#सोलापूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी स्वातंत्र्य, लोकशाही, संवैधानिक सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा व शहराच्यातर्फे गांधी पुतळ्याजवळ #मूकआंदोलन करण्यात आले. @supriya_sule@Jayant_R_Patil#GandhiJayanti
कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण आज कर्मवीर अण्णांच्या जन्मस्थळी कुंभोज इथे होत आहे. कर्मवीर अध्यासन केंद्राचे उद्घाटनही यावेळी होत आहे, रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा आनंद मला ��हे.
मानवलोक संस्थेद्वारे उपेक्षित व दुष्काळग्रस्तांसाठी झटणारे, मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून परित्यक्तांना आधार देणारे, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत द्वारकादास शालीग्रामजी लोहिया यांच्या निधनाने एका खंद्या सामाजिक कार्यकर्त्याला आपण मुकलो.
द्वारकादास लोहिया यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अंबेजोगाई केंद्राचे अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम पाहिले व त्यांचे केंद्राला मोठे योगदान होते. सामाजिक क्षेत्रातील या निष्ठावंत दीपस्तंभाला भावपूर्ण श्रद्धांजली!
'मानवलाेक’चे संस्थापक डाॅ. द्वारकादास लोहिया उर्फ बाबूजी या���च्या निधनाने एका जेष्ठ समाजसेवकास मुकलो आहोत. आपल्या कार्यातून त्यांनी मानवलोक सोबतच अंबाजोगाई आणि बीड जिल्ह्याचे नाव मोठे केले. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजासाठी समर्पित केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
जय जवान जय किसान चा नारा देणारे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्रींची जयंती आहे आणि दुर्दैवाने आजचे सरकार मार किसान म्हण�� किसान क्रांती पदयात्रेवर पाशवी बळ बळाचा वापर करत आहे. या सरकारचा करावा तेवढा निषेध कमी आहे.
#LalBahadurShastri
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करुन पाण्याचे फवारे मारण्यात आले, लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा निषेध. @PMOIndia बापूंच्या जन्मदिनी या सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. आपले सरकार या शेतकऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेत नाही. हेच का आपले 'अच्छे दिन'? https://t.co/L4LwQx607E
पुणे स्टेशन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर स्वातंत्र्य, लोकशाही आणि संवैधानिक सार्वभौमत्व आदी धोक्यात आणणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात @NCPSpeaks च्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले.
It’s disappointing that people have not heard @PawarSpeaks Saheb where he has clearly raised three questions:
1) what is the justification for a 300 percent price increase from Rs. 526 crores to Rs. 1,670 crores which potentially could be a significant loss to the exchequer?
बुलढाणा जिल्ह्यातील वयोवृद्ध पती-पत्नी निराधार आणि असहाय्य अवस्थेत जगत असताना केवळ आधार लिंक नसल्याने रेशनचे अन्नधान्य नाकारणे अमानुषपणाचे आहे. @CMOMaharashtra तुमचं सरकार किती असंवेनदनशील झालं आहे,याचा हा पुरावाच नव्हे काय?तातडीने संबंधितावर कारवाई झाली पाहिजे,इतकी अपेक्षा आहे.
कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा कणा असलेल्या सर्व कार्यरत, कर्तृत्ववान ज्येष्ठ महिला व पुरुषांना ज्येष्�� नागरिक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#senior #Citizens
#SeniorCitizenDay
महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती वर्षात देश स्वच्छ करताना लोकांची मनं स्वच्छ करणाऱ्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. गांधीविचारांची ज्योत चिरंतर तेवत ठेवण्यासाठी आपल्याला निर्धारपूर्वक उभं राहावं लागणार आहे.
जयंती दिनी बापूंना विनम्र अभिवादन!
#MahatmaGandhiJayanti
Literacy unlocks the door to learning throughout life, is essential to development and health, and opens the way for democratic participation and active citizenship. ― Kofi Annan
Greetings on #InternationalLiteracyDay
साक्षरता सर्व��र्थाने महत्त्वाची आहे. अक्षरओळख तर हवीच पण त्यासोबत आता संगणक साक्षरता आणि आर्थिक साक्षरता देखील महत्त्वाची आहे. आजच्या साक्षरता दिनी नव्या तंत्रज्ञानाची ओळख करुन घेण्याचा संकल्प करुया.