मा. राहुलजी गांधी (विरोधी पक्षनेते) यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशाच्या सेवेसाठी आणखी यश मिळो, हीच सदिच्छा. @RahulGandhi@vishwajeetkadam@INCIndia@INCMaharashtra
आषाढी वारीदरम्यान सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात कवलापूर येथील वारकरी भगिनी नंदा पवार व शैलजा जगताप यांचे दुर्दैवी निधन झाले. आज पवार व जगताप कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली.
अशा दुःखद प्रसंगी कोणतेही शब्द त्यांच्या वेदना कमी करू शकत नाहीत. परमेश्वर दिवंगत सौ. नंदा पवार यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि पवार कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच प्रार्थना!
कोल्हापूर येथे मा. अजयसिंह देसाई सर यांची कन्या चि. सौ. कां. डॉ. ऋतुजा आणि मा. अमरसिंह बुट्टे-पाटील यांचे चिरंजीव चि. वीरेंद्रसिंह यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#happymarriedlife
सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिशा (जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण) समितीच्या बैठकीस उपस्थित राहून जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी पाणीटंचाई, कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पीक विमा, वीज वितरण व्यवस्था, दुष्काळबाबत तयारी तसेच नागरिकांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. खा. विशालदादा पाटील, आ. सत्यजित देशमुख, आ. सुहास बाबर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संगीता पाटील तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
शासनाच्या योजना या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असतात. त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत त्या वेळेत, पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. विशेषतः कृषी योजना शेतकरी बांधवांच्यापर्यंत तत्परतेने पोहोचल्याच पाहिजेत. पीक विम्याशी संबंधित तक्रारी देखील तातडीने निराकरण केल्या पाहिजेत असे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रशासनाने जनहिताला प्राधान्य देत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.
#collectorofficesangli #Meeting #officeofvishwajeetkadam #DistrictPlanning
वारी दरम्यान जेजुरी येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मिरज तालुक्यातील मालगाव येथील वारकरी भगिनी कै. माधवी राजाराम सलगरे यांचे घरी सांत्वनपर भेट दिली. पंढरीच्या विठू माऊलीच्या भेटीची आस मनात घेऊन निघालेली एक माऊली, अर्ध्या वाटेवरूनच वैकुंठाच्या प्रवासाला निघून जाईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसावं. दिवंगत माधवी सलगरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व सलगरे परिवारावर कोसळलेला हा आघात पेलण्याची ताकद त्यांना मिळो, हीच विठ्ठलचरणी प्रार्थना करतो !
#भावपूर्ण_श्रद्धांजली
राज्यभरातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील प्रश्न सभागृहात मांडत असतात. अनेक मंत्री सभागृहात उपस्थित राहून चर्चेत सहभागी होतात आणि उत्तरही देतात. मात्र, जे मंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी वारंवार सूचना देऊनही उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यामुळे सभागृहाच्या कामकाजावर परिणाम होतो आणि जनतेच्या प्रश्नांनाही विलंब होतो.
विधिमंडळ हे जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती ही औपचारिकता नसून लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर सभागृहाच्या कामकाजाबाबत स्पष्ट व कर्तव्यदक्ष भूम���का घेत अनुपस्थित मंत्री व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
#MaharashtraAssembly #monsoonsession #vishwajeetkadam
तोफांचे आवाज ऐकेपर्यंत मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या अदम्य जिद्दीने स्वराज्याचा इतिहास घडवला. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
#bajiprabhudeshpande#punyatithi
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मृत्यूचाही हसत स्वीकार करणारे स्वराज्याचे शिलेदार वीर शिवा काशिद यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
#shivakashid#punyatithi
जेजुरीजवळ दिंडीत सहभागी असलेल्या वाहनाच्या धडकेत सांगलीच्या तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना मन हेलावून ट��कणारी आहे. या दुःखद दुर्घटनेत आपले प्राण गमावलेल्या वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
पावले चालती पंढरीची वाट !
यंदाही आषाढी पायी वारीची पवित्र परंपरा जपत, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे सपत्नीक दर्शन घेतले. टाळ-मृदंगाचा गजर आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या नामघोषात, सर्वसामान्य वारकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून चालताना प्रत्येक पाऊल नव्या ऊर्जेने भरून जाते. विठू-माऊलीच्या दारात कोणताही भेदभाव नसतो; तिथे फक्त आणि फक्त निखळ भक्ती असते.
आमच्या कुटुंबाला वारीचा मोठा वारसा लाभला आहे. माझे आजोबा श्रीपतरावतात्या कदम हे देखील वारकरी होते. त्यांचाच हा भक्तीचा वारसा पुढे चालवतोय. माझ्या पत्नीचे आळंदी ते पंढरपूर पायी ��ालण्याचे हे २० वे वर्ष आहे, याचेही विशेष कौतुक आहे. वाटेत भेटणारे आबालवृद्ध, त्यांच्याशी होणाऱ्या सुसंवादातून मिळणारा आनंद आणि वारीने शिकवलेला साधेपणा, संयम व सेवाभाव आयुष्यभर जपण्याची एक नवी प्रेरणा देऊन जातो.
विठू माऊली चरणी हेच मागणं... संपूर्ण महाराष्ट्रावर सुखाची, समृद्धीची आणि माऊलींच्या कृपेची सावली अशीच अखंड राहू दे !
#WalkingWithFaith #SpiritualJourney #AshadiWari #VishwajeetKadam
भ्रष्ट, अन्यायी, पक्षपाती, बेईमान - ये चार शब्द मेरे नहीं, ये देश के छात्र आज भारत की शिक्षा व्यवस्था के लिए इस्तेमाल कर रहे हैं।
और सच यही है - भारत की शिक्षा व्यवस्था अब एक बेईमान वसूली तंत्र बन चुकी है।
जो व्यवस्था बच्चों के भविष्य को तैयार करने के लिए बनी थी, वो आज उन्हें और उनके ��रिवार को कर्ज़, तनाव और निराशा में धकेल रही है।
इसी भ्रष्टाचार ने पेपर लीक माफ़िया को जन्म दिया - जो तैयारी कर रहे लाखों छात्रों की सालों की मेहनत एक झटके में लूट लेता है।
यहां दोषी vendors और अधिकारियों को मिलती है tender और तरक्की। और सजा किसे मिलती है? छात्रों को, जिन्हें टूटे सपनों के साथ अकेले छोड़ दिया जाता है।
��ोदी सरकार और शिक्षा मंत्री यह सब देख रहे हैं। पर उन्होंने चुप्पी चुनी है - जवाबदेही से मुँह मोड़ लिया है। और मीडिया में? बस एक लंबा सन्नाटा।
अब बहुत हुआ - अब वक़्त है शिक्षा में Revolution का।
17 जुलाई, देहरादून - मेरे साथ आइए, ‘छात्रों की गूँज’ को और बुलंद करें।
यहां जुड़ें: https://t.co/g6mbw7X5XC
#ChhatronKiGoonj
महाराष्ट्र TET का पेपर लीक हुआ, परीक्षा रद्द हुई। 6 लाख अभ्यर्थी अधर में। दो हफ्ते हो गए, नई तारीख़ का कोई अता-पता नहीं।
लीक करने वाले आज़ाद, सिस्टम बेदाग़ और सज़ा भुगत रहा है वो जिसने ईमानदारी से मेहनत की।
ये देश के कार्यरत और होने वाले शिक्षक हैं जिनके हाथ में भारत का भविष्य है - ये वही लोग हैं जिन्होंने साल दर साल तैयारी की, फॉर्म भरे, फीस दी, दूर-दराज के सेंटर तक गए। और अब बस इंतज़ार कर रहे हैं, बिना तारीख़, बिना जवाब।
मुख्यमंत्री जी - तीन चीज़ें, आज ही:
1. समय-सीमा : TET की नई तारीख़ अभी घोषित कीजिए।
2. जवाबदेही : लीक के ज़िम्मेदारों पर कार्रवाई हो, अभ्यर्थी पर नहीं।
3. भविष्य की रक्षा : जिनका साल इस लीक के कारण बर्बाद हुआ, उन्हें उम्र सीमा में छूट दी जाए।
गलती संस्था की, सज़ा अभ्यर्थी को - यह इंसाफ़ नहीं है।
17 जुलाई को देहराद��न में मैं पेपर लीक के बढ़ते संकट पर आपसे विस्तार से बात करूंगा। अब समय आ गया है शिक्षा क्रांति का - ऐसी व्यवस्था बनाने का, जहां युवाओं को सिस्टम की नाकामी नहीं, अपनी मेहनत का फल मिले।
#ChhatronKiGoonj
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते, गायक आणि नाट्य संगीत निर्माते नारायण श्रीपाद राजहंस उर्फ
बालगंधर्व यांना स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन..!
#Baalgandharv#punyatithi