🔷मुंबईतील कोळीवाड्यांच्या ठिकाणी महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईतील माहीम चौपाटीलगत असलेला ‘सी फूड प्लाझा’ आज सुरू करण्यात आला.
🔷महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते तथा जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार, मराठी अभिनेते श्री. कमलाकर सातपुते, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. योगेश देसाई आदींसह महानगरपालिकेचे अधिकारी, बचत गटाच्या सदस्य महिला उपस्थित होत्या.
🔷हा सी फूड प्लाझा आठवड्यात दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी खुला राहणार आहे.
🔷मुंबईतील कोळीवाड्यातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महिला बचतगटांद्वारे संचलित ‘सी फूड प्लाझा’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे.
🔷या अनुषंगाने, आपण सर्वांना नम्र विनंती आहे की, फटाक्यांचा आवाज टाळूया, सण-उत्सवांचा आनंद द्विगुणित करुया !
#mybmcupdates@CPCB_OFFICIAL@mpcb_official@EnvironmentMaha
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, विशेष शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील गुणवंत आणि प्रयोगशील ५० शिक्षकांचा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उप महापौर श्री. संजय घाडी यांच्या हस्त आज आदर्श महापौर शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या आदर्श ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये ११,०००/- (ECS द्वारे बँक खात्यात जमा), स्मृतिचिन्ह, मानपत्र/प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
🔷भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष श्रीमती यामिनी जाधव, सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्ष श्री. आकाश पुरोहित, नगरसेविका श्रीमती उर्मिला पांचाळ, नगरसेविका श्रीमती राजेश्री भाटणकर, नगरसेविका मेहजाबीन अतीक अहमद खान, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. दत्तात्रेय वारे गुरुजी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, शिक्षणाधिकारी श्री. कीर्तीवर्धन किरीतकुडवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@RajeshreeAtWork
🔷माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ राबविण्यात येत आहे.
🔷या अंतर्गत, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करता येणार आहे.
🔷नोटीस प्राप्त मतदारांनी अद्यापही आवश्यक दस्तऐवज सादर केले नसतील तसेच ज्यांचे मतदार यादीत नाव नाही, अशांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
🔷आपल्याच मतदान केंद्रांवर दिनांक २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित या शिबिरांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
#mybmcupdates
#SIR
#SIR2026
#SpecialIntensiveRevision
#SIRMaharashtra
#VoterRegistration2026
#lnformedVoter
@maharashtrasec@ecisveep@CEO_Maharashtra
विशेष स्वच्छता मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एफ/ उत्तर' विभागातील शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
#CleanlinessDrive#MyBMCUpdate
@mehta_alok We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/5vKsEHrP9G
Your MARG registration number : FN_202600153728
@kedar26 We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/5vKsEHrP9G
Your MARG registration number : FN_202600153846
विशेष स्वच्छता मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एफ/ उत्तर' विभागातील वडाळा येथील ऍकवर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
#MyBMCUpdate#स्वच्छमुंबई
🔷As per the directives of the Hon'ble Bombay High Court, bursting firecrackers on public roads, streets/alleys and footpaths is strictly prohibited.
🔷Let's avoid the noise of firecrackers and multiply the joy!"
#mybmcupdates@CPCB_OFFICIAL@mpcb_official@EnvironmentMaha
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबईतील स्वच्छतेच्या बाबतीत दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रशासन कटिबद्ध असून, त्यानुसार स्वच्छतेबाबत लवकरात लवकर दृश्य स्वरुपात बदल दिसायला हवे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.
🔷तसेच, कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी महानगरपालिकेने प्रभावी यंत्रणा विकसित केली आहे. प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर या यंत्रणेचा तितक्याच प्रभावीपणे वापर करावा.
🔷मुंबईतील कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे (Garbage Vulnerable Points – GVP) ओळखून त्यांचे नकाशांकन करणे, अशा ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे नियमित देखरेख ठेवणे आणि संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयांनी कचरा साचण्यामागील कारणांचे विश्लेषण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
🔷बांधकाम व पाडकाम राडारोड्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही डॉ. शर्मा यांनी सांगितले.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज वरळी येथील महानगरपालिकेच्या कमांड सेंटर येथे पार पडली.
🔷उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, सह आयुक्त, परिमंडळांचे उप आयुक्त, सर्व प्रशासकीय विभागांचे (वॉर्ड) सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷हंगेरीच्या १९५६ मधील क्रांती आणि स्वातंत्र्यलढ्याच्या ७०व्या वर्धापनदिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक इमारतीवर रोशणाई करण्यात आली आहे.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबईतील हंगेरीच्या वाणिज्यदूतावासाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या या रोशणाईची ‘फ्रीडम कनेक्ट्स’ (Freedom Connects) अशी मध्यवर्ती संकल्पना आहे.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये,आणि न्यायालयांपासून १०० मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई आहे.
🔷कृपया, सर्व नागरिकांनी या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
#mybmcupdates
@CPCB_OFFICIAL@mpcb_official@EnvironmentMaha
🔷शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव - मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उप महापौर श्री. संजय घाडी यांच्यासह माननीय खासदार, माननीय आमदार व विविध पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आजपासून हे तीनही पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.
या उड्डाणपुलांची ही चित्रफीत…
#Mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi