महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या उपसमिती बैठकीत, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त देशभर दोन वर्षे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्तरावर राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
#महात्मा_फुले#द्��िशताब्दी_जयंती #जयमहाराष्ट्र #महाराष्ट्र
मायक्रो फायनान्स कर्जवसुलीला पुढील आठ महिने स्थगिती; शेतकऱ्यांना दिलासा!
राज्य शासनाने पुढील आठ महिने कोणत्याही मायक्रो फायनान्स कंपनीने कर्जवसुली करू नये, असे निर्देश दिले आहेत. प्रमुख मायक्रो फायनान्स कंपन्यांनीही कर्जवसुली स्थगित करण्यास सहमती दर्शवली आहे.
स्वकर्तृत्व, स्वावलंबन आणि समाजसेवेचा आदर्श म्हणजे #महात्माज्योतिरावफुले ! ते पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक होते. बांधकाम,अन्य व्यापारी क्षेत्रांत कार्यरत या कंपनीला पुणे-नगर रस्त्यावरील येरवड्या��ा(बंडगार्डन)पूल बांधण्याचे उपकंत्राट मिळाले होते.
महात्मा फुले यांचे विचार आ��ही शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक!शेतकऱ्यां��्या आर्थिक स्थितीचे वास्तव मांडणारा ‘शेतकऱ्याचा असूड’ ग्रंथ आजही महत्त्वपूर्ण आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी या ग्रंथातील विचारांचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन आवश्यक असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले
दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिलासा; सामूहिक विवाह सोहळ्यांतून १४ शासकीय योजनांचा लाभ!
दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने सामूहिक विवाह सोहळ्यांची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
#सामूहिकवि���ाह
दुष्काळी परिस्थितीत गरजू रुग्णांना वेळेत उपचार आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने तालुका व जिल्हास्तरावर आरोग्य समित्या, मुख्यमंत्री सहा��ता निधी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे आधार
दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध !
दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ, पाणीटंचा�� व चारा उपलब्धतेचा आढावा घेतला.