कर्ज, किडनी अन् काळीज...
कर्ज हा आकडा नसतो, तो शेतकऱ्यांसाठी गुलामीचा साखळदंड ठरतो आहे. शेतकऱ्याला किडनी विकण्याचा सल्ला दिला जातो आणि तो मान्य करतो इथेच आपण या देशाचे नागरिक म्हणून ‘आपण कृषिप्रधान देशात राहतो’, हे मिरवण्याची लाज वाटायला लावणारे आहे...
@CMOMaharashtra
आज आपण माणसाच्या खाण्याच्या सवयीवरून त्याच्यात भेदभाव करायचा प्रयत्न करतोय. प्राणीहत्येचे पाप टाळण्यासाठी जर आपण मांसाहाराचा विरोध करत असू, तर मांसाहार करणाऱ्याला मारून टाकणे कुठल्या पाप-पुण्याच्या चौकटीत बसते, याचा विचार करायला हवा. #foodhabits#hindu
वानरांची एक जात आहे ‘स्क्विरल’ नावाची. हे वानर म्हणजे रानटीपणाचे उत्तम उदाहरण. हे ‘स्क्विरल’ पिसाटतात आणि त्यांच्या हाताला येईल त्यावर ते आपली वासना ��ागवतात. आपल्ययाकडेही असे नर आहेत. असे गतिशून्य, संवेदनाहीन मदनमस्त देह मोडीत काढायला हवेत... https://t.co/dZgHxjid2b #Badlapur
माकडे एकमेकांची पाठ खाजवत बसतात. हा केवळ त्यांचा सोपस्कार नसतो, तर त्यातून त्यांना एकमेकांशी मैत्री करायची असते. आज आपण देशानुसार, रंगानुसार, जातींनुसार विखुरले गेलो आहोत. आपल्याला आता एकमेकांची पाठ खाजवण्याची गरज आहे. निखळ संवादाची गरज आहे. म्हणूनच चला, जरा पाठ खाजवूयात...
स्वतःला शोधण्याच्या प्रवासाला निघालेल्या माणूस नावाच्या प्राण्याला धड आहे, हात आहेत, पाय आहेत. गर्वाने फुलवता येईल अशी छाती आणि तोरा मिरवण्यासाठी लागणाऱ्या पीळदार मिशाही आहेत. कान, नाक, डोळेही आहेत; मात्र स्वत्वाचा शोध घेण्यासाठी लागणारी दृष्टी नाही. https://t.co/P5z5yDGegK
Sharing my interview with @SakalMediaNews in which I speak about our development track record and aspects relating to our vision for Maharashtra in the third term. https://t.co/8hvpCujpfg
आज संध्याकाळी @RahulGadpale सरांच्या “अवतरणार्थ” पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईमधे होतोय.
वेळ संध्याकाळी- ५.३० वाजता , रंगस्व��� सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉंईंट.
नक्की या!
चिकित्सा आणि विवेक जागृत असलेल्या प्रत्येकाने वाचावे असे एक नवे पुस्तक आपल्या भेटीला लवकरच येतेय.
'अवतरणार्थ'
@RahulGadpale सर यांचे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
सर्वानी नक्की वाचा.
खाली दिलेल्या लिंक वरून आपली प्रत बुक करू शकता.
https://t.co/TKtXTdYstk
#LetsReadIndia📚📚📚
भिडे नेहमी विखारी टीकेचे फुत्कार टाकतो. समाजात विष पसरवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या बोलण्यातून वाद-प्रतिवाद व्हावेत, भांडणे लागावीत, लोकांनी एकमेकांची डोकी फोडावीत हा एकच हेतू घेऊन हे भिडे काम करतात. का आहे ‘मनोहर’ तरीही? | https://t.co/5QTjHh7UXw