्ही त्यांचे चाहते म्हणू. पण शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे. तो त्या काळात बजरबट्टू नावाच्या नाटकात काम करायचा . शाळेत असताना पण तो उस्फुर्त आणि उमदा नट. अतुल हा जन्मजात अभिनेता असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
शाळेत असताना त्याचा आणि माझा फारसा मैत्र नव्हता, पण आमच्या साठी तो तेव्हाच एक सेलिब्रिटी होता ! कॉलेजला गेल्यावर जरी आमची कॉलेजेस वेग��ी होती तरी आमची मैत्री झाली आणि ती घट्ट पण होत गेली. अतुल हा खरा रंगकर्मी. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली अशा नाटकांमध्ये अतुलने जे काम केलं अफाट होतं. बरं अतुल इतका नशीबवान अभिनेता की, त्याचं व्यक्ती आणि वल्ली मधलं काम पु.ल. देशपांड्यांनी फक्त पाहिलं नाही तर त्याला दाद देखील दिली.
मी जेंव्हा पक्ष स्थापन केला, तेंव्हा अतुलने पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म देखील भरला होता. तेंव्हाच्या राजकीय परिस्थितीत एखाद्या कलाकाराने असं पाऊल उचलणं हे धाडस होतं, पण ते त्याने दाखवलं. तो पुढे माझ्या कुटुंबाचा भाग बनला होता. कायम आनंदी, जरा जास्तच गुटगुटीत असा हा आमचा मित्र, ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो, असा अतुल जेंव्हा कर्करोगाशी झुंज देऊन बाहेर आला, आणि जेंव्हा तो खंगला होता, तेंव्हा तो आमच्या मित्रांपै���ी कोणालाच बघवत नव्हता.
पण अशा अवस्थेत सुद्धा तो आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होता.
मी म्हणलं तसं अतुल हा प्रतिभावान कलावंत होता आणि वृत्तीने आनंदी होता. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपट केले, टीव्ही मालिका केल्या, हिंदीत पण त्याने अनेक टीव्ही शो केले पण अतुल हा खरा रंगकर्मी. त्याचा रंगमंचावरचा वावर, त्याच्या विनोदाच्या टाईमिंगचा असलेला सेन्स सगळंच अप्रतिम होतं. अभिनयावर कमालीचं प���रेम असलेल्या अतुलने अकाली 'एक्झिट' घेतली, पण जाताना रंगभूमीपासून, सर्व मित्रांच्या आयुष्यातलं काही तरी निखळलं ही भावना ठेवून गेला.
आमच्या या मित्राला माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.