'फ्लेक्समुक्त मुंबई' अभियानासाठी महापौरांचा कृतीतून आदर्श; स्वतःच्या नगरसेवक प्रभागातील अनधिकृत बॅनर हटवून मोहिमेची धडक सुरुवात
🔷केवळ घोषणा किंवा सूचना न देता प्रत्यक्ष कृतीतून आदर्श ठेवावा, याचे उदाहरण मुंबईच्या प्रथम नागरिक, महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. मुंबईतील अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी महापौरांनी "शा���ू बाप्पा दहा दिवस – फ्लेक्समुक्त मुंबई तीनशे पासष्ट दिवस" ही विशेष मोहीम नुकतीच घोषित केली. या मोहिमेत सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
🔷या अनुषंगाने, सदर मोहिमेची सुरुवात महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १४ ऑक्टोबर २०२६) सकाळी स्वतःच्याच नगरसेवक प्रभागातून थेट रस्त्यावर उतरून केली.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील घाटकोपर (पूर्व) येथील गजबजलेल्या झुलेलाल चौक (विक्रांत सर्कल) आणि गारोडिया नगर परिसरात लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स आणि पोस्टर्स महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वतः काढले. यावेळी परिसरातील सर्व अनधि���ृत फलक तत्काळ हटविण्यात आले. तसेच, नव्याने अनधिकृत फलक लावले जाणार नाहीत, यासाठी देखरेख करण्याची सूचनाही महापौरांनी केली.
🔷या मोहिमेदरम्यान अनुज्ञापन विभाग, परिरक्षण विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग तसेच संबंधित खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
🔷आपल्या कृतीतून महापौरांनी मुंबईतील लोकप्रतिनिधींसमोर नवा वस्तुपाठ ठेवला आहे. मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी लोकप्रतिनिध���ं��ी स्वतः पुढे येऊन नेतृत्व केले, तर प्रशासनाचे काम आणखी सुलभ होते, याचा हा प्रत्यय ठरला. महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांनाही मोठी गती मिळाली आहे.
🔷मुंबईला प्लास्टिक, फ्लेक्स तसेच अनधिकृत फलकांच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी महापौर श्रीमती रितू तावड��� यांनी महानगरपालिका प्रशासनाला पत्र लिहून 'झिरो टॉलरन्स' धोरण राबविण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. या मोहिमेला व्यापक स्वरूप मिळावे आणि राजकीय भेदाभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे, यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना व नेत्यांना पत्र पाठवित आहेत. अधिकृत फलकांसाठी क्यूआर कोड प्रणाली अनिवार्य करणे, विनापरवाना फलक छापणाऱ्या मुद्रकांना व एजन्सींना काळ्या यादीत टाकणे ��णि नागरिकांच्या तक्रारींचे कमाल ७२ तासांत निवारण करणे, अशा सक्त उपाययोजनांची आखणी या धोरणात करण्यात येत आहे.
🔷या मोहिमेदरम्यान सं��ेश देताना महापौर श्रीमती रितू राजेश तावडे म्हणाल्या की, ज्याप्रमाणे आपण श्रीगणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य देऊन पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठेवला, त्याचप्रमाणे वर्षभर मुंबईला प्लास्टिक आणि फ्लेक्सच्या कचऱ्यापासून मुक्त ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे व लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. मुंबईचे देखणेपण आणि शिस्त राखण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, संस्था आणि नागरिक यांनी आपापल्या परिसरात अशाच प्रकारे पुढाकार घेऊन या मोहिमेचे अनुकरण करावे, असे आवाहन महापौर श्रीमती तावडे यांनी केले आहे.
🔷स्वतःच्या नगरसेवक प्रभागातून सुरुवात करत महापौरांनी दाखवलेल्या या पर्यावरणपूरक भूमिकेचे मुंबईकरांकडून स्वागत होत आहे.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
#नाशिक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी, गोहिरेवाडी येथील विद्यार्थ्यांनी चक्क पाण्याच��या बाटलीपासून माईक तयार करून गावातील रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न ‘Gen Alpha’ स्वतःच मांडत आहे...जे प्रश्न पत्रकारांनी मांडले पाहिजेत तेच आता ‘Gen Alpha’ सर्वासमोर आणत आहेत.#media#youth
पैशातून सुविधा उभ्या करायच्या आणि नंतर त्याच सुविधा खासगी करायच्या. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या क्रीडा सुविधा सामान्य नागरिक, विद्यार्��ी आणि स्थानिक खेळाडूंसाठीच उपलब्ध राहिल्या पाहिजेत. सार्वजनिक सुविधा खासगी करण्याची ही प्रवृत्ती थांबणे गरजेचे आहे.
#youthsport
सध्या ठाण्यात जिमखाना, क्रीडासंकुल उभारण्याचे काम जोरात सुरू आहे.असा एक तरी जिमखाना किंवा क्रीडासंकुलाचे नाव सांगा, जिथे सामान्य मुलांना प्रत्यक्षात सहज प्रवेश मिळतो आणि त्यांना योग्य सुविधा मिळतात?
ठाण्यात सध्या एकच पद्धत सुरू असल्याचे दिसते. पहिले सामान्य जनतेसाठी सरकारी
पुढील 3 तासात धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यात अति मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. मंत्रालय, मुंबई