Official account of Ward-N of Municipal Corporation of Greater Mumbai. For emergency Dial 1916 or ward control room number 022-25013000. App- MCGM 24X7
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बृहन्मुंबई क्षेत्रातील स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग, घाटकोपर (पश्चिम) येथील संत मुक्ताबाई महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात आज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.🧹✨
#CleanMumbai#CleanlinessDrive#स्वच्छमुंबई
@kiranlbhatia108@mybmc@ParagShahBJP@TawdeRitu@CMOMaharashtra@chheda_pravin We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/IO5S2JXIzi
Your MARG registration number : NX_202600141429
@Abbaskh33841143 We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/IO5S2JXIzi
Your MARG registration number : NX_202600141478
अजूनही वेळ गेलेली नाही! 🗳️✨
आजच मतदार नोंदणी करा!
मतदार यादीत ज्यांचे नाव अद्याप समाविष्ट झालेले नाही, त्यांच्यासाठी आपल्याच मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
दिनांक १० आणि ११ ऑक्टोबर २०२६
✅ १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना नोंदणीची संधी
✅ मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची पडताळणी
✅ आवश्यक दुरुस्ती/बदलासाठी अर्ज
✅ नोटीस प्राप्त झालेल्या व्यक्तींना कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
📌 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १२ ऑक्टोबर २०२६
🌐 ऑनलाइन: https://t.co/01c9fZ1xRI | ECINET मोबाइल ॲप
📞 मतदार मदत क्रमांक: १८०० २२ १९५०
वेळ न दवडता, आजच मतदार नोंदणी करा!
#mybmcupdates
#SIR
#SIR2026
#SpecialIntensiveRevision
#SIRMaharashtra
#VoterRegistration2026
#lnformedVoter
@maharashtrasec@ecisveep@ceo_maharashtra
🔷बोरिवलीतील कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी भेट दिली. तसेच, कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर केंद्राचे सेवा कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार काढले.
🔷या भेटीदरम्यान श्रीमती प्राजक्ता वर्मा यांनी या केंद्रातील विविध विभाग, रुग्णसेवा, थॅलेसेमिया उपचार व्यवस्था, बाल रक्तविकार व बोन मॅरो ट्रान्सप्लांट (BMT) सेवा तसेच केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली.
🔷केंद्राचे उत्कृष्ट कार्य, अद्ययावत पायाभूत सुविधा, रुग्णसेवेची गुणवत्ता आणि संपूर्ण केंद्राचे कार्यक्षम व्यवस्थापन पाहून श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी यांनी समाधान व्यक्त केले.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली (पूर्व) येथील कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रामुळे अनेक बालकांना सामान्य जीवन जगण्यास मदत झाली आहे. बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे थॅलेसेमिया रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात, असा विश्वास निर्माण करण्यामध्ये महानगरपालिका यशस्वी झाली आहे. एकूणच बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्राचे कार्य उल्लेखनीय आहे, अशा शब्दात श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी केंद्राच्या कामगिरीचे कौतुक केले.
🔷सहायक आयुक्त (आर मध्य) श्री. प्रफुल्ल तांबे, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्राच्या संचालिका श्रीमती डॉ. रत्ना शर्मा, केंद्राचे उपसंचालक डॉ. संतोष खुडे आदी उपस्थित होते.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷मलेरिया, डेंगी आदी आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच, आभा कार्ड आणि आयुष्मान भारत कार्डचा लाभ अधिकाधीक नागरिकांना मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागातील हाजी मोहम्मद साबू सिद्दीकी महानगरपालिका प्रसूतीगृह आणि प्रभादेवी येथील महानगरपालिका दवाखान्यास श्रीमती अश्विनी भिडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आज पाहणी केली.
🔷उप आयुक्त (आयुक्त यांचे कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, उप आयुक्त (परिमंडळ-२) श्री. प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी दक्षिण विभाग) श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@AshwiniBhide
🔷घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणा-या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील मुख्य उड्डाणपुलाची ध्वनीरोधक (Noise Barrier) वगळता सर्व प्रमुख कामे पूर्ण झाली आहेत.
🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पस्थळास भेट देऊन परिसराची पाहणी केली. तसेच, वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. उड्डाणपूल खुला झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित राहील, यासाठी महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
🔷रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग (Approach Road) बांधण्यात आले आहेत. उड्डाणपुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्ग देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासोबतच दोन्ही बाजूचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांची देखील पुनर्बांधणी केली आहे. रेल्वे हद्दीत जिन्याद्वारे पादचारी मार्ग उप-रस्त्याला जोडण्यात आला आहे. या सर्व कामांची श्री. बांगर यांनी पाहणी केली.
