For kids - at the completion of 1St Year is आयुष होमम्!
We take care of all the Dharmic Vidhis with Panditji and साहित्य सामग्री व्यवस्था!
Operational across Mumbai, Pune, Navi Mumbai and Thane.
+91-9167968204
शुभं भवतु |
@mrudulabarve
#चातुर्मास_स्��ेशल
एक शुभ विधी, एक श्राद्ध विधी आणि एक उपासना!
@Hello_oPandit
|| जय जय रघुवीर समर्थ ||
श्रावण सुरू आहे, आपण घरी कोणती पूजा, कोणता विधी करून घेतलात?
आम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये!
We are OPandit ! A dedicated team of Guruji and professional purely working in niche Dharmic Vidhi Area!
We provide one stop solution for all Dharmic Vidhis! Operational in Mumbai, Pune, Navi Mumbai and Thane!
Contact no: +91-9167968204
शुभं भवतु |
---- मृदुला बर्वे, ओपंडित
#सत्यनारायण#शुभ_चातुर्मास
एक शुभ विधी, एक श्राद्ध विधी आणि एक उपासना!
चातुर्मासात खूप मोठ्या प्रमाणावर केला जाणारा विधी म्हणजे सत्यनारायण पूजा.
मध्ये एक मोठा अपप्रचार झाला की मुसलमानांकडून हा विधी म्हणे आपल्याकडे आलाय! कुंपणावर बसलेल्या संधीसाधू लोकांनी ल���ेच टूणकन तिकडे उडी मारली. "आपुले आपण अनहित केले!" आणखी काय?
सत्यनारायण पूजा खूप पूर्वीपासून भारतात होते. प्लीज पेशवे करत नव्हते सांगु नका, पेशवे आणि आपण ह्यात कणभरही साम्य नाही 😊😊
हं तर, सत्यनारायण पूजा पूर्ण भारतात अनेक वर्षे विविध पद्धतीने होते. स्कंदपुराण आणि भविष्यपुराण इथे ह्याचे रेफेरेन्स आल��� आहेत.
सत्यनारायण प्रमाणे जे सत्यविनायक आहे ती पूजा तर सुदाम देवांकडून श्रीकृष्णाने करून घेतली आहे आणि मग त्याला नगरी दिली आहे. म्हणजे - "सत्यसंग्रह - सत्यनारायण, सत्यदत्त, सत्यविनायक आणि सत्यअंबा" हे द्वापारयुगामध्ये सुद्धा होत होते, म्हणजे साधारणपणे 6 ते 7 हजार वर्षे नक्कीच होते आहे.
कोण आहेत हे सत्यनारायण देव? तर अर्थात महाविष्णु! ज्या महाविष्णूंचे आपण भागवत सांगतो, असा असा अतिशय शक्���िशाली देव. हा देव भगवती जगदंबेला डायरेक्ट रिपोर्ट करतो हं!
भागवतात ह्या महाविष्णु चे वर्णन आले आहे - "सच्चिदानंद रूपाय..." जो एकमेव सत्य आहे असा तो! बुवा नेहमी सांगतात त्यांच्याच शब्दात - ज्याचे असणे कधी नसण्यात बदलत नाही असा म्हणजे तो नारायण. परम सत्य असलेली एकच व्यक्ती म्हणजे नारायण, महाविष्णु, म्हणून सत्यनारायण...
असे हे सत्यनारायण व्रत. वर्षाचे 365 दिवस, कधीही करू शकू असे व्रत, अशी ही पूजा. ह्या पूजेला मुहूर्त, वेळ ह्याचे बंधन नाही. संक्रांत, पौर्णिमा ह्या दिवशी केल्यास विशेष फळ आहे (पण ह्याच दिवशी करावे असे काही नाही).
महाविष्णुंचाच अवतार असलेला आपला लाडु लाडोबा बाळकृष्ण ह्याची षोडशोपचारे पूजा करून 1000 तुळशीपत्र देवतेला अर्पण केली जातात.
आता बाळकृष्णच पाहिजे का? असे काही नाही, तुमच्याकडे विठ्ठल मूर्ती असेल, श्रीराम मूर्ती असेल, श्रीनृसि��ह मूर्ती असेल, श्रीबालाजी मूर्ती असेल तरी चालेल. कुठलीच मूर्ती नाहीये, मग सुपारीवर सुद्धा आवाहन करून पूजन करता येते.
#सत्यनारायण_फोटो?
सत्यनारायणकथेत फोटो लागतोच का? अजिबात गरज नाही. असेल तर जरूर ठेवावा. एक लक्षात घ्या, फोटो मध्ये देवतेचे आवाहन करता येत नाही, अभिषेक करता येत नाही. फोटो मधील सगुण रूप हे फक्त आपल्या भावना उद्यपित करण्यासाठी असते.
