Honoured to receive appreciation from Hon’ble Defence Minister Shri Rajnath Singh Ji for my parliamentary performance and effective articulation of issues in Parliament. His words are a great source of encouragement and inspiration. Grateful to him for his kind words and valuable appreciation.
केंद्रीय संरक्षणमंत्री मा. श्री. राजनाथ सिंहजी यांनी आज ‘सिंदूर महारक्तदान शिबिरा’दरम्यान माझ्या संसदीय कामगिरीचे आणि संसदेत प्रभावीपणे विचार मांडण्याच्या शैलीचे कौतुक केले. देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ, अनुभवी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वाकडून मिळालेली ही कौतुकाची थाप माझ्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. या अभिप्रायाबद्दल आदरणीय मंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde
आफ्रिकेतील युगांडाच्या एका छोट्याशा शाळेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष..!!
महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या युगांडातील या शाळेत एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि स्वराज्याच्या विचारांची ओळख करून देणारे प्रेरणादायी भाषण केल्याचा व्हिडिओ पहिला. महाराजांच्या इतिहासाने आणि विचारांनी भारावलेल्या या परदेशातील विद्यार्थ्याचा आत्मविश्वासाने केलेला जयघोष खरोखरच मनाला स्पर्शून जातो. महाराष्ट्रातील काही तरुणांकडून हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. यावेळी मराठी तरुणांनी या शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट देत तसेच वह्यांचे वाटप करून महाराजांचा इतिहास आणि त्यांचे प्रेरणादायी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर प्रयत्न केला.
महाराजांचा इतिहास केवळ महाराष्ट्राचा नाही, तर जगभरातील प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला हा विचार आज आफ्रिकेतील युगांडापर्यंत पोहोचला आहे, हीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची ताकद आहे. असा प्रेरणादायी उपक्रम राबविणाऱ्या तरुणांचे अभिनंदन.
#Shivsena #Drshrikanteknathshinde #छत्रपतीशिवराय #africa
📍 सिंदूर महारक्तदान यात्रा, नवी दिल्ली
केंद्रीय संरक्षणमंत्री मा. ना. श्री. राजनाथजी सिंह साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे शिवसेना आयोजित ‘सिंदूर महारक्तदान यात्रा आणि शिबिरा’मध्ये आज सहभागी होत आवर्जून रक्तदान केले. ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या शूर जवानांच्या त्यागाला कृतज्ञतापूर्वक सलाम करण्यात आला.
महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी श्री. चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले शिवसैनिक, कार्यकर्ते, पैलवान आणि रक्तदाते या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. रक्तदान ही छोटी गोष्ट नाही; एखाद्याचा जीव वाचवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. जवानांच्या सन्मानासाठी महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे. देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या आपल्या जवानांच्या पाठीशी महाराष्ट्र सदैव खंबीरपणे उभा राहील, हीच भावना या माध्यमातून व्यक्त झाली.
सीमेवर देशाच्या रक्षणासाठी उभे असलेल्या जवानांच्या पाठीशी महाराष्ट्र रक्तदानातून उभा राहिला आहे, हा संदेश या महारक्तदान यात्रेतून देण्यात आला. जवानांच्या त्यागाला केवळ शब्दांनी सलाम न करता, सेवाभावातून राष्ट्रभक्ती कृतीत उतरविण्याची प्रेरणा या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न आहे. ‘सिंदूर महारक्तदान’ हा केवळ रक्तसंकलनाचा उपक्रम नाही, तर देशाच्या सीमांवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या त्यागाची समाजाला जाणीव करून देणारी आणि त्यांच्या शौर्याला कृतज्ञतापूर्वक नमन करणारी राष्ट्रभक्तीची चळवळ आहे.
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मा. श्री. राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र निर्मिती आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला मिळणारी चालना यामुळे भारताचे संरक्षण कवच अधिकाधिक मजबूत होत आहे. आपल्या जवानांचे शौर्य, त्याग आणि समर्पण यांना बळ देणाऱ्या या आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी मत व्यक्त केले. तर आदरणीय संरक्षण मंत्री महोदयांनी या उपक्रमाचे कौतुक करत यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, उद्योग मंत्री उदय सामंत, व्हाइस ॲडमिरल आरती सरीन, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, लेफ्टनंट जनरल नीरज सेठी, लेफ्टनंट जनरल अविनाश दास, खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह लष्करी अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, पैलवान, कार्यकर्ते आणि रक्तदाते उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #दिल्ली #रक्तदानजीवनदान
जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवत आहे. अशा जगभरातील मराठी बांधवांना एका छताखाली आणून मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचा जागर करणारे बीएमएम कन्व्हेन्शन माझ्या मनाच्या अगदी जवळचे आहे. थोरामोठ्यांपासून Gen Z पर्यंत सर्वजण या सोहळ्यात उत्साहाने सहभागी होतात. साता समुद्रापार मराठीपणाची पालखी अभिमानाने मिरवताना पाहणे, हा माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.
यंदाचे कन्व्हेन्शन सिएटल येथे ६ ते ९ ऑगस्टदरम्यान पार पडले. उद्घाटनासाठी मी प्रत्यक्ष येणार होतो; खरं तर निघालोही होतो. मात्र तांत्रिक कारणामुळे विमान दुबईला उतरवावे लागले आणि फ्लाईट रद्द झाली. पुढची फ्लाईट न मिळाल्याने मला भारतात परतावे लागले. त्यामुळे व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा देऊन समाधान मानावे लागले.
माझा संदेश त्या भव्य सोहळ्यात दाखवण्यात आला आणि त्यानंतर मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहून मन भरून आले. प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही मनाने मात्र मी त्या सोहळ्याचा एक भाग होतो.
डॉ. माधुरी कानिटकर आणि अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन, प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे यांचे कलाविष्कार आणि ‘द फोक आख्यान’सारखा लोककलेचा रोमांचक आविष्कार प्रत्यक्ष अनुभवता आला नाही, याची खंत मनात नक्कीच राहील.
परदेशात राहूनही मराठीची माती आणि मायबोलीची नाळ जपणाऱ्या प्रत्येक मराठी बांधवाला मनापासून सलाम. पुढच्या पिढीच्या मनात मराठीपणाची ज्योत तेवत ठेवण्याचे हे कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने जगभर मराठीची पताका फडकवण्याचे काम आहे.
२०२८ मध्ये वॉशिंग्टन डीसी येथे होणाऱ्या पुढील अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा माझा शब्द मी आजच देत आहे.
बीएमएमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
जगाच्या पाठीवर कुठेही मराठी माणूस असो त्याच्या सुख-दुःखात आणि प्रगतीच्या वाटचालीत मी सदैव खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहील, याची ग्वाही देतो.
#Shivsena #Drshrikanteknathshinde
Embrace Change. Build the Future. 🇮🇳
Hon’ble PM Shri Narendra Modi Ji’s message is a call to action: turn challenges into opportunities, embrace innovation, and together build a stronger, more future-ready India.
#Shivsena#DrShrikantEknathShinde#IIT#iitdelhi
देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांची आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान महोदयांना उपमुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठूरखुमाईची मूर्ती भेट स्वरूपात दिली. यावेळी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली. राज्यातील पायाभूत सुविधा, विविध विकासप्रकल्प तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे सर्व मान्यवर खासदार उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde