आज महाराष्ट्रात शेकडो अधिकारी काम करत आहेत पण वर्षानुवर्षे फक्त एकच अधिकाऱ्याची बदली आणि कामाचा धडाका पाहायला मिळतो मग बा���ीचे अधिकारी काय करतात हा प्रश्न आमच्या सारख्या सामान्य माणसाला पडतो.
किमान जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटतं नसेल का ह्या अधिकऱ्यांना मुंडे साहेबांचे काम पाहून म्हणजे किमान घरी आरशात स्वतःला बघून नसेल वाटतं का मी सुद्धा हे काम करू शकतो मी सुद्धा कोणाच्या ताटाखालचे मांजर न बनता कोणाच्या दबावाखाली न येता समाजासाठी माझ्या राज्यासाठी काहीतरी करू शकतो.
मी ज्या खुर्चीवर बसलोय त्याने ला���ो लोकांचे जीवनमान बदलू शकतो हे कधीतरी मनात येतं नसेल का ह्या अधिकारी ल���कांच्या
#विचार_सामान्यांचे
मराठीतले श्रेष्ठ शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन.
‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ त्यांनी उपोषण केले, त्यांना यश मिळाले.
‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले'
#सानेगुरुजी #मराठी #म
मुंडे साहेबांनी आता दुध कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे,
अशा अनेक दुध कंपन्या आहेत ज्या शेतकर्यांकडुन दुध संकलन करतच नाही मात्र पँकींग दुध मात्र विकतात. हे दुधव्यावसायिक सामान्यांच्या आरोग्याशी तर खेळतात मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या दुधाला पण भाव मिळू देत नाही.
मुंबईसारख्या शहरात नोकरीच्या जाहिरातीत "फक्त गुजराती-मारवाडी उमेदवारांना प्राधान्य" अशी अट पाहून मन खरंच व्यथित होतं. ही अट केवळ अन्यायकारक नाही, तर महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना डावलणारी आहे.
मराठी तरुणांनी मेहनत करून सीए सारखी कठीण पदवी मिळवली, पण त्यांना त्यांच्या मातीतच संधी नाकारली जाते, हे किती वेदनादायक आहे! रोजगार हा प्रत्येकाचा ��क्क आहे, तो जात, धर्म, भाषा यावर आधारित असू नये.
कंपनीचं "भाषेचं ज्ञान आवश्यक आहे" हे स्पष्टीकरण धादांत खोटं वाटतं. कारण अकाऊंट्स आणि फायनान्सच्या कामात प्रामाणिकपणा, कौशल्य आणि मेहनत महत्त्वाची असते, जात किंवा भाषा नाही.
- ही घटना आपल्याला आठवण करून देते की भेदभावाविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे.
- स्थानिक तरुणांना रोजगारात समान संधी मिळाली पाहिजे आणि समाजाने एकत्र येऊन अशा अन्यायकार�� जाहिराती थांबवल्या पाहिजेत.
ही लढाई फक्त मराठी लोकांची नाही, तर प्रत्येक त्या तरुणाची आहे ज्याला त्याच्या ओळखीवरून नाकारलं जातं. खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येकाला त्याच्या कौशल्यावरून संधी मिळेल, ओळखीवरून नाही.
पैसा सर्वस्व नाही, हे जरी खरं असलं तरी जगण्याची वाट तो नक्कीच सुसह्य करतो..एका डब्यात माणूस प्रवास करतो, तर दुसऱ्या डब्यात त्याचा संघर्ष, फरक फक्त तिकिटाचा नसतो, तो परिस्थितीचा आणि पैशाचा असतो.🚆
#पैसा
"निरर्थक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचं शहाणपण ठेवा."
हे वाक्य दिसायला तसं खूप छोटं आहे, पण त्यात संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान दडलेलं आहे.
भगवान श्रीकृष्णाकडे अपार शक्ती होती. त्यांना हवं असतं, तर ते प्रत्येक अपमानाला उत्तर देऊ शकले असते.
पण त्यांनी प्रत्येक वेळी प्रतिक्रिया दिली नाही.
कारण त्यांना माहीत होतं की काही लोकांना उत्तर दिलं, तर त्यांची किंमत वाढते. काही लोकं तुमच्या वेळेसाठी पात्र नसतात.
पूर्वी गावात एखादा मूर्ख माणूस असेल, तर त्याला फक्त ते गावच ओळखायचं.
आज सोशल मीडियामुळे संपूर्ण जग त्याला ओळखतं.
कुणी काहीही लिहितो. कुणी काहीही बोलतो. कुणी अफवा पसरवतो आणि अनेक सुशिक्षित लोकं त्याला उत्तर देण्यात आपला अमूल्य वेळ घालवतात.
आज सोशल मीडियावर अनेक ट्रोल गँग्स दिसतात. त्यांचं उद्दिष्ट सत्य शोधणं नसतं.
त्यांचं उद्दिष्ट असतं:
तुम्हाला चिडवणं
तुमचं लक्ष विचलित करणं
तुमचा वेळ वाया घालवणं
तुम्हाला भावनिक बनवणं.
ते इतरांच्या यशामुळे अस्वस्थ असतात.
तुम्ही शांत असाल, तर त्यांना त्रास होतो.
तुम्ही प्रगती करत असाल, तर त्यांना जास्त त्रास होतो.
म्हणून ते प्रतिक्रिया मिळवण्यासाठी काहीही बोलतात.
एका उद्योगपतीने मोठा व्यवसाय उभा केला.
त्याच्यावर सतत टीका होत होती.
एका पत्रकाराने विचारलं,
"तुम्ही प्रत्येक टीकेला उत्त��� का देत नाही?"
त्याने उत्तर दिल���,
"जर मी प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यामागे धावू लागलो तर माझ्या गंतव्यस्थानी कधीच पोहोचणार नाही."
गरुड जेव्हा उंच उडतो, तेव्हा काही कावळे त्याला त्रास देतात.
ते त्याच्या पाठीवर बसतात. त्याला टोचतात.
पण गरुड त्यांच्याशी भांडत बसत नाही.
तो आणखी उंच उडतो.
ज्या उंचीवर ऑक्सिजन कमी होतो, तिथे कावळे आपोआप खाली पडतात.
जीवनातही असंच असतं.
काही लोकांशी वाद घालण्याऐवजी स्वतःची उंची वाढवा.
प्रत्��ेक टीका महत्त्वाची नसते.
डॉक्टर ऑपरेशन करत असताना, बाहेर बसलेल्या लोकांच्या मतांवर निर्णय घेत नाही.
कारण त्याला त्या विषयाचे ज्ञान असतं.
तसंच,
तुमच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला नसतो.
ज्यांनी तुमचा संघर्ष पाहिलेला नाही, त्यांच्या मतांचं ओझं का वाहायचं?
एकदा भगवान बुद्ध एका गावात गेले.
लोकांनी त्यांचा अपमान केला.
शिवीगाळ केली.
बुद्ध शांत राहिले.
शिष्यांनी विचारले,
"गुरुजी, तुम्ही ��त्तर का दिले नाही?"
बुद्ध म्हणाले,
"कोणी भेटवस्तू आणली आणि मी स्वीकारली नाही, तर ती भेट कोणाकडे राहते?"
शिष्य म्हणाले, "ज्याने आणली त्याच्याकडे."
बुद्ध म्हणाले,
"तसेच त्यांचा राग-अपमान-शिवीगाळ मी स्वीकारला नाही."
आज अनेक लोकं सकाळी उठल्यावर देवाचे नाव घेण्याऐवजी कमेंट सेक्शन तपासतात.
कोण काय बोललं? कोणी लाईक केलं? कोणी कोणाला ट्रोल केलं?
हळूहळू दुसऱ्यांच्या मतांचे गुलाम बनतात.
लक्षात ठ���वा,
तुमचं मूल्य लाईक्स, फॉलोअर्स किंवा कमेंट्स ठरवत नाहीत.
अनेकांना वाटते की शांत राहणे म्हणजे हार मानणं.
चूक.
कधी कधी शांत राहण्यासाठी जास्त ताकद लागते. कारण प्रतिक्रिया देणं सोपे असते.
संयम ठेवणं कठीण असतं.
जंगलाचा राजा सिंह असतो.
तो प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्याला उत्तर देत नाही.
जर तो तसे करू लागला, तर त्याचं राजेपण संपेल.
आपल्या जीवनातही असंच आहे.
प्रत्येक वाद, प्रत्येक आरोप, प��रत्येक अफवा, प्रत्येक ट्रोल यांना उत्तर देणं आवश्यक नसतं.
आपल्याकडे मर्यादित वेळ आहे.
मर्यादित ऊर्जा आहे.
प्रश्न असा आहे की ती ऊर्जा आ��ण कुठे खर्च करतो?
स्वप्नांवर?
कुटुंबावर?
शिक्षणावर?
समाजकारणावर?
की
ट्रोल्सना उत्तर देण्यात?
निरर्थक वादात?
अफवांमध्ये?
एखादा मुलगा गरीब परिस्थितीतही अभ्यास करतो.
लोकं त्याच्यावर हसतात.
तो वाद घालत नाही.
तो अभ्यास करतो.
काही वर्षांनी अधिकारी बनतो.
तेव्हा त्याला काही बोलण्याची गरज राहत नाही.
त्याचं यशच लोकांना उत्तर देतं.
जीवनात तुम्हाला तीन प्रकारचे लोक भेटतील.
पहिला प्रकार: तुम्हाला खाली खेचणारे.
दुसरा प्रकार: तुमच्यासोबत चालणारे.
तिसरा प्रकार: तुम्हाला वर उचलणारे.
पहिल्या प्रकाराला दुर्लक्ष करा. दुसऱ्यांचा आदर करा. तिसऱ्यांचे ऋण माना.
सर्वात मोठे स्वातंत्र्य म्हणजे
"लोक काय म्हणतील" यापासून मुक्त होणे.
ज्या दिवशी तुम्ही हे साध्य कराल, त्या दिवशी तुमचे आयुष्य बदलून जाईल.
जीवन खूप मौल्यवान आहे.
ते प्रत्येक ट्रोल, प्रत्येक अफवा, प्रत्येक निरर्थक वाद यांच्या��र खर्च करण्यासाठी नाही.
लक्षात ठेवा:
काही लोक तुमचे लक्ष वळवून घेण्यासाठी तुम्हाला चिडवतात.
तुमची प्रतिक्रिया हेच त्यांचं बक्षीस असतं. म्हणून कधी कधी सर्वात प्रभावी उत्तर म्हणजे, उत्तरच न देणं.
गरुडासारखं उंच उडा. सिंहासारखा आत्मविश्वास ठेवा. बुद्धांसारखे शांत राहा.
प्रत्येक आवाजाला उत्तर देणं आवश्यक नसतं, पण प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगणं आवश्यक असतं."
पूर्वी पत्र,लग्नपत्रिका फक्त कागदं नव्हती, त्या नात्यांच्या उबदार आठवणी होत्या..भिंतीवर टांगलेली पत्र व पत्रिका माणसांनी जपलेल्या माणुसकीची साक्ष देत होत्या..आज निमंत्रणं मोबाईलवर येतात, पण मनापासून दिलेला मान आणि जिव्हाळ्याचा स्पर्श मात्र हरवत चालला आहे.!❤️
पोटापाण्यासाठी जातीपाती, विचारधारा, धर्म, भाषा, राजकारण जपण्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श प्रेरणास्थान आपण नक्की कसे, कशासाठी अन कोणाकडून समजून घेतोय हे फार महत्वाचे झालंय…..
जशा उन्हाळी सुट्ट्या संपत यायच्या तशीच चाहूल लागायची शाळेसाठी लाग���ार्या या सामग्रीची.❤️
लहानपणी तर चिठ्ठीतल्या या अर्ध्या वस्तू सुद्धा आम्हाला कधी भेटत नसायच्या.
