राम कृष्ण हरी!
पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय!
'श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल' आराखड्यास ₹३,९९३.३० कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या विकास आराखड्यामुळे वारकऱ्यांची वारी अधिक सुखकर, सुरक्षित आणि सुविधायुक्त होईल. तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळून पंढरपूर जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल.
#Pandharpur #Warkari #BJP4Maharashtra
#DevendraFadnavis #AshadhiEkadashi
( टीप : वरील व्हिडिओ हा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आला असून, तो केवळ प्रतिनिधिक स्वरूपासाठी आहे. )
ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमारजी गोरे यांची स्नेहभेट !
📍 प्रचितगड निवासस्थान, मुंबई
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.श्री. जयकुमारजी गोरे यांची मुंबईतील प्रचितगड या त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्याशी आपल्या श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासात्मक विषयांवर चर्चा झाली.
#Mumbai #मुंबई #पावसाळी #अधिवेशन #BJP #भाजपा #MonsoonSession2026
@Jaykumar_Gore
श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय भाजपा आमदार श्री.विक्रम पाचपुते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
#VikramPachpute@VikramPachpute_
📍 मंत्रालय | १ जुलै २०२६
मंत्रालय, मुंबई येथे मानखुर्द-शिवाजीनगर विभागातील महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर मुंबईतील गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत 'स्वामित्व' योजनेच्या अंमलबजावणीचा स्वतंत्र आढावा घेण्यात आला. अंतिम टप्प्यात असलेल्या गावांसाठी सनद शुल्क माफ करण्याच्या प्रस्तावासह योजनेच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
'स्वामित्व' योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिकाधिक दिलासा मिळावा, प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा व्हावा आणि महसूल विभागाशी संबंधित कामांना अधिक गती मिळावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
#Maharashtra #Mumbai #Revenue #RevenueDepartment #ChandrashekharBawankule
📍प्रचितगड, मुंबई | 1 जुलै 2026
पेसा मोबिलायझर संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज आमदार मा. विनोद निकोले यांच्या समवेत आलेल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.
त्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करून तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके यांच्याशी समन्वय साधून १० जुलैनंतर प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल.
या बैठकीत पेसा मोबिलायझर संघर्ष समितीच्या सर्व प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करून योग्य व सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सर्व प्रतिनिधींनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन आवश्यक ती कार्यवाही करेल.
यावेळी डॉक्टर अजित नवले, कॉ.परिमय ढवळे, कॉ. विजय गाभणे, कॉ. किरण गहला, डॉक्टर अमोल वाघमारे, कॉ. अमोल मारकवार, कॉ. संगीता साळवे , कॉ. सुदाम ठाकरे, रविता पाडवी, झुलेका घोडे, छाया जाधव, ज्योत्स्ना उईके यांच्यासह संघर्ष समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
#PESA #TribalDevelopment #RuralDevelopment #Maharashtra #GoodGovernance
मंत्रालय, मुंबई येथे मानखुर्द-शिवाजीनगर विभागातील महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
या बैठकीत ग्रामविकास मंत्री मा. @Jaykumar_Gore जी, मा. आ. @abuasimazmi जी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@mybmc
#Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
मंत्रालय, मुंबई येथे गावठाण जमाबंदी प्रकल्प 'स्वामित्व' योजनेअंतर्गत अंतिम होणाऱ्या गावांसाठी सनद शुल्क माफ करण्याबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली.
योजनेची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना अधिकाधिक दिलासा मिळावा तसेच प्रलंबित बाबींचा वेगाने निपटारा व्हावा, या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.
या बैठकीस ग्रामविकास मंत्री @Jaykumar_Gore जी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@IGR_Maharashtra@mybmc
#Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
काही अडचणींमुळे संगणक परिचालकांचे मानधन वितरित होण्यास विलंब झाला होता. मात्र, आता ही प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित करण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान संगणक परिचालकांचे मानधन नियमितपणे वितरित करण्यात येईल, याची मी ग्वाही देतो.
