अवघ्या रायगडाची शक्ती ज्या ठिकाणी एकवटलेली आहे त्या ठिकाणी नतमस्तक होऊन बंदिस्त डोळयांनी २ मिनिटं जरी व्यतीत केली तरी सहज आपण शेकडो वर्षं ओलांडुन आपण त्या काळात जातो.!
विद्यानंद बापट यांच्या मतांशी सहमत असणे बंधनकारक नाही; पण त्यांच्या भाषेच्या वैभवापुढे थांबून ऐकावेसे मात्र नक्की वाटते. शब्दांना संस्कारांची किनार तर्काला अभ्यासाची धार आणि मांडणीला पुणेरी पेठसंस्कृतीचे वैचारिक अधिष्ठान लाभले की संवाद किती उंची गाठू शकतो याचे ते उत्तम उदाहरण आहे
डीजे बंदीच्या मुद्द्यावर विद्यानंद बापट आणि मेधा कुलकर्णी यांची मुलाखत नक्की ऐका. त्यांच्या मतांशी सहमत असणे आवश्यक नाही, पण भाषेवरील प्रभुत्व, विचारांची ��ांडणी आणि मुद्देसूद संवाद कसा असावा याचा उत्कृष्ट नमुना या मुलाखतीत दिसतो.
https://t.co/bMfbP20JFc
एक काळ असा होता की आयटी क्षेत्र म्हणजे यशाची हमी मानली जात होती.दोन-तीन वर्षांचा अनुभव असला तरी लाखो रुपयांचे पगार, आकर्षक जीवनशैली आणि झगमगाट यामुळे तरुणाईचा ओढा एका दिशेने वळला. आवड, क्षमता,कौशल्य आणि समाजाच्या विविध गरजा बाजूला पडल्या;पगाराच्या आकड्यांनीच करिअरची दिशा ठरवली /१
पैसा आ��श्यक आहे, नोकरी आवश्यक आहे; पण शिक्षणाचे अंतिम ध्येय फक्त तेवढेच नसते. शिक्षण माणूस घडवते, दृष्टी देते आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची ताकद देते. म्हणूनच करिअर निवडताना गर्दीच्या दिशेने धावण्यापेक्षा स्वतःची क्षमता, आवड आणि समाजाची गरज ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे. /५
आई-वडिलांच्या अपेक्षा, स्वतःची स्वप्ने आणि तारुण्याची अनेक वर्षे पणाला लावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा जर बाजार मांडला जात असेल, तर त्यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी ��ोणती?
कष्ट करणाऱ्यांच्या हातात यशाऐवजी अन्याय येत असेल तर विश्वासाची ही पडझड अत्यंत वेदनादायी आणि चिंताजनक आहे
तर तो कष्ट, स्वाभिमान आणि माणुसकीच्या असंख्य कथांनी घडलेला आहे....बीडविषयी एखाद्या अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तीच्या तोंडून आदराचे शब्द ऐकायला मिळाले की मनाला वेग��ीच ऊब मिळते.
#बीडकर❤️
काही मथळे आणि काही घटना एखाद्या जिल्ह्याची ओळख ठरवू शकत नाहीत. बीडकडे पाहायचं असेल तर इथल्या मातीचा संघर्ष, माणसांची जिद्द आणि प्रतिकूलतेशी दोन हात करत उभं राहिलेलं जीवन पाहावं लागतं.ज्यांनी बीड जवळ���न अनुभवलं आहे, त्यांना माहिती आहे की हा जिल्हा केवळ बातम्यांमध्ये दिसतो तसा नाही.
स्वातंत्र्य हे शहीदांनी दिलेलं देणं आहे; पण त्या देणगीचं मोल राखत सुजाण, सुसंस्कृत आणि मूल्यनिष्ठ भारत घडवणं हे प्रत्येक नागरिकाच��� कर्तव्य आहे. कारण राष्ट्रं बलिदानाने उभी राहतात, पण सजग नागरिकांच्या चारित्र्याने आणि कर्तृत्वाने चिरंतन महान बनतात.
#स्वातंत्र्य_दिन चिरायू होवो.!
@INCMaharashtra ज्या पक्षाच्या सावलीत राजकीय उंची मिळाली, ���्या विचारधारेच्या खांद्यावर बसून सत्तेची शिखरे गाठली त्याच घराच्या भिंतींवर आज दगड फेकण्यात काहींना कमीपणा वाटत नाही. पक्षांतर हा राजकारणाचा भाग असू शकतो; पण कृतज्ञतेचं पक्षांतर झालं की चारित्र्याची दिवाळखोरी सुरू झालेली असते!
#राजकारण
मी मागील दोन दिवसापासून सतत सीईटी सेलच्या हेल्पलाइन नंबर ला कॉल करत आहे पण माझा संपर्क होऊ शकत नाही.नऊ ते सहा या वेळेत मी कॉल करतोय पण तुमचा चौदावा नंबर आहे क्यू मध्ये अशा पद्धतीने फक्त सांगत राहत आणि शेवटी लिमिट exceed म्हटलं जातं व कॉल कट होतो. हे ठीक नाही
@cetcell