इन्स्टाग्राम वर हा फोटो पाहिला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.❤️
#बालपण #शाळा #मराठी #शिक्षण
अनेकांनी राज्य निर्माण केलं.. अनेकांनी राज्याभिषेक केले.. अनेकजण राजा झाले... पण रयतेसाठी रयतेचं राज्य हे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवून राज्य निर्माण केलं फक्त छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले या श्रीमंतयोगीने...
#शिवराज्याभिषेक
'जॉली एलएलबी'च्या क्लायमॅक्स सीनमध्ये वकील असणारा जगदीश उर्फ जॉली त्यागी एक विलक्षण प्रश्न करतो.
हिट अँड रन केसमध्ये आरोपीला वाचवण्यासाठी केस कमजोर करणाऱ्या तपास अधिकाऱ्याला विचारतो की, तुम्ही आ���ल्या काळजावर हात ठेवून सांगू शकता का, 'की तुम्ही ह्या केसचे काम अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे केले आहे का?'
तपास अधिकारी सबइन्स्पेक्टर राठी म्हणतात की, 'मी अगदी प्रामाणिकपणे काम केले आहे.'
राठीच्या उत्तरानंतर ऍडव���होकेट त्यागी आपल्या हातातला कागदाचा तुकडा त्यांच्या हाती देऊन सांगतो की, ‘ह्या कागदाच्या चिठोऱ्यावरील यादीत ज्या लोकांची नावे दिली आहेत ती वाचा. ह्या अपघातात मरण पावलेल्या लोकांची नावे आहेत.‘
न्यायमूर्ती देखील सांगतात की, जरा नावं वाचून तरी पाहा.
राठी हातातल्या कागदावर लिहिलेली नावे वाचून दाखवू लागतात.
एकेक करुन ते नावं वाचून दाखवतात. एका नावापाशी ऍडव्होकेट त्यागी त्यांना थांब���ून म्हणतात की, ‘जेव्हापासून मी ही केस घेतली आहे तेव्हापासून ह्यात मरण पावलेली माणसं माझ्या स्वप्नात येतात आणि सांगतात की तुम्ही तुमचं काम इमानदारीने केलेले नाही.‘
ह्यावर इन्स्पेक्टर राठी कुत्सितपणे हसून उद्गारतो की, 'मग ह्यातल्या एखाद्या मुडद्यालाच तुम्ही इथे साक्षीला का बोलवत नाही?'
त्यागी म्हणतात की, 'मी तेच करणार आहे. ह्या अपघातात जिवंत असलेल्या मात्र तुम्ही कागदोपत्री मृत दाख��लेल्या माणसाला मी बोलवलं आहे!'
लपून छपून कसेबसे कोर्टापर्यंत ��लेला, अपघातात पाय गमावून बसलेला सदाकांत मिश्रा हातातल्या बैसाखीच्या सहाय्याने लंगडत लंगडतच कोर्टातल्या विटनेस बॉक्समध्ये येतो आणि पुढे काय होते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे.
हे सर्व इथे लिहायचे कारण म्हणजे, अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नुकतेच नियुक्त झालेल्या तुकाराम मुंढे यांनी मागील काही दिवसांत जी धडक कारवाई हाती घेतली आहे, ज्या धाडी घातल्या जात आहेत ते सर्व थक्क करणार�� आणि आपल्या हतबलतेविषयी तिडीक आणणारे आहे!
दूध, लस्सी, खवा, मिठाई, फळे, भाजीपाला, डाळी, धान्ये काहीही भेसळीशिवाय आपल्या पर्यंत पोहोचत नव्हते आणि आजही पोहोचत नाही हे स्पष्ट झालेय.
बनावट औषधे, बनावट दूध, बनावट, खाद्य पदार्थ हे सारं आपण बिनदिक्कत वापरत होतो, डोळे झाकून खात होतो.
