महान स्वतंत्रता सेनानी, युवांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शहीद भगतसिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! भगतसिंग यांचे क्रांतिकारी विचार देशभरातील तरुणांसाठी आजही स्फूर्तीदायी आहेत.
#BhagatSingh#भगतसिंग#BhagatsinghJayanti
ॲड. कैलास हावळे
अध्यक्ष - कळवा ब्लॉक
समता व शांततेचा मार्ग प्रस्थापित करणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
समता, करुणा आणि शांततेचा मार्ग दाखवत मानवतेला नवी दिशा देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांतून जगाला शांती, सहिष्णुता आणि संयमाचा संदेश मिळाला. त्यांच्या शिकवणी आजही समाजाला संतुलन आणि सहअस्तित्वाचा मार्ग दाखवतात.
कामगारांचा कैवारी..!
१ मे जागतिक कामगार दिन…!
20 जुलै 1942 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार मंत्री म्हणून सूत्रे हातात घेतली.
१९४५ साली बाबासाहेबांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला ज्याचा आजही सर्व नोकरदारांना फायदा मिळतो. कामगारांना जो महागाई भत्ता त्याकाळी मिळायचा तो खूप अपुरा होता व दरवर्षी वाढणाऱ्या महागाईला तोंड देताना कामगारांना खूप त्रास व्हायचा. म्हणूनच बाबासाहेबांनी निर्णय घेतला कि महागाईच्या निर्देशांकाच्या आधारावर महागाई भत्ता देण्यात यावा. आज सर्व कामगारांना मिळणारा महागाई भत्ता हा बाबासाहेबांनी १९४५ साली घेतलेल्या निर्णयामुळे मिळतो हे लक्षात घेतले पाहिजे. याचाच अर्थ, मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी घेतलेले निर्णय हे कुठल्याही विशिष्ट जातीला समोर न ठेवता, समाजातील सर्व जाती धर्माच्या कामगारांच्या हिताचे असतील असे निर्णय घेतले.
नोकरदारांसाठी जे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले ते आतापर्यंत कोणीही केलेले नाही.
महागाई भत्ता, महिलांसाठी प्रसूती रजा, भरपगारी सुट्ट��ची तरतूद, पेन्शन योजना, वेतन आयोग, कामगारांचे 12 तासावरून 8 तास, दिवाळी बोनस, ही सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच पुण्याई आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कल्याणाचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा केला असे म्हणता येईल कारण कामगारांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देऊन अन्यायाला वाचा फोडली आणि आजच्या कामगाराला खरा न्याय मिळवून दिला..!
भारतात नोकरदारांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित करणारा कोणी असे�� तर ते फक्त आणि फक्त
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर"..!
कामगार दिनाच्या सर्व कामगार बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा.
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!
मा. अजित दादांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या अस्थीकलशांच दर्शन आज ठाण्यातील पक्ष कार्यालयात घेतले.त्यावेळी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळीं ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान सहित पक्षाचे नगरसेवक,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच अजित पवार गटाचे नजीब मुल्ला,आनंद परांजपे यांची भेट घेऊन या दुःखद समयी त्यांच्याशी देखील संवाद साधला.
असे म्हणतात की, कुणाच्याच पाठीला डोळे नसतात. पण, मी त्याबाबतीत सुदैवी आहे; कारण, माझ्या पाठीला डोळे आहेत अन् ते डोळे म्हणजे उदय मोरे !
गेली चार दशके तो माझ्याकडे आहे. मी त्याला माझी 'असेट' असेच म्हणतो. निष्ठा आणि समर्पण याचे अचूक मिश्रण असलेल्या उदयला आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो, हीच प्रार्थना !
उदय, वाढदिवसाच्या आभाळभ�� शुभेच्छा !!
भारतीय वायु क्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी निष्ठेने आणि प्राणपणाने सांभाळणाऱ्या, असामान्य शौर्य व हवाई सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या भारतीय वायुसेनेच्या जवानांनी सदैव देशाचे अभिमानस्थान निर्माण केले आहे. शूर जवानांना वायुसेना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
@NCPspeaks
जाहीर निषेध..!
मनुवादी विचारांचा वकील राकेश किशोर याने आज 'सनातन का अपमान नही सहेंगे' म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई साहेब यांच्यावर बुट भिरकावल्याचा अत्यंत नीच प्रकार केला आहे. या निंदनीय प्रकाराचा जा���ीर निषेध.
@Awhadspeaks @NCPspeaks
जाहीर निषेध..!
मनुवादी विचारांचा वकील राकेश किशोर याने आज 'सनातन का अपमान नही सहेंगे' म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई साहेब यांच्यावर ���ुट भिरकावल्याचा अत्यंत नीच प्रकार केला आहे. या निंदनीय प्रकाराचा जाहीर निषेध.
@Awhadspeaks @NCPspeaks