🔷सद्यस्थितीत मुख्य उड्डाणपुलाची सर्व प्रमुख कामे पूर्ण झाली आहेत. रंगकाम, दिवाबत्ती व्यवस्था, रस्ता व इतर आवश्यक अंतिम कामे (Finishing Work) पूर्ण करण्यात आली आहेत. परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले ध्वनीरोधक (Noise Barrier) बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकंदरीतच, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत उड्डाणपूल सर्वार्थाने वाहतुकीसाठी सज्ज होईल, अशा पद्धतीने कामाची अंतिम पूर्तता करण्यात येत आहे.
🔷उड्डाणपूल प्रकल्पस्थळालगतच्या रस्त्यांवरील वाहतूक प्रवाह, प्रमुख जंक्शन, वाहतूक दिवे (Signals), वाहनांची वर्दळ तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांबाबत श्री. बांगर यांनी सूचना केल्या. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने योग्य त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग तसेच आवश्यकतेनुसार वाहतूक नियमनाची व्यवस्था करावी. अधिक गर्दीच्या वेळेत पुलाच्या पोहोच रस्त्यापासून वाहतूक कोंडी होणार नाही, यादृष्टीने वाहतूक पोलिसांसमवेत नियोजन करावे, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
🔷पोलिस उपायुक्त (वाहतूक - पूर्व विभाग) श्री. प्रदीप चव्हाण, महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) श्री. नरेश मेघराजानी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷माता व बालकांच्या आरोग्य, पोषण, सर्वांगीण विकास व संगोपनाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्य सेवा व उपक्रम राबविण्यात येतात. माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या महत्त्वाकांक्षी ‘Mission 1000 Days’ उपक्रमाच्या अनुषंगाने माता व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक सेवांचा अधिक प्रभावीपणे आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी आज मालाड-मालवणी परिसरातील अंगणवाडी व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली.
🔷मालाड (मार्वे मार्ग) येथील अंगणवाडी केंद्रास भेटीदरम्यान त्यांनी बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची पाहणी करून दैनंदिन आहाराचे स्वरूप, मासिक पोषण आहाराचे वितरण तसेच बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक नोंदींची माहिती घेतली. बालकांच्या आरोग्यविषयक माहितीच्या नोंदणी व देखरेखीसाठी राज्य शासनामार्फत वापरण्यात येणाऱ्या प्रणालीच्या कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला.
🔷मालवणी-२ येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन रुग्ण नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या Hospital Management Information System (HMIS) च्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. रुग्ण नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ व नागरिकाभिमुख करण्यासाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथेही रुग्ण नोंदणीसाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
🔷आशा सेविका व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध माता-बाल आरोग्य, पोषण व प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. विशेषतः ‘Mission 1000 Days’ अंतर्गत गर्भधारणेपूर्व काळापासून बालकाच्या पहिल्या दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीत माता व बालकांच्या पोषण, आरोग्य, वाढ व विकासावर लक्ष केंद्रित करून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
🔷तसेच पावसाळी आजार, संसर्गजन्य आजार व क्षयरोगाच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि क्षेत्रीय स्तरावर आशा सेविका व आरोग्य सेविकांमार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, सुलभ व तंत्रज्ञानस्नेही करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध डिजिटल उपक्रमांबाबतही त्यांनी माहिती घेतली.
🔷याप्रसंगी पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. कुंदन वळवी, पी पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती रूपाली सरमळकर, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा पुरी तसेच सहायक आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, पी विभाग आदी अधिकारी उपस्थित होते.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@PrajaktaVerma
@sandeshpawar420@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - NX_202600141142
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/IO5S2JXIzi येथे कृपया भेट द्यावी.
@PrakashIngawal3@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - NX_202600141096
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/IO5S2JXIzi येथे कृपया भेट द्यावी.
🔷पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे.
🔷या अंतर्गत, उपायुक्त (परिमंडळ-२) श्री. प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) श्रीमती वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात ‘एफ दक्षिण’ विभागाकडून आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
🔷यामध्ये पदपथांवर उभारण्यात आलेली ०७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, ०२ अनधिकृत कट्टे, ०४ बेवारस साहित्य साठवण ठिकाणे आणि २० फेरीवाल्यांचे निष्कासन करण्यात आले.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता वाढीसाठी मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत घाटकोपर ( पूर्व) येथे मलजल प्रक्रिया केंद्राचे ( STP) रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजित बांगर यांनी आज या प्रकल्पस्थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले.