अनेक जणं सत्यनारायण पूजेत पाठीमागे आरसा ठेवतात. तो आरसा आपली टोपी आरश्यात बघून सरळ करायला किंवा "make up- नखरा" पाहायला नाही तर पूजा करताना देवाला फुले वाहताना, जेव्हा स्वतःच्या चेहऱ्यावर नजर पडेल तेव्हा आपल्याला जाणीव व्हावी की आपण त्या परमात्म्याचे रूप आहोत, म्हणून आहे. अशा प्रकारचे आनंद देणारे ध्यान लागावे, काही काळापुरते तरी आपण देवाशी एकरूप व्हावे म्हणून तो आरसा आहे.
सत्यनारायण देवाला शिरा खूप आवडतो. साखर, तूप, केळं, रवा आणि दूध सव्वा च्या प्रमाणात घेऊन विशेष शिरा बनवला जातो. म्हणजे सव्वा किलोच पाहिजे का? नाही हो! कुठलीही वाटी घ्या. रव्याने पूर्ण भरा. बाजूच्या ताटलीत काढून घ्या. आता वाटी पाव भरा. परत त्याच ताटलीत ओता. हे झाले सव्वाचे प्रमाण... आता असेच बाकीच्या पदार्थांचे करा म्हणजे झाला सव्वा मापातला शिरा...
आपली संस्कृती, त्यातल्या पूजा केवळ श्रीमंतांसाठीं नाहीत. अगदी गरिबीतला गरीब माणूस, सुपारी एवढ्या वाटीने सुद्धा सव्वा मापातला शिरा करू शकतो की नाही?
देव पण आपल्याला पुण्य सव्वा पटीत देतो बरंका!
आणि मग वेळ येते कथेची. कथेचे पाच अध्याय, गरीब ब्राह्मण, कलावती, पूजा करायचे विसारणारा वैश्य, त्याचा बुडणारा जावई, अंगध्वज राजा वगैरे वगैरे... हो हो, माहितेय, सर्वांनी अनेकदा गोष्ट ऐकली आहे. पण खरंच "ऐकली" आहे का हो? ह्या कथांतून काय संदेश पोहोचतो?
ब्राह्मण - ब्रह्म जाणणारा, ज्ञानी. अशा व्यक्तींवर देवाची विशेष नजर असते. मग तो भलेही गरीब असो. अशा व्यक्तीना योग्य वेळेला योग्य दिशा दाखवायची व्यवस्था देव करतोच. अशा गरीब ब्राह्मणाला देवाने हे व्रत सांगितले.
वैश्य वाणी, पोर नाही म्हणून अतिशय दुःखात असलेला देवाला वचन देतो, की मला पोर झाले तर मी तुझी पूजा करेन. पूजा करणे म्हणजे काय? देवाला आवडते ते करणे, त���े वागणे, तर असा हा वैश्य वाणी देवाकडून सर्व मागून घेतो, आनंदी होतो आणि अहंकारी बनून आपले वचन विसरतो...
असे विसरणे आवडेल का देवाला? अहो आपल्याला साधा वाढदिवसाला एखाद्याचा फोन नाही आला तर आपण रुसून बसतो. कमीतकमी व्हाट्स ऍप मेसेज तरी करायला हवा होता की नाही? बरं, विसरला तर दोन दिवसांनी "be lated" वाला मेसेज तर पाठवू शकतो? ही काय पद्धत झाली? इतके busy?
आपल्याला आवडणार नाही तर देवाला का आवडावे?
1/2
Think of a Dharmic Vidhi, Think of oPandit!
Only 2 months left for Ganesh Chaturthi and one of the biggest problems is finding Gurujis.
@Hello_oPandit has a unique way of executing dharmic rituals on Ganesh Chaturthi day!
#Chembur#Ganapati#Ganesh_Chaturthi
Currently Chembur area bookings are going on.
Only 2 slots left, one at 9:30 AM and another at 12.00 noon!
Contact details: +91-9167968204
शुभं भवतु |
Memories of last year... Another achievement!
I was awarded on International Women's day as a successful entrepreneur!
We started oPandit 10 years ago to provide platform for all Dharmic rituals. The company is running successfully and we achieved more than we expected.
With 800 pandits on panel we have done more than 10,000/- rituals and with complete knowledge based approach!
May god Shiv bless us on this auspicious day!
ओपंडित, शुभं भवतु |
@Hello_oPandit@shekharmalik@PNGJewellers
श्राद्ध...
One of the most important responsibilities of the son/daughter is to help in the सद्गती of the departed soul...
Never skip the Shraaddha.
We take care of complete Sahitya Samagree and Panditji vyavastha across Mumbai, Pune, Thane
Contact oPandit - +91-9167968204
@MrinalPande1 Disagree... You are trying to exaggerate here... She should be able to pick up the sword!
Why don't you give this gyaan to other Pantha? Why only we get your unwanted advises?
Think of a Dharmic Vidhi, Think of oPandit!
We are team of professionals who take care of end to end execution of a Dharmic Ritual.
Operational in Mumbai, Pune, Navi Mumbai and Thane, we have performed more than 5,000/- Dharmic Vidhis.
Contact us on: +91-9167968204!
Vastushanti muhurtas have started from today!
If you have purchased a new home ( resale or newly constructed) you must get Vastushanti done, it is the first vidhi/ritual which should be performed in your newly purchased property.
https://t.co/nb2oXpNJ8z helps you with complete Sahitya and Samagree arrangements and good Panditji arrangements. We also have a knowledge sharing session for every Dharmic ritual.
Don't blindly do the ritual, as we say - know it and do it ☺️
We are operational across Mumbai, Navi Mumbai, Thane and Pune and we can be reached on phone number - +91-9167968204
Or write to us - [email protected]@Hello_oPandit
शुभं भवतु |
"जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत्"
आपण एखाद्या खूप मोठ्या संकटात असाल तर जरूर करून घ्या.
मुंबई, पुणे, नवी मुंबई व ठाणे ��थे आम्ही भागवत संहिता वाचन व्यवस्था करू शकतो.
सम्पर्क क्रमांक - +91-9167968204
ओपंडित, शुभं भवतु |
#भागवत_संहिता_वाचन
"जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत्" ...
श्रीमद् भागवत - 18 पुरणांपैकी सगळ्यात महत्त्वाचे - ज्याला महापुराण म्हणले गेले, असे हे पुराण.
पूर्ण भागवत कथा, यज्ञ वगैरे सहित आयोजित करणे अनेकांना, अनेक कारणांमुळे जमत नाही. कारण असे आयोजन म्हणजे फक्त पैसे बळ असून उपयोग नाही तर मनुष्य बळ सुद्धा लागते.
त्याहून छोटे म्हणजे भागवत संहिता वाचन घरी करून घेणे. हे मात्र करून घेणे आपल्याला सहजतेने शक्य आहे.
आटोपशीर मांडणी, एक गुरूजी आणि आपली आत्यंतिक भक्ती, एवढेच काय ते आवश्यक असते ����
ह्या विधीची माहिती:
> कधी करू शकतो - शुभ दिवस बघून कधीही सलग 7 दिवस
> तयारी - अगदी देवपूजेची तयारी असते इतकेच, एक अखंड दिवा
> वाचक - ओपंडित टीम संहिता वाचक गुरुजींची उत्तम व्यवस्था करू शकते.
> विधीचा खर्च - 20 हजार रुपयांपासून पुढे 80 हजार पर्यन्त - 7 दिवसांचा खर्च
> बाकी बंधने - ब्रह्मचर्य पालन, कांदा लसूण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य.
> वेळ - रोज 5 ते 6 तास गुरुजींचे वाचन चालते
जन्मोजन्मीचे पुण्य फळास य��ते आणि मगच भागवताचे शब्द आपल्या घरात उच्चारले जातात. भागवत पठण जिथे होते त्या घरात सकारात्मक बदल कायमचे होतात असा अनुभव आहे.
भागवत श्रवण करण्यासाठी आसपासच्या देवता, अनेक पवित्र जीव सूक्ष्म रूपाने आपल्या घरात येतात, भागवत ऐकून तृप्त होतात व आपल्यालाही आशीर्वाद देऊन ��ातात.
ही अनुभव घेण्याचीच गोष्ट आहे.
आपण एखाद्या खूप मोठ्या संकटात असू, आपल्या कुटुंबातील कोणाची तब्येत अत्यंत खराब असेल, घरी मोठी बाधा झाली असेल किंवा एखादे मोठे प्रोजेक्ट किंवा महत्त्वाची परीक्षा पुढे येत असेल तर कामना ठेऊन - म्हणजे काम्य प्रकाराने सुद्धा आपण ही संहिता वाचून घेऊ शकतो.
मुंबई, पुणे, नवी मुंबई व ठाणे इथे आम्ही संहिता वाचन व्यवस्था करू शकतो.
