भारतात पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या समस्येवर किमान या पद्धतीने भाष्य झाल हे देखील कमी नाही. व्यसन हा मानसिक आजार आहे व त्यातून शारीरिक दुखणी येता���.
Friends या जगप्रसिद्ध मालिकेतील Chandler Bing नावाचे पात्र साकारणारा Matthew Perry देखील व्यसनाधीन झाल्यामुळे अकाली गेला.
ultra marathon runner राहुल जाधव नावाचे एकेकाळी गुन्हेगारी व व्यसनाच्या आहारी जाऊन आता लोकांचे समुपदेशन करतात. मी माझ्या पुस्तकात माझ्या PTSD व grief च्या संघर्षावर लिहिल आहे कारण लोकाना फायदा व्हावा.
तुमच्यासारख्या तरुण influencer ने तरी यावर objective मत द्यावे.
गरीबी ही मल्टीडायमेन्शल आहेच.
▪️आर्थिक
▪️शैक्षणिक
▪️सामाजिक
▪️बौद्धीक
▪️मानसिक
▪️शारीरिक
आणि तशी श्रीमंतीही.
योग्य शिक्षण, वाचन, व चांगली संगत असली की “आर्थिक बाजू” सहज सावरते. बहुतांश मुद्दे मग निकाली निघतात.
कोणी काहीही म्हणो- स्वतःसह कुटूंबाची आर्थिक घडी नीट बसवता यायला हवी!
मराठी माणसांनी हिंदी सिनेमे पाहणे बंद करून आपले मराठी सिनेमे पाहिले पाहिजेत.
हिंदी सिनेमांचा सर्वात जास्त प्रेक्षक हा मराठी भाषिक आहे हे दुर्दैवी आहे.
आपली सिनेसृष्टी मोठी केली पाहिजे,
मराठी हीच ओळख राज्यात ��सली पाहिजे.
आपण नेहमी दुसऱ्याची लंगोट सांभाळण्यात धन्यता का मानतो?
बंधु भगिनींनो X फक्त राजकीय पोस्ट साठी वापरू नका,
या प्लॅटफॉर्मचा वापर व्यवसायिकरित्या आणि आपल्या महाराष्ट्रातील बंधु-भगिनींच्या उत्कर्षासाठी झाला पाहिजे.☎️-9764878600
#Business#opportunity#Job
१९७०च्या दशकात डॉ ब्रुस के. अलेक्झांडर यांनी जगप्रसिद्ध रॅट पार्कचा प्रयोग केला ज्यात एका पिंजऱ्यात खेळणी, अन्न व अनेक उंदीर एकत्रित ठेवले. याच सोबत कोकेन चे पाणी देखील ठेवले. आनंदी म्हणता येईल अश्या वातावरणात ठेवलेल्या उंदरांनी कोकेन चे पाणी चाखले पण त्याचे व्यसन त्यांना लागले नाही.
काही उंदरांना एकटे ठेवण्यात आले जिथे पुरेसे अन्न व खेळणी नव्हती सोबत को��ेनचे पाणी देखील होते. या एकटे पिंजऱ्यात राहणाऱ्या उंदरांना मात्र कोकेनच्या पाण्याचे व्यसन लागून ते उंदीर मेलेत.
व्हिएतनाम युद्धात देखील हेरॉईनच्या आहारी गेले��े अमेरिकन सैनिक जेव्हा मायदेशी परतले तेव्हा त्यापैकी ९० टक्के सैनिकांचे व्यसन सुटले ज्याचे कारण तुम्हाला रॅट पार्क च्या प्रयोगात काही प्रमाणात मिळेल.
कोणतीही नशा करणाऱ्या सर्वच लोकांना व्यसन लागत नाही. व्यसन काही लोकांना का लागत?
व्यसन ही आनंद मिळविण्यासाठी केलेली वाईट सवय नसून ते कोणत्याही ताणापासून सुटकेचा मार्ग आहे. एखादी घटना जी त्या व्यक्तीसाठी मानसिक आघात असते उदा आई वडिला��कडून न मिळालेले प्रेम,असुरक्षित कौटुंबिक वातावरण, जवळच्या व्यक्तीचा मृत्य/विरह, नोकरी/व्यवसायातील अपयश, नात्यातील तणाव, आरोग्याच्या समस्या, लैंगिक शोषण, आर्थिक नुकसान यातून निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी विरंगुळा म्हणून मद्यपान, स्मोकिंग, लैंगिक संबंध, अमली पदार्थ हे हळूहळू व्यसनात रुपांतरीत होतात.