#DigitalGovernance #eGovernance #PublicService #CitizenServices #GoodGovernance
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती पदी भाजपा-महायुतीचे आ. सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
या नव्या जबाबदारीतून वाटचाल करताना आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा महाराष्ट्राला नक्कीच लाभ होईल. आपल्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!
@AhirsachinAhir
#SachinAhir #MaharashtraVidhanParishad #BJPMahayuti
प्रत्येक सेवा पुरवल्यानंतर संगणक परिचालकांना त्या सेवेचा मोबदला प्राप्त होतो. त्यामुळे 'ग्रामउद्योजक' म्हणून कार्यरत असताना त्यांनी नागरिकांना आवश्यक त्या सर्व सेवा नियमितपणे व तत्परतेने उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. तसेच, प्रत्येक सेवा प्रदान केल्यानंतर त्यांना निश्चित मानधनाव्यतिरिक्त अतिरिक्त मोबदलाही प्राप्त होतो.
#GraminDigitalServices #VillageEntrepreneur #CitizenCentric #DigitalMaharashtra #PublicServiceDelivery
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मा. आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांच्या कार्यकाळाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.
या वर्षभरातील आपल्या प्रभावी नेतृत्वामुळे पक्ष संघटनेला नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली. या वर्षपूर्तीनिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@RaviDadaChavan
#भाजपा_महाराष्ट्र #RavindraChavan #BJPMaharashtra #MaharashtraBJP #Leadership
‘कृषिदिन’ हा आपल्या बळीराजाच्या अथक परिश्रमांचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे.शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपल्या घामाने मातीतून सोनं पिकवणारा बळीराजा हा राज्याच्या समृद्धीचा खरा शिल्पकार आहे. निसर्गाच्या अनिश्चिततेशी सामना करत, ऊन-पाऊस-वारा यांची पर्वा न करता दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच अन्नसुरक्षा आणि विकासाचा पाया अधिक भक्कम होत आहे.
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषिदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#MaharshtraKrushidin #बळीराजा
राज्यसभा खासदार श्री. रामराव वडकुतेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
#RamraoWadkuteji
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शेती, ग्रामीण विकास आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे ठरले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला गेला.
#VasantraoNaik #GreenRevolution
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात श्रीक्षेत्र पंढरपूरचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. 'श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या’च्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट घडवून आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे.
राज्यस्तरीय शिखर समितीच्या मान्यतेनंतर दिनांक 18 जून 2026 रोजी या प्रकल्पासाठी ₹3993.90 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या आराखड्यात वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा, स्थानिकांचे हितसंरक्षण, पुनर्वसन आणि रोजगारनिर्मितीला प्राधान्य दिले जाणार आहे.
या विकास आराखड्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि सुविधायुक्त होणार आहे. धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्था, व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देणारा हा आराखडा राज्याच्या विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
#PandharpurDevelopment #VitthalRukminiMandir #DevendraFadnavis
#ReligiousTourism
मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय भाजपा आमदार श्री.केवलरामजी काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
#KewalramjiKale
औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय भाजपा आमदार श्री.अभिमन्यू पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
#AbhimanyuPawar@AbhiPawarBJP
देशाच्या आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावत, प्रामाणिकपणा आणि कौशल्याच्या जोरावर अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या सर्व सनदी लेखापालांना चार्टर्ड अकाउंटंट दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#CharteredAccountantDay
आरोग्यसेवा ही मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. आपल्या ज्ञान, कौशल्य आणि निस्वार्थ सेवाभावाच्या बळावर समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
रुग्णांच्या आरोग्याचे रक्षण करताना प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाणाऱ्या डॉक्टरांचे समाजाप्रती असलेले योगदान अमूल्य आहे. निरोगी, सक्षम आणि विकसित भारताच्या उभारणीत त्यांची सेवा आणि समर्पण अनन्यसाधारण आहे.
#NationalDoctorsDay #DoctorsDay #SaluteToDoctors #HealthcareHeroes