🔷मुंबई मलनि:सारण प्रकल्प विभागाच्या वतीने ३३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. या कामामध्ये सिक्वेन्शियल बॅच रिऍक्टर (SBR) हे तंत्रज्ञान प्रस्तावित आहे. विविध प्रयोजनार्थ या पाण्याचा पुनर्वापर (Reuse) केला जाणार आहे. नवीन मलजल प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यानंतर, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल. तसेच घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर परिसरातील लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे.
🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रकल्पस्थळास भेट देऊन सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थापत्य कामांसह यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी कामांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये मलजलाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रक्रिया टाक्या, इनलेट व आउटलेट व्यवस्था, पंप हाऊस, स्लज प्रक्रिया युनिट, अंतर्गत पाइपलाइन व इतर स्थापत्य कामांची प्रगती, तसेच पंप, एरेशन ब्लोअर्स, स्क्रीनिंग व स्लज प्रक्रिया यंत्रणा, विविध यांत्रिक उपकरणे व पाइपिंगची उभारणी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मर, विद्युत पॅनेल, केबलिंग, मोटर्सना वीजपुरवठा, नियंत्रण व ऑटोमेशन प्रणाली, स्काडा तसेच बॅकअप वीज व्यवस्था कामांचाही आढावा घेण्यात आला.
🔷मलजलावर द्वितीय स्तरीय (Secondary) प्रक्रिया करण्यासाठी वाहिनी (Liquid Pipeline) अंथरण्याचे काम दिनांक ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आणि प्रकल्पाचे पूर्ण काम दिनांक ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्टय आहे. या अनुषंगाने मलजल प्रक्रिया केंद्राचे काम विहित वेळेत आणि वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कुमक वाढवणे आवश्यक होते. त्यानुसार, दिनांक १ ऑक्टोबर २०२६ पासून प्रकल्पस्थळी सुमारे १ हजार मनुष्यबळ कार्यरत आहे. ही अतिरिक्त कुमक प्रकल्प पूर्णत्वास जाईपर्यंत कायम ठेवावी. एकाचवेळी समांतरपद्धतीने सर्व कामे पूर्ण करावीत, प्रकल्प कामात गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देशदेखील श्री. बांगर यांनी दिले.
🔷उपायुक्त (अभियांत्रिकी) श्री. शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनि:सारण प्रकल्प) श्री. राजेंद्र परब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्थायी समिती, महानगरपालिका पदाधिकारी आणि प्रसारमाध्यम सहकारी यांनी, बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध जलाशयांना आणि प्रकल्पांना आज भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, जलसाठा, पाणीपुरवठा व्यवस्था व त्याचे आगामी नियोजन तसेच संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेतला.
🔷सभागृहनेते श्री. गणेश खणकर, विरोधी पक्ष नेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते श्री. अशरफ आजमी, एआयएमआयएमचे गटनेते श्री. विजय उबाळे, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या श्रीमती अमरीन अब्रहानी, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरिष भांदिर्गे, स्थायी समिती सदस्य श्रीमती श्रद्धा जाधव, श्री. जमिर कुरेशी, डॉ. (श्रीमती) सईदा खान, श्रीमती प्रीती सातम, श्री. शिवकुमार झा, श्री. तेजिंदर तिवाना, श्री. प्रकाश दरेकर, श्रीमती मीनाक्षी पाटणकर, श्रीमती दीपमाला बढे, श्रीमती लक्ष्मी भाटिया, श्रीमती ट्युलिप मिरांडा, श्रीमती अजंता यादव त्याचप्रमाणे उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. पुरुषोत्तम माळवदे, जल अभियंता श्री. मंगेश शेवाळे, प्रमुख अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) श्री. दिलीप पाटील यांच्यासह अधिकारी, अभियंता, कर्मचारी दौऱ्यास उपस्थित होते.
🔷मुंबई महानगराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पिसे - पांजरापूर संकुलास सर्व मान्यवर आणि पत्रकारांनी भेट दिली.
🔷प्रारंभी, पांजरापूर येथील जल शुद्धीकरण प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली.
🔷त्यानंतर, पिसे (ता.भिवंडी) येथे ४५५ दशलक्ष लीटर प्रतिदिन (MLD) क्षमतेचे नवीन उदंचन केंद्र (Pumping Station) तसेच नवीन बंधारा (New Pick Up Weir With Gate) बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले.
🔷या पाहणीनंतर महापौर श्रीमती रितू तावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मोडकसागर जलाशय आणि तानसा जलाशयास भेट दिली. तसेच, प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
@MNSMayuriMhasde@miganeshchukkal@MnsRitaGupta@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - NX_202600140000
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/IO5S2JXIzi येथे कृपया भेट द्यावी.
@TheCaravaan@mybmc@TawdeRitu We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/IO5S2JXIzi
Your MARG registration number : NX_202600139950