मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रमास नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रमांतर्गत दि. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक घरोघरी बूथ
लेव्हल अधिकारी (BLO) भेट देत आहेत. मतदारांनी घरी आलेल्या बीएलओंना प्रतिसाद देऊन आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी केले आहे.
#PanvelMunicipalCorporation #panvel
#SIR #VoterAwareness #VoterList
🌧️ पावसाळ्यात आरोग्याची काळजी – आपली जबाबदारी!
पावसाळ्यात जलजन्य आजारांपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता राखा, उकळून गार केलेले पाणी प्या, शिळे व उघड्यावरचे अन्न टाळा आणि परिसर स्वच्छ ठेवा.
सुरक्षित राहा, निरोगी राहा!
– पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग #PanvelMunicipalCorporation #RainySeason #HealthAwareness #StaySafe #HealthyPanvel #जनजागृती #पावसाळा #आरोग्य
पनवेल महानगरपालिकेत ‘लोकशाही दिन’ निमित्त नागरिकांच्या तक्रारींचे निवारण
सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी व समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये दिनांक 06 जून रोजी आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोकशाही दिनाचे’ आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यात आले.
यावेळी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब रातांबे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख किर्ती महाजन उपस्थित होत्या.
नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवादवाढीसाठी महापालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी आपले वैयक्तिक अर्ज समन्वय अधिकाऱ्यांकडे पंधरा दिवस आधी द्यावेत. संबंधित नागरिकांनी लोकशाही दिनादिवशी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
#PanvelMunicipalCorporation #panvel
#लोकशाहीदिन
पनवेल महानगरपालिका मुख्यालयात श्री संत गुलाबराव महाराज व डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त अभिवादन
पनवेल महानगरपालिका मुख्यालयात (दि. ६ जुलै) थोर तत्वज्ञ, विचारवंत श्री संत गुलाबराव महाराज व प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, भारतीय जनसंघाचे संस्थापकडॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर नितीन पाटील, महापालिका सदस्य अजय बहिरा, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त स्वरूप खारगे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ आनंद गोसावी, लेखाधिकारी संग्राम ऱ्होरकाटे, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब रातांबे, उपसचिव अक्षय कदम, तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी दोन्ही महान व्यक्तींच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने अंगीकारावा, असे मत व्यक्त केले.
#PanvelMunicipalCorporation #panvel
#संतगुलाबरावमहाराज
🌧️ पावसाळ्यात आरोग्याची काळजी – आपली जबाबदारी!
पावसाळ्यात जलजन्य आजारांपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता राखा, उकळून गार केलेले पाणी प्या, शिळे व उघड्यावरचे अन्न टाळा आणि परिसर स्वच्छ ठेवा.
सुरक्षित राहा, निरोगी राहा!
– पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग #PanvelMunicipalCorporation #RainySeason #HealthAwareness #StaySafe #HealthyPanvel #जनजागृती #पावसाळा #आरोग्य
अतिवृष्टीमुळे पनवेल महापालिकेच्या 435 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर; प्रशासन अलर्ट मोडवर
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असून बाधित नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार आतापर्यंत सुमारे 435 नागरिकांचे चार तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्यांना चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
#PanvelMunicipalCorporation #panvel
#heavyrain #safetyfirst #Alart
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा हस्तांतरणाबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याबाबत आज पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील व रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीस रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, पनवेल महानगरपालिका उपमहापौर प्रमिला पाटील, पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती बबन मुकादम, जिल्हा परिषद शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते प्रकाश बिनेदार, मनपा सदस्य, मनपा उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मनपा शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी ललिता दहितुले तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#PanvelMunicipalCorporation #Panvel
#students #govermentschool
बैठकीच्या सुरुवातीला पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर व्हीसीद्वारे उपस्थित होते. त्यांनी हा विषय प्रलंबित न ठेवता चर्चा करून तातडीने प्रश्न सोडविण्याबाबत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
लोककल्याण मेळाव्यात विविध शासकीय योजनांची माहिती; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा अधिक व्यापक लाभ पोहचविणे, नव्या पथविक्रेत्यांचा समावेश करणे, वित्तीय व्यवहारास चालना देणे तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार पनवेल महानगरपालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत दिनांक 2जुलै रोजी सुवर्ण दुर्ग कामाठे प्रभाग कार्यालय येथे लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
#PanvelMunicipalCorporation #panvel
#आत्मनिर्भरनिधी
📢 *नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन*
मतदार यादीचे पुनरीक्षण (SIR) बाबत रविवारी विशेष शिबीर
मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ अंतर्गत रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ५.०० या वेळेत सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात बूथ लेव्हल अधिकारी (BLO) उपस्थित राहून गणना अर्ज (Enumeration Form) वाटप व संकलन करणार आहेत.
✅ कृपया आपल्या मतदान केंद्रावर भेट देऊन आवश्यक सहकार्य करा.
✅ https://t.co/5QK4CCxTet किंवा ECINet App वर आपले व कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्या.
✅ नाव नसल्यास जन्माचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व नागरिकांनी या विशेष शिबिरात सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करावे.
#PanvelMunicipalCorporation #panvel
#SIR #VoterAwareness #VoterList
पनवेल महानगरपालिका व 'दोस्त' संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान व आरोग्य सेवा दिंडीचा प्रस्थान सोहळा उत्साहात संपन्न
महापौर नितीन पाटील यांच्यासह मान्यवरांचा दिंडी पुरस्काराने सन्मान
#PanvelMunicipalCorporation#panvel#आरोग्यसेवा#दिंडी
पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याचे महापालिकेचेआवाहन
पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींबाबत नागरिकांनी अत्यंत सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
#PanvelMunicipalCorporation #panvel
#धोकादायक #Alart