हे सर्व जिवघेणं आणि आपल्या विश्वासाला तडा देण��रं आहे हे काही विशिष्ट लोकांना माहिती होतं. तरीही ते हे करत होते आणि जे ह्यात सक्रिय सहभागी नव्हते ते ह्यांना संरक्षण देत होते;
हे जे काही घडतेय ते सरकारमधील बाशिंद्यांनाही ठाऊक होतं, ह्या सर्वांना मलिदा मिळत होता. आपण मात्र विष खात होतो, जहर पित होतो. अद्यापही आपण विष खातो आहोत.
आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनाही हे ठाऊक होतं, जे सरकारी सेवेत होते ते मौन राहून कर्तव्यात कसूर करून पैशाच्��ा हव्यासापायी डोळे मिटून होते. जे ह्या धंद्यात रुतले होते ते आपल्या सर्वांच्या घासात जहर कालवत होते!
किती मोठी घोर फसवणूक हे लोक करत होते आणि आपण ह्यांच्यावर भरवासा ठेवून होतो! आपण किती हतबल झालो आहोत हे आता कळतेय!
मधल्या काळात अन्न भेसळीने अनेकांच्या शरीरात व्याधी निर्माण झाल्या, काहींना कॅन्सरसारखे आजार झाले. काहींचे अवयव बाद झाले, काहींची दृष्टी गेली तर काहींच्या शरीरावरचे नियंत��रण गेले, अनेकांना मधुमेह रक्तदाबाने ग्रासले!
आ��ि ह्यावर जी औषधे घेतली जात होती त्यातदेखील सरमिसळ होत होती हे आता समोर येतेय! ह्या सर्व हाराकिरीपायी जी माणसं जीव गमावून बसली, जी अधू झाली, जी खचून गेली ती सर्व माणसं आता आपल्यापैकी अनेकांच्या समोर तरळत असतील!
काय दोष होता ह्या लोकांचा?
ही सर्व दिवंगत माणसं आणि आता हयात असणारी हतबल माणसं एकच प्रश्न विचारत आहेत आणि तो म्हणजे सरकारमधील मंत्र्यांसह, सचिवासह, संबंधित खात्यातील अधिकारी कर्���चारी यांच्यासह ह्या सर्व लोकांनी आपलं काम नीट प्रामाणिकपणे केलेलं नाही. त्यांनी असं का केलं?
त्यांनी आपल्याला फसवलं आहे. जे काम मुंढे करत आहेत ते काम आधी का केलं गेलं नाही? का गप्प होते हे लोक? आता ह्याची फिर्याद कुणाकडे करायची? आपलं जे अंतर्बाह्य नुकसान झाले आहे त्याची भरपाई कशी होणार?
आपण सारेच, सदाकांत मिश्रा आहोत! मात्र जॉली एलएलबी मधला सदाकांत आणि आपण ह्यात एक फरक आहे!
'जॉली'मधला सदाकांत कागदोपत्री मरण पावलेला होता. आपण मात्र कागदोपत्री जिवंत आहोत मात्र प्रत्यक्षात आपण सारी कलेवरे आहोत, ज्यांना आवाज नाही, ज्यांचा आ��्रोश मौनाच्या कुपीत कैद आहे!
बस्स! मला आणखी काहीच सांगायचं नाही...
- समीर गायकवाड
अन्न किंवा औषधांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा असुरक्षितता आढळल्यास नागरिक आता थेट तक्रार करू शकतात. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासाठी विशेष तक्रार व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. तक्रार क���ताना संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि भेसळीबाबतची माहिती नमूद करावी.
माझं काम हे फक्त पोट भरण्याची जागा नाही.
ते माझं आनंदी राहण्याचं माध्यम आहे. एकमेकांचं जगणं समृद्ध करण्याचं हक्काचं ठिकाण आहे.
हे जेव्हा प्रत्येकाला आतून कळेल तेव्हाच सर्वार्थीने आपल्या प्रगतीला सुरुवात होते.