|| क्षत्रिय || ९६ कुळी, मराठा || राम कृष्ण हरी || रुक्मिणी रमणा विठ्ठल || श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज 🧡 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय ||
|| विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा
करी पापा निर्मूळ ||
|| भाग्यवंता छंद मनीं
कोड कानीं ऐकती ||
|| विठ्ठल हें ��ैवत भोळें
चाड काळें न धरावी ||
|| तुका म्हणे भलते याती
विठ्ठल चित्तीं तो धन्य ||
✨ जय हरी विठ्ठल ✨
#सर्वसत्ताधिशः वैकुंठनाथ 💛
|| हरिहरां भेद नाहीं
करू नये वाद ||
|| एक एकाचे हृदयीं
गोडी साखरेच्या ठायीं ||
|| भेदकासी नाड
एक वेलांटीच आड ||
|| उजवें वाम भाग
तुका म्हणे एकचि अंग ||
✨ राम कृष्ण हरी ✨
🕉️ नमः शिवाय 🕉️
#वैकुंठनाथ 💛
|| विषयीं विसर पडिला निःशेष
अंगीं ब्रह्मरस ठसावला ||
|| माझी मज झाली अनावर वाचा
छंद या नामाचा घेतलासे ||
|| लाभाचिया सोसें पुढें चाले मन
धनाचा कृपण लोभी जैसा ||
|| तुका म्हणे गंगा सागरसंगमीं
अवघ्या झाल्या उर्मि एकमय ||
✨ राम कृष्ण गोविंद ✨
#व���सुदेव_नारायण 💛
|| लहानपण दे गा देवा
मुंगी साखरेचा रवा ||
|| ऐरावत रत्न थोर
त्यासी अंकुशांचा मार ||
|| ज्याचे अंगी मोठेपण
तया यातना कठीण ||
|| तुका म्हणे जाण
व्हावें लहानाहूनि लहान ||
✨ जय हरी विठ्ठल ✨
वैकुंठनाथ 💛
|| विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा
करी पापा निर्मूळ ||
|| विठ्ठल हा चित्ती
गोड लागे गातां गीती ||
|| भाग्यवंता छंद मनीं
कोड कानीं ऐकती ||
|| विठ्ठल विठ्ठल वाणी
अमृत हे संजीवनी ||
|| विठ्ठल चित्ती तो धन्य
तुका विठ्ठल सर्वांगें ||
✨ जय हरी विठ्ठल ✨
#सर्वसत्ताधिशः_वैकुंठनाथ 💛
|| नको नको मना गुंतू मायाजाळी
काळ आला जवळी ग्रासावया ||
|| काळाची हे उडी पडेल बा जेंव्हा
सोडवीना तेंव्हा मायबाप ||
|| सोडविना राजा देशींचा चौधरी
आणिक सोइरी भली भली ||
|| तुका म्हणे तुला सोडवीना कोणी
एका चक्रपाणी वांचुनियां ||
जय हरी विठ्ठल 💛
⚜️ शिवभक्त मा. श्री. अनिकेत (दादा) जावळकर ⚜️
• शिवसेना युवासेना समन्वयक, महाराष्ट्र राज्य.
• लोकसभा संपर्कप्रमुख - शिरूर मतदारसंघ.
• युवासेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य.
• आधारस्तंभ - शिवभक्त प्रतिष्ठान वारजे.
जय शिवराय जय महाराष्ट्र!!
#शिवसेना_युवासेना 🏹🚩