पंडित नेहरू हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान. प्रत्येक भारतीयांच्या मनात ‘चाचा’ म्हणून घर करून बसलेले व्यक्तिमत्त्व होते. मुलांवरील प्रेम, शिक्षणाची ओढ, आणि प्रगतीची दिशा दाखवणारे त्यांचे विचार आजही नव्या पिढीच्या वाटचालीस दिशा देतात.
.
.
.
#PanditJawaharlalNehru#Punyatithi
रमाईंच्या आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग असूनही, त्यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात अडथळा न आणता, त्यांना संपूर्ण साथ दिली. त्यांच्या या निःशब्द त्यागामुळेच बाबासाहेबांना त्यांच्या कार्यात यश मिळाले.
रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
"विचारांनी निर्मळ, भावना निर्मळ आणि आचरण निर्मळ असले कीच खरी मुक्ती मिळते" — हा संदेश देणाऱ्या मुक्ताबाई म्हणजे संतपरंपरेतील तेजस्वी मोती. त्यांनी केवळ शब्दांनी नव्हे, तर आचरणातूनही भक्तीचं खरं रूप दाखवलं.
संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
#santmuktabai
सामाजिक सुधारणेचा पहिला बुलंद आवाज म्हणजे राजा राम मोहन राय. त्यांनी सतीप्रथेचा निषेध केला, महिलांना शिक्षणाचं हक्क दिला आणि धर्म व विज्ञान यामधील समतोल विचार समाजापुढे मांडला. त्यांच्या विचारांची आजही समाजाला नितांत गरज आहे.
राजा राम मोहन राय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
राजीव गांधी यांच्या काळात देशाने फक्त स्वप्नं पाहिली नाहीत, तर
स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्याचा मार्गही शोधला.
संगणक, विज्ञान, शिक्षण, आणि स्थानिक स्वराज्य यांना दिलेलं महत्त्व आजच्या भारताला जगात मानाचं स्थान देतं.
दहशतवादाच्या कोणत्याही मुखवट्याला आपण मूक संमती देणार नाही.
या दिवसाचं स्मरण करताना, आपल्या मनात फक्त एक निर्धार हवा,शांततेसाठी झगडणं, एकतेसाठी उभं राहणं आणि
दहशतवादी मानसिकतेचा स्पष्ट निषेध करणं.
दहशतवाद्यांना धर्म, जात, देश नसतो… पण त्यांचं उत्तर मात्र आपली एकता आहे!
अंतराळ, काळ, गुरुत्वाकर्षण यांसारख्या अवघड विषयांवर अत्यंत सहजपणे लिहून विज्ञानाला लोकाभिमुख करणारे डॉ. जयंत नारळीकर हे एका पिढीसाठी प्रेरणास्थान होते. ‘मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे ते कदाचित एकमेव शास्त्रज्ञ! अशा या बहुआयामी विचारवंतास मन:पूर्वक श्रद्धांजली.
बिपिन चंद्र पाल यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला सतत प्रश्न विचारले आणि समाजात वैचारिक क्रांती घडवली.
ते बोलायचे – "स्वातंत्र्य हे फक्त राजकीय नसावं, तर मानसिक, सामाजिक आणि आर्थिकही असावं."
बिपिन चंद्र पाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#BipinChandraPal
जग कितीही बदललं तरी काही गोष्टी तशाच राहतात – आईची माया, वडिलांचा आधार, भावंडांची चेष्टा-मस्करी व तेवढीच खंबीर साथ, आणि घरातली ऊब!
आजच्या दिवशी, त्या प्रत्येकासाठी एक क्षण थांबून आठवण काढा –
जागतिक कुटुंब दिनानिमित्त शुभेच्छा!
#InternationalFamilyDay
सामान्य घरातून आलेले आणि आपल्या प्रामाणिक मेहनतीने सर्वोच्च न्यायव्यवस्थेत सर्वोच्च स्थान गाठणारे न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड ही केवळ त्यांची वैयक्तिक यशोगाथा नाही, तर हजारो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल.
#ChiefJustice#SupremeCourt#BhushanGawai
आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर हजारो घरांमध्ये आनंद, गर्व आणि समाधानाची लहर उसळली आहे.
महाराष्ट्र राज्य दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागलेला असून, हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं, पालकांच्या पाठबळाचं आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचं फलित आहे.
.
.
.
#MaharashtraBoard#SSC
भारतीय लष्कराने अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूक योजना आणि देशभक्तीच्या प्रेरणेतून केलेली ही कारवाई म्हणजे जगासमोर भारताच्या शक्तीची जाणीव करून देणं! दहशतवादाविरुद्धच्या या संघर्षात लष्कराच्या या भूमिकेचं मन: पूर्वक अभिनंदन !
#OperationSindoor#PahalgamTerrorAttack#IndianArmy
तरुण पिढीला अॅथलेटिक्सकडे वळवणे म्हणजे त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे नेण्याचा मार्ग दाखवणे. खेळांमुळे आत्मविश्वास वाढतो, संघभावना विकसित होते, आणि आरोग्य सुधारते. या दिवशी, तरुणांनी अॅथलेटिक्सचा अंगीकार करून उज्वल भविष्याची पायाभरणी करावी.
.
.
.
#WorldAthleticsDay