सम्पर्क क्रमांक - +91-9167968204
काम्य असो किंवा निष्काम, कृष्ण कृपा ही होणारच 😊
जय जय रघुवीर समर्थ ||
---
मृदुला बर्वे, ओपंडित
#शुक्रवार_चिंतन#मनाचे_श्लोक_136_ते_140
नमस्कार,
दर शुक्रवारी 5 मनाच्या श्लोकांचा संक्षिप्त अर्थ आपण पाहत आहोत.
मन, मेंदु आणि मनगट ह्या तिन्हीला बळकटी देणारा, श्री रामदास स्वामींचा "स्वरूप संप्रदाय". मनाचे श्लोक, श्रीमद् दासबोध आणि आत्माराम हे अत्यन्त महत्त्वाचे वाङ्मय.
#आपले_जुने_ठेवणे_ओळखा
#���य_विरहित_जीवन
संत आणि आपण ह्यांच्यात काय फरक आहे? तर आपण सतत भयभीत असतो. आणि संत भयातीत असतात!
बायको नवऱ्याला सांगते - गाडी सावकाश चालवा, आई मुलाला सांगते - रस्ता नीट क्रॉस कर, आजी नातवाला सांगते अबरचबर खाऊ नको रे! पावसाळ्यात साथ असते. हे झाले मृत्यूचे भय!
नोकरी कर���ार्यांना नोकरी जाईल ह्याचे भय, व्यवसाय करणार्यांना तोटा होईल ह्याचे भय, विद्यार्थ्यांना नापास होण्याचे भय, बाईला शीलरक्षणाचे भय. उठल्यापासून झोपेपर्यंत कसले तरी भय.
संत मात्र निवांत, शांत असतात. आनंदी असतात. का? कारण त्यांना परमेश्वर कृपा प्राप्त झालेली असते. उपासना, चिंतन, मनन, निदिध्यासन करून त्यांनी परमेश्वराला जाणलेले असते. त्यांचे "अज्ञान" दूर झालेले असते.
अज्ञान दूर झाले नाही तर काय होते? तर आपल्याला आत्मस्वरूपाचा यथार्थ बोध होत नाही आणि म्हणून भय वाटते - "अज्ञानात् भयं भवति |"
अज्ञान दशा काय कारणाने प्राप्त होते? आपल्या मीपणामुळे, गतजन्मीच्या पूर्वकर्मामुळे, द्वैत भावामुळे आणि सम्पूर्ण शरणागती घेता न आल्यामुळे किंवा रजोगुण व तमोगुणाच्या प्राबल्यामुळे आपण अज्ञान दशेत खितपत पडतो, एका जन्मी नाही तर जन्मोजन्मी - त्याचा परिणाम? "जुने ठेवणे मीपणे आकळेना", आत्मारा��ापासून विरह.
ह्याच्यातून क��े बाहेर पडायचे? माझ्या शरीररूपी भांड्यासाठी जो साबण योग्य आहे तो वापरून चित्तशुद्धी करायची. चांदीच्या भांडयांना गोमय राख, तांब्याच्या भांडयांना आंबट काहीतरी, स्टीलला पतंजली साबण, प्लास्टिक ला liquid soap!
म्हणजे कोणाला कर्मकांड, कोणाला उपासना, कोणाला योग तर कोणाला ज्ञानकांड अभ्यास. प्रत्येक भांडे वेगळे, प्रत्येक उपाय वेगळा.
एकदा भांडे स्वच्छ झाले की त्यात स्वादिष्ट बासुंदी बनते, ती नासत नाही.
मग कसे करायचे स्वच्छता अभियान सुरू? संतांना आदर्श ठेवोन त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आचरणात उतरवायच्या. हळूहळू चित्तशुद्ध होते व ज्ञानाचा प्रकाश बुद्धीमध्ये पडतो.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
--- मृदुला बर्वे, ओपंडित
PS: व्हिडिओचे एडिटिंग वगैरे करायला वेळ मिळणे सध्या अशक्य आहे, त्यामुळे जसे स्पर्धेत व्हिडिओ पाठवले तसेच्या तसे इथे अपलोड करत आहे.
🚨 Bengaluru mall that denied entry to farmer in dhoti to be temporarily closed.
Farmer, son were stopped at mall despite having movie tickets.
The farmer’s son recorded the conversation in which the security supervisor can be heard saying that the rules of the mall did not allow entry to people wearing a dhoti, and that he would allow the farmer if he wore pants.
#हाफ_जैन#तुम्ही_खाल्ले_का?
अरे हे काय असते? सांगते ऐका!
