मेट्रोसाठी झाड कापू नका म्हणून विरोध करणाऱ्यांना विकास विरोधी म्हणतात!
पण भाजप आमदाराने मेट्रोला विरोध केला की त्याला घसघशीत २४ कोटी मिळतात!
लोक म्हणून भाजप मध्ये जातात झटपट पटापट पैसे!
#पैसा#विरोधाचेबक्षीस
सकाळी सकाळी टॅक्सी मधून उतरताना ड्रायव्हर दादा
Have a nice day म्हणाले..
आश्चर्याचा सुखद धक्का..
अनोळखी लोकांना असे सौजन्य परदेशात दाखवतात! आपल्याकडे जर रिक्षावाले, टॅक्सीवाले १० टक्के जरी नीट वागले तर प्रवास करतानाचा ताण अर्धा कमी होईल.. #टॅक्सीस्टोरी
व्यक्त होण्यासाठी,आपली मतं मांडण्यासाठी निवडक माध्यम आहेत आणि ट्विटर त्यातले महत्वाचे माध्यम आहे..काहीही झालं तर सगळ्यात आधी ट्विट करतो..पण गेले सात ते आठ दिवस खूप मनस्ताप झाला..
आता अकाऊंट ताब्यात आले आहे.. सगळ सुरळीत होईल इतकी अपेक्षा !
Attention @Support
An Indian account, @liberal_india1, has been compromised and taken over by hackers.
All account details have been altered, preventing the original owner from accessing the account.
Please help for the recovery process and restore the account.
सेनेने राजोल पाटीलवर विश्वास ठेवू नये. तिने आपल्या बापाला सोडलंय ही थाप आहे. तिला हाकलून द्या. नगरसेवकीचं दुकान बंद पडल्याशिवाय संजय दिनाचं डोकं ठिकाणावर येणार नाही.
अधिवेशनाची तारीख ठरली आहे मार्च महिन्यात आणि दोन दिवसापूर्वी पास साठी नियमावली काढली..आज एका दिवसात हजारो डिजिटल पासासाठी किती मारामारी होणार याचा फक्त अंदाज बांधा!
चूक केली कोणी.. शिक्षा भोगतात कोण? #राजकारण
गेल्या अधिवेशनात पडळकर कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांनी मारामारी केली...नितीन देशमुख भाजपमध्ये पण गेला..पण आता अधिवेशन आले आहे आणि सगळे त्रस्त आहेत..कारण पास पासून प्रवेशाची प्रक्रिया इतकी किचकट केली आहे..प्रवेश पास, गाडीचापास पासून सगळ्यासाठी पत्रावर सही हवे..त्या शिवाय एक पास मिळत नाही! मारामारी केली तो भाजपत जाऊन आनंदात आहे पण संपूर्ण विधिमंडळ त्यांच्या मारामारीची शिक्षा भोगत आहे! ३० वर्ष विधिमंडळात काम करणारे कर्मचारी,अधिकारी वैतागले आहेत..
संपूर्ण विधिमंडळाने आता भाजप मध्ये प्रवेश केला पाहिजे..तरच गोष्टी नीट होतील वाटत!
प्रिय पाऊस
तुझ्यावर खूप जीव आहे....गेले काहीवर्ष तू खूप पडला म्हणूक लोकांनी शिव्या दिल्या असतील पण तरी सगळ्यात जास्त वाट तुझीच पाहतात,सगळ्यात जास्त गरज पण तुझी आहे..
आम्ही झाड कापली, निसर्गाचा समतोल बिघडवला चूक आहे आमची...आता चूक पोटात घे..आणि लवकर ये...
जून महिना म्हणजे तुझ्याबरोबर नवीन सुरुवात.. सगळेजण तुझी वाट पाहत आहेत! #पाऊस