सोशल मीडियाचा खरा अनुभव हा ट्विटरने दिला. यापूर्वी जो सोशल मीडियावर जे काही होते ते अत्यंत माफक होते.
ट्विटरच्या माध्यमातून मला माझी लेखक ही ओळख मिळाली. लिखाण व व्हिडीओ या माध्यमातून गेले चार वर्ष या प्लॅटफॉर्म वर कडू गोड अनुभव घेत वावरत आहे.
या काळात प्रामुख्याने सोशल मीडिया व त्याचे आपल्या आयुष्यावर होणारे परिणाम यावर खूप सविस्तर लिहिले. अक्षरनामामध्ये अनेक लेख केवळ याच विषयावर लिहिले आहे.
"सोशल मीडिया तर तुम्ही पण वापरता मग नाव कशाला ठेवता"? अस�� एक सूर मला नेहमीच ऐकायला मिळतो. मी अनेकवेळा थेट लिहिते/बोलते ज्यामुळे घाण पातळीवर जाऊन ट्रॉल झाले आहे.
काही वेळा स्त्रियायांकडून जास्त ट्रॉलींग करण्यात आले आहे. सुरवातीला एकदा ट्रोलिंग ला घाबरून मी ट्विटर सोडले होते मात्र गेले दुसऱ्यांदा ट्��िटर वर आल्यावर हळूहळू मी अनेक गोष्टी हाताळायला शिकत गेले.
अनुभव घ्यायलाच हवेत त्याशिवाय कळत नाही, नुसती पुस्तक वाचून उपयोग होत नाही तर आयुष्यात चुका करूनच मोलाचे धडे मिळतात. त्यातून अर्थात माझ्या लिखाणाला आणखी धार चढली.
मी मूळची गणित व भौतिकशास्त्र या विषयातील पदवीधर असून मुख्यत्वे इंग्रजी भाषेतील विज्ञान विषयातील पुस्तक वाचते, इथे जे काही लिहिते ते सर्व आपल्या मराठी लोकांना मदत व्हावी या हेतूने लिहीत असते. यात कोणालाही टार्गेट करण्याचा हेतू कधीच नव्हता.
आज असंख्य मराठी मुलं मुली सोशल मीडियाच्या नादी लागून सर्व प्रकारचे नुकसान करून घेत आहेत. करिअर, नाती व आरोग्य या तीनही आघाड्यांवर आज आपण पुरते भरकटलो आहोत. एक राज्य म्हणून देखील आपण मागे जात आहोत कारण सर्व क्रयशक्ती ही नको त्या ठिकाणी जात आहे. चांगल्या घरातील मुले-मुली या नादाला लागून आयुष्यातील मोलाचा वेळ वाया घालवत आहेत, गुन्हेगारी कडे जात आहेत.
भावनिक क्षमता दूर राहिल्या, साधा संवाद करणं आज मुश्किल झालं आहे.
आम्ही जरी व्यवसायाने मानसशास्त्रात काम करत असलो तरी आधी आम्ही माणूस आहोत. कोणी खोडी काढली, त्रास दिला तर आम्ही एका साधारण व्यक्तीने जसे व्यक्त व्हावे तसेच होणार, आमच्या कडून चुका होत���त.
प्रत्येक वेळी मानसशास्त्रज्ञ आहे म्हणून अंगावर फेकला जाणारा कचरा सहन करण्याची अपेक्षा आमच्याकडून करू नये.
तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी जमेल ते लिहीत राहणार,
शेवटी चॉईस तुमची आहे कारण आयुष्य तुमचे आहे. ते आनंदात जगायचे कि बरबाद करायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे.
#मराठी #म #मानसिक #महाराष्ट्र