च��ुर्मास (किंवा मराठी भाषेत चातुर्मास) सुरू होतो आहे, आषाढी एकादशी पासून, अपेक्षेप्रमाणे पाऊसही सुरू झाला आहे, सगळीकडे ओले, चिखल, दमट हवा असा हा काळ. आणि सर्व वैदिक सनातनी आर्य लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ, उपासनेचा काळ म्हणजे चातुर्मास!
आपला देह किंवा हे जगच तीन गुणांनी बनलेले आहे - सत्त्व गुण, रजोगुण आणि तमोगुण. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे तिन्ही गुण असतात, तिन्ही गुणांचे आपापले कार्य आह��.
तिन्ही गुण असणे आवश्यक आहे. खरी गंमत आहे की कुठला गुण किती प्रमाणात आहे.
आ. मकरंदबुवा खूप छान उदाहरण देतात - आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे! महाराजांनी अधर्मी लोकांचा नाश केला तो त्यांच्यातील तमोगुणांमुळे, महाराजांनी किल्ले बांधले, धर्मशाळा बांधल्या, इतर अनेक लोकोपयोगी कामे केली ती त्यांच्यातील रजोगुणामुळे, शिवाजी महाराज सत्त्वगुणी होते त्यामुळे ते तमोगुणाला व रजोगुणाला समाज कल्याणासाठी वापरू शकले. आणि म्हणून सत्त्वगुण अतिशय महत्त्वाचा आहे.
समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात -
मुळी देह ��्रिगुणाचा | सत्वरजतमाचा | त्यामध्ये सत्वाचा |उत्तम गुण ||२-५-१ ||
सत्वगुणे भगवदभक्ती | रजोगुणे पुनरावृत्ती | तमोगुणे अधोगती |पावती प्राणी ||२-५-२ ||
जय जय रघुवीर समर्थ ||
जसा प्रत्येक data चा metadata असतो तसा ह्या गुणांचाही गुण असतो!
>> सत्त्वगुणाचा गुण काय तर सद्सद्विवेक बुद्धी, एखाद्या कामात, अभ्यासात, कलेत टिकून राहणे. नित्यनियमाने एखादी पारमार्थिक गोष्ट आयुष्यभर करणे इत्यादी
>> रजोगुणाचा गुण म्ह��जे लोभ, हे हवे, ते हवे, आधी स्वतःला, म�� कुटुंबाला, मग घराला. रजोगुण.
>> तमोगुण - साधारण तमोगुण म्हणजे आळस, निद्रा. आणि तीव्र तमोगुण म्हणजे हिंसा.
समर्थ सांगतात सत्त्वगुण उत्तम म्हणजे आपल्याकडे तो असलाच पाहिजे आणि तो वाढावा म्हणून आपण काहीतरी केलेच पाहिजे.
खूप उपाय आहेत, पण सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सात्विक पदार्थ अन्न म्हणून जेवणे. अन्नापासून मन तयार होते व मनाच्या ताब्यात सध्या आपली सर्व इंद्रिये आहेत! त्यामुळे आधी मन सात्विक केले पाहिजे. आणि म्हणूनच "हाफ जैन अन्न", कमीतकमी येत्या 4 महिन्यात तरी!
आपले कसे झाले आहे ना, जे आपले ते स्वीकारा म्हणले की आपण त्याला स्वीकारत नाही ते अमेरिकेतून सांगितले ना की "fasting reduces cancer cells", की आम्ही लागलो उपवास करायला.
आम्ही कधी बाहेरगावी असलो, परान्न खायची वेळ आली तर आम्ही हॉटेलमध्ये सांगायला सुरुवात करतो - भैया, बिना प्याज लसण का खाना बनाओगे? लगेच समोरून - जैन ��ाहीये? मग आम्ही - नही नही, हम सिर्फ प्याज लसण नही खाते, वो सात्विक फूड होता है ना! जो पंडितजी खाते है वो. तो दया येऊन आमच्याकडे बघतो - भाभी हाफ जैन बोलो ना सीधे! :D अरेच्चा! हा शब्द आहे होय :D
कांदा, लसूण हे तामसिक अन्न आहे, तामसिकता वाढवते, ते कधीच देवाच्या नैवेद्यात असू नये, आपणही खाऊ नये. ते तब्येतीला चांगले वगैरे अक्षरशः आपल्याला फसवले आहे.
बरं, दुपारच्या जेवणात आम्ही खात नाही पण रात्रीच्या जेवणात चालते हा स्वतःला आणि समाजाला फसवण्याचा आणखी एक प्रकार!
आम्ही "हाफ जैन" झालो बाबा! आणि तुम्ही? 😊😊
जय जय रघुवीर समर्थ!
--- मृदुला बर्वे, ओपंडित
@Hello_oPandit
https://t.co/E8rIUYhW6L