माझ्याकडे मदत मागायला येणाऱ्या अनेक व्यसनी व्यक्तींच्या (ज्यात मोबाईल चे व्यसन देखील आहे) लहानपणी आई वडिलांकडून न मिळालेले प्रेम आणि झालेले शोषण हे व्यसनाधीन होण्याचे प्रमुख कारण दिसून येत. संस्कराच्या नावाखाली मुलांना दाबून ठेवणे, त्यांना समजून न घेणे, स्वतःचा राग काढण्यासाठी मुलांना डस्टबिन म्हणून वापरणे, त्यांना केवळ एक गुंतवणूक म्हणून बघणे असे प्रकार असणाऱ्या घरातील मुलं-मुली याना घरची ओढ निर्माण होत नाही.
ही दुःखी मुलं-मुली घरी न मिळालेले प्रेम बाहेर शोधण्याच्या नादात अनेक वेळा व्यसन व पुढे गुन्हेगारीच्या मार्गाला जातात. लहानपणीचा मानसिक आघात हा पिढ्यांपिढ्या पुढे जात राहतो. ज्याला प्रेम मिळाले नाही तो पुढे प्रेम त्याच्या कुटुंबाला प्रेम देण्यास असमर्थ ठरतो, त्यामुळे व्यसन देखील एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात. याला काही अपवाद ठरतात जे हा पिढ्यांपासून चालत आलेली प्रथा तोडून प्रेमाचा मार्ग स्वीकारतात.
"माझ्या सोबत वाईट झाले म्हणून मी दुसऱ्यासोबत वाईट करणार नाही" ही वृत्ती ठेवणाऱ्या व्यक्ती मानसिक आघाताचे दुष्टचक्र थांबवू शकतात.
#मराठी #मानसिक #मन #पालक #घर #कुटुंब #आघात #मानसिकआघात #भावना #व्यसन #व्यसनमुक्ति #मोबाइल #महाराष्ट्र
वर्तमानातला विनो�� कांबळी जेव्हा स्वतःच्या होऊ शकणार्या सचिन तेंडुलकर रूपाची कल्पना करतो तेव्हा तो प्रश्चातापाने अजून खचतो. आणि असे विनोद कांबळी जागोजागी दिसतात.
मानसिक आघात म्हणजे अशी एखादी घटना ज्यामुळे आपल्या मेंदूची कार्यप्रणाली बदलते, आपल्यात असुरक्षितपणाची भावना वाढीस लागून मनात भीती बसते.
हा आघात खालील अनुभवात येऊ शकतो.
लहानपणी आई वडिलांक��ून मिळालेली चुकीची वागणूक,
आई वडिलांचे छत्र नसणे,
बलात्कार,
शोषण,
जवळच्या व्यक्तीचा मृत्य/विरह,
नैसर्गिक आपत्ती,(उदा कोरोना) अपघात किंवा आरोग्याच्या समस्या,
नोकरी/व्यवसाय बंद पडणे.
यालाच PTSD/post traumatic stress disorder असे नाव आहे.
सतत भीतीत वावरणारी व्यक्ती ही तग धरून जिवंत राहते. भीतीच्या छायेखाली वावरल्याने व्यक्तिमत्वावर मोठे परिणाम होतात.
जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर मानसिक आघाता���ोबत grief/शोक ही सर्वात कठीण भावना आघाताच्या त्रासात आणखी भर घालते.
मानसिक आघातानंतर जाणविणाऱ्या कठीण भावना हाताळताना बहुतेक वेळी चुकीच्या मार्गांचा वापर केला जातो ज्यामुळे व्यसन लागत व गुन्हे घडू शकतात.
निव्वळ गोळ्या घेऊन मानसिक आघात बरा होत नाही तर अनेक प्रकारचे उपचार त्यात वापरले जातात.
मानसिक आघातातून सावरण्यासाठी समुदाय उदा कुटुंब, मित्र मैत्रिणी व ऑफिस चे सहकारी यांचा पाठिंबा आवश्यक आहे.
सर्वात महत्वाचे ज्या व्यक्तीने मानसिक आघात अनुभवला आहे तिला/त्याला आपल्याला काहीतरी त्रास आहे हे जाणवायला हवे. त्रासावर उपचार आवश��यक करण्याची इच्छा हवी.
यावर PTSD/मानसिक आघातानंतर जाणविणारा ताण कसा येतो यावर शास्त्रोक्त माहिती व उपचार माझे आगामी पुस्तक "मानसिक आघात समजून घेताना" यात दिली आहे. तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणालाही अश्या पद्धतीचे अनुभव असल्यास हे पुस्तक नक्कीच उपयोगी येईल.
#मानसिक #मन #महाराष्ट्र #depression #आयुष्य #आशा #आयुष्याच्या_पुस्तकातून #सुख #मराठी #आघात #marathipustak
#marathi #maharashtra #hope #आनंद #आज #मानसिकआघात #ptsd #grief #��ुःख